Site icon InMarathi

फिटनेससाठी साखर बंद करताय; तरी गोड खायचंय? मग हे ६ पदार्थ खास तुमच्यासाठीच

suger

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

पिझ्झा, बर्गर, फ्रेंच फ्राईज, मैदायुक्त पदार्थ, पाव, हवाबंद प्रोसेस्ड फूड, ज्यूस, कार्बोनेटेड ड्रिंक्स या सगळ्या या पिढीच्या आवडत्या गोष्टी!

हाॅटेल्स, फूड माॅल, फूड कोर्ट कशी मुला मुलींच्या गर्दीनं ओसंडून वाहत असतात. आई बाबा, आजी आजोबा यांचा या पदार्थांवर थोडासा रागच आहे.‌ पण मुलं ऐकत नाहीत.

 

 

काॅलेज, शाळा यांच्या वेळा, घरापासून असलेलं दूरचं अंतर, जेवणाखाणाच्या वेळांचं बिघडलेलं वेळापत्रक यामुळे ही मुलं मुली सर्रास या फास्ट फूडच्या आहारी जातात. त्याचे दुष्परिणाम होतात ते म्हणजे वजन वाढते, पचनाच्या तक्रारी होतात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

वजन वाढलं की त्या पाठोपाठ येतात शुगर, ब्लड प्रेशर यासारखे आजार. अगदी वाढतं वजन‌ वंध्यत्वाचंही कारण ठरु शकतं. वाढणारं वजन ही जागतिक समस्या झाली आहे.

पूर्वी काॅलेजच्या आवारात एखादीच जाडी मुलगी, लठ्ठ मुलगा दिसायचा..बाकी बरेच किडकिडीत असायचे. पण आता हे प्रमाण व्यस्त झालं आहे. एखादीच बारीक मुलगी..बारीक चणीचा मुलगा.. बाकी बरेचसे जाड!

 

 

शरिराचा आकार ही सौंदर्याची व्याख्या नाही हे मान्य आहेच, मात्र वाढते वजन ही बाब तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते हे देखील विसरून चालणार नाही. 

या वाढणाऱ्या जाडीमुळे सर्वात मोठी समस्या आहे ती म्हणजे जे आजार पूर्वी साठीच्या घरात व्हायचे ते आजार आजकाल तीस वर्षाच्या वयातच होताना दिसत आहेत. जसे मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, थायरॉईड.

इतक्या लवकर हे आजार आले की पथ्यं सांभाळणं ओघानेच आलं. साखर खाऊ नका,  मीठ कमी खा.. पापड लोणची टाळा…लगेच जीभेवर ताबा ठेवा. व्यायाम करा वगैरे.

सढळ हाताने साखर खाणं म्हणजे जणूकाही मोठा अपराधच ! अशावेळी डाॅक्टर तीन पांढरे पदार्थ टाळायला सांगतात, साखर, मीठ आणि मैदा.

हे ही वाचा – साखर खाणं बंद केल्याचे एवढे फायदे आहेत याचा तुम्ही विचारही केला नसेल

 

 

पण आहारशास्त्र सांगतं षड्रस शरीराला आवश्यक आहेत. गोड, कडू, आंबट, तुरट, खारट, तिखट हे सर्व रस योग्य त्या प्रमाणात शरीरात हवेतच. म्हणजेच योग्य प्रमाणात साखर हवी.

पण असं असताना शुगर वाढायची भिती. मग यासाठी शुगर फ्री गोळ्या, बिनसाखरेचा चहा यासारखं बरंच काही केलं जातं.

हा सगळा खटाटोप करत असताना घरच्या सुगरणीची तारेवरची कसरत होते, प्रत्येक गोड पदार्थ, चहा इतरांसाठी वेगळा आणि शुगर फ्री असा वेगळा करावा लागतो.

पण हे करण्यापेक्षा काही नैसर्गिक पदार्थांची निवड करुन ही साखर टाळणं सहज शक्य आहे. विश्वास बसत नाहीये? जाणून घ्या या पदार्थांबाबत…

१. मध

साखरेचा नैसर्गिक स्त्रोत मध फुलातील मध मधमाशा गोळा करुन आणतात. ही जगातील शुद्ध साखर म्हणायला हरकत नाही.

 

 

यात साखरेपेक्षा कमी ग्लायसेमिक इंडेक्स असतात. ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढवत नाहीत. मात्र आपण जी रोजच्या वापरातील साखर खातो ती ही शुगर लेव्हल वाढवते. म्हणून हा साखरेला चांगला पर्याय आहे.

 

 

याचा दुसरा फायदा म्हणजे मधामध्ये स्लीपिंग हार्मोन्स वाढवणारे उपयुक्त घटक आहेत. यामुळे तुमची झोपही पुरेशी होते. म्हणून साखरेऐवजी मध वापरा.

हे ही वाचा – व्यवस्थित झोप झाली, तरी दिवसभर दमल्यासारखं वाटतंय? या ७ टिप्स आजमावून बघाच

२. खजूर

प्रोटीन्सचा भरपूर साठा असलेलं खजूर हे फळ! यात नैसर्गिक साखर असते. खजूर खाऊन वर पाणी पिऊन बघा, पाणी पण गोड लागतं की नाही? कारण यात नैसर्गिक साखर असते.

 

 

शिवाय त्यात असलेली अतिरिक्त पोषणमूल्ये आणि फायबर्स आपल्या शरीराला, पचनसंस्थेला उपयुक्त ठरतात. कारण खजूर फायबर्स रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू देत नाहीत. म्हणून खजूर हा साखरेला उत्तम पर्याय आहे.

३. कोकोनट शुगर

ही नारळाच्या, ताडाच्या रसातून काढली जाते. आयर्न, झिंक, कॅल्शियम, पोटॅशियम व अँटी आॅक्सिडंट यांचा समावेश असलेली कोकोनट शुगर ही शरीराला उपयुक्त ठरते कारण यात इन्शुलिन असते. त्यामुळे पचन व्यवस्थित होऊन साखरेची पातळी प्रमाणात ठेवायला मदत करते.

 

 

म्हणून रिफाईंड साखरेपेक्षा कोकोनट शुगर हा चांगला पर्याय ठरू शकतो.

४. मेपल सिरप

मेटल या झाडापासून मेपलचा सिरप बनवला जातं. या सिरप मध्ये अँटी आॅक्सिडंट विपुल प्रमाणात असतात. अगदी मधापेक्षाही जास्त प्रमाणात!

 

 

याचा ग्लायसेमिक इंडेक्स पण जास्त असतो. आपल्या साखरेला हा अतिशय उत्तम पर्याय आहे. यातील कॅल्शियम पोटॅशियम आयर्न व मँगॅनीज या खनिजांनी मानवी शरीराला आवश्यक ती ऊर्जा मिळते. मात्र मेपल सिरप बेताने प्रमाणशीर घ्यावा.

हे ही वाचा – हृदय निरोगी राहण्यासाठी दररोजच्या आहारात हे सात मसाले हवेतच!

५. अगेव

या झाडाची पानं पण साखरेपेक्षा गोड असतात. साखरेला पर्याय म्हणून अगेव पानांपासून बनवलेली लिक्विड शुगर वापरणं हा चांगला पर्याय आहे.

 

 

मधासारखीच याची चव असते. पण अतिगोड असल्यामुळे प्रमाणशीर वापर करावा. मात्र नैसर्गिक साखर स्त्रोत असलेली अगेव पानं रिफाईंड शुगरसाठी चांगला पर्याय ठरू शकतात.

६. माँक फ्रूट

हे विदेशी फळ आहे. याला भारतीय नाव नाही. पण याचा वापर तुम्हाला‌ नैसर्गिक साखर स्त्रोत म्हणून सहज करता येईल.

साखरेपेक्षा २५० पट गोड असलेल्या या फळाची ओळख हल्ली हल्लीच झाली. याचं सत्व सिरपच्या रुपात तयार करून वापरलं जातं.

 

 

आॅनलाईन खरेदी हा माँक फ्रूट एक्स्ट्रॅक्टसाठी उत्तम पर्याय आहे. नैसर्गिक साखर यात विपुल प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे साखरेऐवजी हे सर्रास वापरता येईल.

थोडक्यात नैसर्गिक आहार हाच आपल्या आरोग्याचा मोठा आधार आहे. डायबिटीस, स्थूलपणा आणि त्या अनुषंगाने होणारे इतर अनेक रोग टाळण्यासाठी या आहाराचा समावेश रोजच्या जेवणात ठेवला तर निरोगी आयुष्य सहज शक्य आहे.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version