आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
२०२१ सुरू झालेलं असलं तरीही ९० च्या दशकाच्या आठवणी या आजही लोकांना खूप सुखावणाऱ्या आहेत. कला, उद्योग, साहित्य, मनोरंजन, जाहिरात प्रत्येक क्षेत्रासाठी हे दशक स्थित्यंतराचं होतं.
एकीकडे मोठ्या पडद्यावर अमिताभ बच्चन यांची नायक म्हणून ग्लॅमर कमी झाले होते. बॉलीवूडचा नायक हा ‘अँग्री यंग मॅन’ च्या छायेतून बाहेर पडून प्रेमाचे दरवाजे उघडून लोकांच्या स्वागतास सज्ज झाला होता.
१९९१ मध्ये आमलात आलेल्या नव्या आर्थिक धोरणामुळे उद्योगांना चालना मिळाली होती. इतकी वर्ष केवळ सरकारी नोकरी किंवा बँकेच्या आशेवर असलेला सामान्य माणूस हा खाजगी क्षेत्राला सुद्धा आपलंसं करत होता.
छोट्या पडद्याने नुकताच ‘कृष्ण-धवल’ ते रंगीत हा प्रवास टीव्हीने सर केला होता. रामायण, महाभारत, चंद्रकांता, अलिफ – लैला यासारख्या कौटुंबिक सिरियल्स सुरू होत्या.
रंगीत टीव्हीची किंमत तेव्हा अधिक असल्याने एखाद्या चौकात किंवा एका बिल्डिंग मध्ये एक टीव्ही असायचा. ९० च्या दशकात जगण्यासाठी आजच्या इतकी स्पर्धा नव्हती असं म्हणता येईल.
जाहिरात क्षेत्र मात्र तेव्हासुद्धा प्रचंड स्पर्धेचा सामना करत होतं हे नक्की. प्रल्हाद कक्कड सारखे मार्केटिंग तज्ञ हे या क्षेत्रात येत होते. नवनवीन प्रयोग होत होते.
हा तोच काळ आहे जेव्हा नौकरी डॉट कॉम ची “हरी साडू” ही जाहिरात प्रचंड लोकप्रिय झाली होती, ज्या एका जाहिरातीमुळे नौकरी हा ब्रँड उभा राहीला आहे.
पेप्सीचं “ये दिल मांगे मोअर”, कोक चं “थंडा मतलब… कोका कोला” या टॅगलाईन्स लोकांना आवडत होत्या. मैदानी खेळ खेळण्यासाठी तेव्हा एक आजपेक्षा जास्त उत्सुक असायची आणि ते सुद्धा या टॅगलाईन्सला खूप लोकप्रिय करायचे.
काही जाहिरात तयार करणाऱ्यांनी मात्र काळाच्या पुढे जाऊन ‘काही तरी वेगळं’ करायचा प्रयत्न केला.
झटपट लोकप्रियता मिळवण्यासाठी त्यांनी मोठया पडद्यावरील भडकपणा हा छोट्या पडद्यावरील जाहिरातींमध्ये आणला आणि त्यावेळच्या पालकांची चांगलीच तारांबळ उडवून टाकली होती.
हा तो काळ होता जेव्हा आपण मोबाईल हातात घेऊन टीव्ही बघत नव्हतो. आज एक तर प्रायोजित कार्यक्रम मोजकेच बघतो किंवा बघतही नाहीत. कोणती जाहिरात सुरू झाली आणि संपली हे आपल्या लक्षात सुद्धा राहत नाही. कारण, आपण मोबाईल मध्ये एखाद्या वाचनाच्या मध्यभागी असतो.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
–
हे ही वाचा – जाहिरातींमध्ये दिसणाऱ्या “या” गोष्टी सत्यात उतरणं निव्वळ अशक्य आहे!!
–
९० च्या दशकात मात्र असं नव्हतं. लहान मुलांसाठी त्यांचे आई-वडील हेच त्यांचे ‘गुगल’ होते. टीव्ही वर एखादी जाहिरात बघितली आणि ती वस्तू कधी घरात दिसली नाही की, “बाबा, हे काय आहे?” असा त्यांचा पहिला प्रश्न ऐकायला यायचा.
–
हे ही वाचा – ९० चं दशक गाजवणारी ही सुपरहिट संगीतकार जोडी “त्या” घटनेनंतर चर्चेत आलीच नाही
–
पालक एकमेकांकडे बघायचे आणि पटकन चॅनल बदलून टाकायचे. एखादा सिनेमा बघतांना सुद्धा आधी तो आई बाबांनी बघितलेला असावा लागायचा आणि मगच ते तो सिनेमा पाठ करून मुलांसोबत बघायचे आणि ठराविक वेळी ‘न्यूज हेडलाईन्स’ लावायचे.
भारतात झालेल्या इंटरनेट क्रांतीमुळे आजच्या पालकांना हे त्या मानाने कमी त्रासदायक आहे. कारण, आज आपण जाहिरातीचा ब्रेक नसलेल्या वेबसिरीज बघणं जास्त पसंत करतो.
त्यावेळात लहान मुलांना मोबाईल दिला (खरं तर देऊ नये) की ते ही त्यात गुंग असतात. सिनेमा बघायला गेल्यावर सुद्धा एखादं आक्षेपार्ह दृश्य आलं तरी आजच्या पिढीची नजर तितकी औत्सुक्याची नसते हे मान्य करावं लागेल.
ऑनलाईन शाळा अटेंड करणारी आजची पिढी खऱ्या अर्थाने स्मार्ट आहे.
आम्ही अश्या ८ जाहिरातींचा इथे उल्लेख करत आहोत ज्यांनी ९० च्या दशकात आपल्या पालकांना टीव्ही रिमोट शोधायला भाग पाडलं होतं. तुम्हाला सुद्धा या ओझरत्या बघितलेल्या आणि नंतर बंदी आलेल्या जाहिराती प्रकर्षाने आठवतील हे नक्की :
१. फास्ट्रॅक गॉगल
भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहली आणि जेनेलिया डिसुझा यांच्यात ही जाहिरात शुट झाली होती. ज्यामध्ये विराट कोहलीला विमानाचं कॅप्टन म्हणून दाखवण्यात आलं होतं आणि जेनेलिया डिसुझाला एअर होस्टेसचा रोल दिला होता.
चालू विमानात ही एअर होस्टेस कॉकपिट मध्ये जाते आणि कॅप्टनला आपल्याकडे आकर्षित करते अशी ती जाहिरात होती.
आजच्या पेक्षा फार कमी लहान मुलांनी त्या काळात विमान प्रवास केला असेल तेव्हा त्या काळातील बाल मनांमध्ये ही जाहिरात बघून नक्कीच खूप प्रश्न पडले असतील. विमान कंपनीच्या विरोधामुळे या जाहिरातीवर नंतर बंदी आली होती.
२. ‘टफ शुज’
काही दिवसांपूर्वी गोवा ट्रिपमुळे चर्चेत आलेले सुपर मॉडेल ‘मिलिंद सोमण’ आणि मधु सप्रे यांची एक शुज ची जाहिरात तेव्हा आली होती.
या जाहिरातीमध्ये या दोघांनाही एका अजगराने विळख्यात घेतलं होतं आणि त्या दोघांच्या पायात ‘टफ’ या ब्रँड चे शुज होते. पालकांच्या नजरेतून ही जाहिरात बघतांना संकोच वाटायचा.
खूप वादग्रस्त झालेली ही जाहिरात नंतर बंद करण्यात आली. पण, या जाहिरातीने मिलिंद सोमण ला एक ओळख मिळाली आणि तो आजही खूप लोकप्रिय आहे हे नक्की.
–
हे ही वाचा – साध्या शिपायाचं काम करून करोडोंची कंपनी उभी करणारा भारताचा ‘फेविकॉल मॅन’!
–
३. अमुल माचो
“ये तो बडा टॉइंग है” या टॅगलाईनने आलेल्या दोन्ही जाहिराती नंतर बंद करण्यात आल्या. एका नदीवर कपडे धुणाऱ्या महिलेच्या ‘अमूल माचो’ ही अंडरवेअर धुतांना बदलणारे चेहऱ्यावरचे भाव हे या जाहिरातीत दाखवण्यात आले होते.
आज आपण हे सहज वाचू, बोलू, लिहू शकतो. पण, तेव्हा याबद्दल एक वेगळाच संकोच होता जो की जाहिरातीच्या दिगदर्शकाने लक्षात घ्यायला हवा होता.
४. लक्स कोझी
सध्या सनी पाजी कडे असलेल्या या ब्रँडची एक जाहिरात तेव्हा बंद करण्यात आली होती. स्विमिंग पुल मध्ये असलेल्या एका व्यक्तीचा टॉवेल एक कुत्रं घेऊन जातं आणि ज्या महिलेचं हे कुत्रं असतं ती वापस जातांना ‘लक्स कोझी’ कडे बघत जाते.
अंडर गारमेंट्स या तीव्र स्पर्धा असलेल्या वस्तूंची जाहिरात कशी करावी? हा कोणत्याही नवीन दिगदर्शकासमोर मोठा प्रश्न असेल.
–
हे ही वाचा – जर तुम्ही 90’s kid असाल तर तुम्ही ‘ह्या’ गोष्टी कधीही विसरू शकणार नाही!
–
जाहिरात पण झाली पाहिजे, उत्तेजक पण वाटलं नाही पाहिजे आणि आपल्या संस्कृती, सेन्सॉरच्या नियमांचं सुद्धा पालन व्हायला पाहिजे.
५. वाईल्ड स्टोन
“कुणाल?” या एका शब्दाने सध्या गाजणाऱ्या डियोड्रन्ट ची जाहिरात सुद्धा तेव्हा वादग्रस्त आणि अशोभनीय होती. धार्मिक विधीसाठी जाणाऱ्या एका महिलेला वाईल्ड स्टोन डिओच्या सुगंधाने आपल्या कार्याचा विसर पडणे हे कोणालाही मान्य झालं नाही.
अश्या जाहिरातीत जितकं भडक चित्रीकरण तितका आक्षेप आणि संकोच जास्त असतो. साधेपणाने सुद्धा ही जाहिरात करता आली असती, पण निर्मात्याच्या मसाला जाहिरात करण्याच्या नादात ही चूक झाली असावी.
६. न्यूयॉर्क लॉटो
लॉटरी गेमची ही जाहिरात विवेक ओबेरॉय आणि बिपाशा बसू यांच्यात शुट झाली होती. टॅक्सीमध्ये बसलेला विवेक ओबेरॉय हा एका मोठ्या महालात बिपाशा बसू सोबत लग्न करतानाचं स्वप्न बघतो.
ट्रॅफिक सिग्नल हिरवा होतो तरीही तो त्याच्या स्वप्नातच असतो. जयपूर च्या महालात शुट झालेल्या या जाहिरातीवर खूप खर्च करण्यात आला होता.
पण, खूप लांब आणि उत्तेजक असल्याने त्यावर भारतात बंदी आणली होती.
७. मोटोरोला फोन
नवीनच मोबाईल सुरू झालेल्या त्या काळात कॅमेरा हेच मोठं फिचर होतं. एका जाहिरातीत लोक या मोबाईल ने सतत फोटोच काढतात हे चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आलं होतं.
वयस्कर माणूस, तरुण सगळेच फक्त मोटोरोला C550 ने फोटोच काढत आहेत हे दाखवण्यात आलं होतं. प्रायव्हसीला तडा देणाऱ्या या जाहिरातीला नंतर बंद करण्यात आलं होतं.
८. व्ही गार्ड पॉवर इन्व्हर्टर
मधुचंद्राच्या रात्री या जाहिरातीतील नायक हा खोलीत शिरतो आणि लाईट जातात. तो पलंगावर उडी मारतो आणि चुकून पलंगाच्या कॉर्नरवर आदळतो आणि नंतर ते दाम्पत्य हे अनाथ आश्रमात मुल दत्तक घ्यायला जातात असं दाखवण्यात आलं होतं.
या जाहिरातीत नायकाला पलंग लागण्याचा आवाज लोकांना खूप किळसवाणा वाटत होता. परिणाम तोच झाला, जाहिरात बंद करावी लागली.
कल्पना शक्तीला मर्यादा घालता येत नाहीत ते बरोबर आहे. पण, आपली कलाकृती ही सर्वमान्य असावी हे एक भान ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. या जाहिरातींमध्ये काही जाहिराती या २०१० च्या सुद्धा आहेत ज्यांनी आधी बंद करण्यात आलेल्या जाहिराती कडून काहीच बोध घेतला नाही.
बघण्यासाठी तर अवघडच पण पटण्यासाठी पण मान्य नसलेली ‘झटॅक’ डिओची जाहिरात सुद्धा बंद करण्यात आली होती. कारण, कोणतीही भारतीय महिला ही एका डिओच्या सुगंधाने लग्नाची अंगठी कधीच काढणार नाही.
भारतीय जाहिरात निर्मात्यांनीच अशीच चूक करणं हे खरं तर अक्षम्य आहे. जाहिरात हे क्षेत्र खूप उथळ आहे. इथे रोज व्यवसाय समीकरणं बदलत असतात.
जसं भारतात टोल शिवाय रोड नाही तसं जाहिराती शिवाय कार्यक्रम नाही हे सर्वांना मान्य आहे. गरज आहे ती काळानुसार दर्जा सुधारण्याची.
या जाहिरातीच्या निर्मात्यांना प्रेक्षकांनी, समीक्षकांनी आपल्या नाराजीतून हे सांगितलं आणि अपेक्षित बदल होत गेले. सध्या पण ‘एंगेज डिओ’ सारख्या जाहिराती लोकांना टीव्ही बघणं अवघड करत आहेत.
पण, आता ‘प्रसारभारती’ यावर बारीक लक्ष ठेऊन असते हा एक बदल कौटुंबिक प्रेक्षकांसाठी स्वागतार्ह आहे.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.