आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
प्रेम ही जगातील सर्वात सुंदर गोष्ट आहे. एखाद्या व्यक्तीबद्दल स्वतःपेक्षा जास्त आत्मीयता असणे म्हणजे प्रेम असणं असं म्हणता येईल.
आजकाल जग हे खूप प्रॅक्टिकल झालं आहे हे खरं असलं तरीही प्रेम हे कोणत्याही नात्याला घट्ट बांधून ठेवतं हे मान्य करावंच लागेल.
प्रेम व्यक्त करण्यात फक्त इतका फरक असतो की, काही लोक प्रेम आहे हे वारंवार बोलून सांगत असतात, तर काही लोक आपलं प्रेम हे कृतीतून व्यक्त करत असतात.
‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ या म्हणीप्रमाणे काहींना सतत प्रेमाच्या विश्वात रमावं आणि कोणीतरी सतत आपलं कौतुक करावं असं वाटत असतं, तर काहींना तशी अपेक्षाही नसते.
–
आपल्या जोडीदारावर विश्वास ठेवण्याचं पण असंच आहे. काही व्यक्ती लगेच विश्वास ठेवतात, तर काही आयुष्यभर सोबत असतात पण त्यांचा एकमेकांवर विश्वास नसतो.
बदलत्या काळात प्रेम सुद्धा बदलत गेलं असं म्हणता येईल. आज प्रत्येक जण जास्त प्रॅक्टिकल आणि स्मार्ट आहे. आज कोणाच्याही “चंद्र, तारे तोडून आणून दे” अश्या काही अपेक्षा कल्पनेत सुद्धा नाहीयेत.
===
हे ही वाचा – या १० पैकी एकही गुण असलेल्या व्यक्तीशी चुकूनही लग्न करु नका. पश्चाताप होईल!
===
तुम्ही जसे आहात तसे कोणाला आवडलात तर ते ‘खरं प्रेम’ हे कोणीही मान्य करेल.
बऱ्याच वेळेस याबाबतीत काही व्यक्ती, विशेषतः मुलं गल्लत करतात. ते सतत समोरच्याला प्रभावित करण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्या प्रयत्नात त्यांच्या हातून चुका होत असतात.
‘प्रेम हा काही व्यवहार नाही’ हे प्रत्येकाने मान्य करावं आणि प्रेम मिळवण्यासाठी किंवा व्यक्त करण्यासाठी स्वतःमध्ये बदल करू नयेत हेच इतक्या वर्षात समोर आलं आहे.
तुमच्यातील सच्चेपणा हाच कोणालाही प्रभावित करायला पुरेसा आहे यावर विश्वास ठेवा आणि जसे आहात तसेच रहा. कमी वयात हे कळलेलं कधीही चांगलचं!
‘प्रेमात आहात’ म्हणून कोणत्या गोष्टी आपण बदलू ‘नये’ हे लक्षात घेणंही तितकंच महत्वाचं आहे. अन्यथा नात्यात तुमचं महत्व तुमच्याही नकळत कमी होऊ शकतं.
१. ‘मित्र, नातेवाईक’ सुद्धा जपा
नवीन नातं तयार झाल्यावर जुनं विसरून जायची काही लोकांना सवय असते. हे अत्यंत चुकीचं आहे.
नवीन व्यक्ती आयुष्यात आल्यावर तुमच्याकडे मित्र, नातेवाईकांसाठी आधी इतका वेळ नसतो. कारण, तो एक काळ असतो जेव्हा तुमचं प्रेम हे खुलत असतं. पण, त्यामुळे तुमच्या मित्र, नातेवाईकांना अजिबात अंतर देऊ नका. ते तुमची शक्ती असतात हे लक्षात ठेवा.
२. तुमचे ध्येय
तुमचं प्रेम हे तुम्हाला ध्येय प्राप्तीसाठी प्रोत्साहित करणारं असलं पाहिजे. तुम्हाला जे आवडतं ते तुमच्या जोडीदाराला सुद्धा आवडलंच पाहिजे हा हट्ट असू नये. पण, जोडीदाराला काही आवडत नाही म्हणून आपण आधीपासून जोपासत असलेला एखादा छंद, काम सोडून द्यावं असं होत नाही.
उदाहरण सांगायचं तर, ‘तुम्हाला गायक व्हायचं आहे’ आणि तिला किंवा त्याला गाणं अजिबात आवडत नसेल तर तुम्ही गाणं सोडून देणं हे काही प्रेम नाहीये.
तुमच्यासाठी जोडीदारानेही गाण्यात रुची निर्माण करणं हे खरं प्रेम आहे. कारण, ध्येय सापडणारी लोकं खूप कमी असतात. एका व्यक्तीमुळे आपल्या ध्येयाला विसरून जाऊ नका.
३. सतत छानच वागण्याचा प्रयत्न करणे
भावनाशील व्यक्तीच फक्त प्रेम करू शकतात. जोडीदार तुमच्या आजूबाजूला असतानाही तुम्हाला कोणत्या गोष्टीचा राग येणं, एखाद्या व्यक्तीबद्दल वाईट वाटणं, प्रसंगी रडू येणं हे सगळं नैसर्गिक आहे. हे ज्याला मान्य आहे तो तुमचा ‘खरा जोडीदार’ आहे.
जी व्यक्ती सतत छान वागण्याचा प्रयत्न करते तिलाच सर्वात जास्त त्रास होत असतो.
तुमच्या ‘भावनिक’ स्वभावाचा स्वीकार होणं सुद्धा गरजेचं असतं. कारण, काही वर्षांनी तुम्ही परत तुमच्या मूळ स्वभावाकडेच वळत असतात.
४. तुमच्या आवडी निवडी
प्रेमात पडेपर्यंत तुम्ही एक आयुष्य जगलेले असतात ज्यामध्ये तुम्हाला धार्मिक, राजकीय, खेळ यांची आवड असूच शकते. तुमच्या जोडीदारासाठी प्रत्येक गोष्ट सोडून द्यायची किंवा बदलायची गरज नसते.
===
हे ही वाचा – या “७” गोष्टी पार्टनरला न सांगितलेल्याच बऱ्या…!
===
अजून एक शक्यता म्हणजे, तुमच्यावर अश्या गोष्टी मान्य करण्यासाठी दबाव येत असेल तर तोसुद्धा मान्य करायची गरज नाहीये. तुम्ही जसे आहात आणि तुमचा जोडीदार जसा आहे तसं राहण्यात काहीच गैर नाही.
प्रेम हे सर्वांच्या पलीकडे जाऊन निर्माण झालेली भावना असते.
तुम्ही एकटे असतात तेव्हाच या गोष्टी मान्य केल्यास तुमच्या नात्याची सुरुवात झाल्यावर वाटणारा अचानक बदल हा आधीच मान्य करा.
५. तुमचं राहणीमान
तुमचं राहणीमान म्हणजेच तुम्हाला आवडणारे कपडे, हेयर कट, टापटीप राहण्याची आवड ही तुमच्यात नकळत एक आत्मविश्वास निर्माण करत असते.
तुमच्या जोडीदाराच्या म्हणण्यानुसार तुम्ही जर या प्राथमिक गोष्टीत सुरुवातीपासूनच बदल करत गेलात तर एक वेळ येईल जेव्हा तुम्हाला कुठे तरी हरवल्याची भावना येईल आणि तुमचा आत्मविश्वास कमी होईल.
तुम्ही लग्न करत आहात म्हणजे नियमावली असलेल्या ‘नोकरी’ वर रुजू होत नाही आहात हे स्वतःला आणि तुमच्या जोडीदाराला सुद्धा सांगा.
जे केल्याने तुमच्या चेहऱ्यावर आनंद येतो तेच ओळखता आलं नाही, आवडलं नाही तर त्या तुमच्या प्रेमाला अजून वेळ द्यायची गरज आहे हे नक्की.
६. कुटुंबाबद्दलचे तुमचे विचार
सध्या हा मुद्दा फार महत्वाचा आहे. ‘प्रेमात आहोत’ मग लग्नाची काय गरज आहे? किंवा लग्न झालं आहे, आनंदी आहोत मग आपत्याची काय गरज आहे? जबाबदाऱ्या का वाढवायच्या? या प्रश्नांची प्रत्येकाची आपापली उत्तरं असतात. ती उत्तरं शोधा आणि त्यांच्यासोबत प्रामाणिक रहा.
फक्त आजचा विचार करू नका, पुढच्या दहा पंधरा – वर्षांचा विचार करून या प्रश्नांवर एकमत करा. तुम्ही समाधानी असाल तरच तुम्ही कोणत्याही नात्याला न्याय देऊ शकतात हे मान्य करा.
तुमच्या जोडीदाराचं आणि तुमचं या गोष्टींवर एकमत नसेल तर तुम्ही नात्यातून बाहेर पडण्याचे मार्ग शोधाल. आधीच एकमतावर या आणि नात्यात स्पष्टता असू द्या.
७. तुमच्या अपेक्षा
तुम्ही शुद्ध शाकाहारी आहात आणि तुमच्या प्रेयसीला फक्त मांसाहार आवडतो ही बाब अनेक जोडप्यांमध्ये दिसून येते. मात्र दुस-यांसाठी आपली सवय बदलण्याची गरज नाही. तशी अपेक्षा ठेवणं सुद्धा चुकीचं आहे.
नैसर्गिकरित्या हा बदल घडला तर उत्तमच आहे. पण, या सवयी तुमचा निर्णय बदलू शकणाऱ्या ठरू नयेत.
जोडीदाराच्या सवयींचा आदर करणं हे अपेक्षित असतं.
‘पार्टी संस्कृती’ आल्याने ही गोष्ट अजून महत्वाची ठरते. कारण, आजकाल कित्येक लोक आपल्या जोडीदाराला स्वतः सारखं, सर्वांना आवडेल असं, प्रसंगी ड्रिंक्स घेण्यासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करत असतो.
तो बदल ते शरीर मान्य करेलही, पण मनाने तुम्ही दुरावलेले असाल यात शंकाच नाही.
आपल्या जोडीदारामध्ये जेव्हा आपण एक मित्र शोधायला लागतो तेव्हा हे सर्व प्रश्न नाहीसे होतात. मैत्री सारखं निखळ नातं इतर कोणतंही नाहीये, ते नातं तुमच्या पार्टनर सोबत तयार करा मग कोणालाच कोणता बदल करायची गरज नाहीये.
गोष्टी जश्या आहेत तश्या मान्य करायचा प्रयत्न करा, जीवन सुसह्य होईल.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.