Site icon InMarathi

बर्ड फ्लूचं टेंशन, तरी नॉनव्हेज खायचंय? मग ही माहिती दुर्लक्षून अजिबात चालणार नाही!

chicken featured inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

कोरोनाचे संकट सुरु असतानाच त्यात आणखीन एका रोगाची भर पडली आहे, ते म्हणजे बर्ड फ्लू. २००६ साली भारतात बर्ड फ्लूचे पक्षी आढळले होते, त्या नंतर पुन्हा या रोगाने शिरकाव केला आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यात पुन्हा एकदा बर्ड फ्लूची लागण झाली आहे, अनेक कोंबड्याना मारण्यात आले आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

मागच्या वर्षी  मध्यप्रदेश, राजस्थान, पंजाब, हिमाचल प्रदेश, झारखंड आणि केरळ या राज्यांमध्ये मोठ्या संख्येने पक्षी अचानक मरून पडल्याचं आढळले होते. केरळ राज्याने तर थेट पाळीव पक्षी मारण्याचे आदेश दिले होते.

 

काय आहे नक्की बर्ड फ्लू?

माणसांमध्ये जसे साथीचे रोग असतात तसे पक्षांमध्ये देखील साथीचे आजार पसरत असतात, बर्ड फ्लू हा पक्षांमध्ये पसरणारा एक संसर्गजन्य रोग आहे.

जो पक्षांच्या लाळेवाटे, विष्ठेवाटे किंवा त्यांच्या डोळ्यांवाटे इतर पक्ष्यांमध्ये पसरतो. तसेच हा पक्षांद्वारे ‘माणसालाही’ होऊ शकतो.

धोका कोणाला?

प्रामुख्याने पोल्ट्री व्यवसाय करणारे, कोंबडी व बदके पाळणारे तसेच मांस विक्रेते ह्यांना संसर्ग होण्याची शक्यता जास्त आहे, कारण ते त्यांच्या संपर्कात जास्त असतात.

 

 

त्यामुळे त्यांनी विशेष काळजी घ्यावी हात स्वछ धुवावेत, मास्क, ग्लोव्हज वापरावेत. शक्य असल्यास PPE किटचा वापर करावा.

चिकन अंडी खाणे सोडून द्यावे का?

रोजच्या रोज मांसाहार व अंडी खाणाऱ्या लोकांपुढे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे परंतु WHO ने आधीच एका पत्रकात नमूद केले आहे की, चिकन म्हणजे मांस आणि अंडी पूर्णपणे शिजवलेली असतील तर ते खाण्यास सुरक्षित आहेत.

===

हे ही वाचामुक्या प्राण्यांची हत्या न करता नॉन व्हेज एन्जॉय करायचंय, वाचा या नव्या प्रयोगाबद्दल!

===

तसेच ज्या भागांमध्ये बर्ड फ्लूचा आऊटब्रेक नाही, तिथली पोल्ट्री प्रॉडक्ट्स हाताळल्याने वा खाल्ल्याने बर्ड फ्लूचा धोका उद्भवत नाही, असं WHO ने म्हटलंय.

तसेच खालील दिलेल्या टिप्स वापरा आणि बिनधास्त चिकन व अंड्याचे सेवन करा :

• सर्वात महत्वाचे म्हणजे ते स्वच्छ धुवून घ्या व कच्चे मांस खाणे टाळा चिकन जास्तीत जास्त चांगले शिजणे महत्वाचे.  ७० डिग्री तापमानाच्या वर चिकनचे सर्व भाग व्यवस्थित शिजवणे तसेच च microwave मध्ये गरम करत असाल तर ते तितकेसे सगळीकडून ते शिजले जाणार नाही.

 

 

• रस्त्यावरील खाणे शक्यतो टाळा

• अंडी खातानासुद्धा ती व्यवस्थित उकडून खावीत, त्यातील पिवळा बलक चांगला शिजवून घ्या, तसेच अंडी खरेदी करताना विश्वासातील दुकानातूनच खरेदी करा.

• मांस खरेदी करताना ते जागा व्यवस्थति हायजेनिक आहे की नाही ते तपासून पहा, नंतरच खरेदी करा.

• प्रोसेस चिकन खरेदी करत असाल तरी ते पूर्णतः शिजवून खा.

• बाजार मंडई किंवा प्राण्यांची बाजारपेठ इथून मांस घेणे टाळा कारण तिथे इन्फेकशन होण्याची शक्यता जास्त आहे.

 

 

• चिकन अंडी ह्यासारखे पदार्थ हाताळताना आपले हात स्वच्छ धुणे हे ही तितकेच महत्वाचे.

त्यामुळे चिकन व अंडी खाणे सोडून देण्याच्या संभ्रमात असाल तर ह्या गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही खाऊ शकता.

लक्षणे :

आता पर्यंत भारतात बर्ड फ्लू कोणत्या ही माणसाला लागण झाल्याचे आढळून आले नाही तरीही कोरोनाचे संकट पाहता आपण विशेष काळजी घेणे महत्वाचे आहे.

सामान्यतः माणसांमध्ये बर्ड फ्लूची लागण झाल्यानंतर ताप येणं, घशात खवखव होणं, वा जास्त इन्फेक्शन होणं, सर्दी, श्वास घेण्यास त्रास होणं, पित्त वा कफचा त्रास आणि रोग जास्त पसरला असल्यास निमोनिया होण्याची शक्यता जास्त असते.

===

हे ही वाचाशरीरातील एका घातक कमतरतेवर मात करणाऱ्या या ५ पदार्थांचं सेवन अत्यंत आवश्यक आहे…!

===

 

औषध :

लसीकरणाला सुरवात झाली असली तरी ती सामान्य लोकांपर्यंत पोहचायला वेळ लागेल मात्र बर्ड फ्लूवर आपल्याकडे औषध आहे.

टॅमी फ्लूच्या गोळ्यांद्वारे हा रोग बरा होतो परंतु ही गोळी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्या नाहीतर, त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात.

याशिवाय रेलेन्झा (relenza), रॅपीवॅप (Rapivab) याही गोळ्या डॉक्टरांकडून दिल्या जातात.

पशुसंवर्धन खाते काय म्हणते :

हा विषाणू अंडी मांस यांच्यातून होत नाही त्यामुळे ते पदार्थ खाऊ शकतात, असे पशु वैद्यकीय खात्याचे मंत्री श्री सुनील केदार ह्यांनी आवाहन केले आहे.

तसेच राज्यातील गावांमध्ये स्थलांतरित पक्षी मृत आढळून आल्यास जवळच्या पशु वैद्यकीय खात्यास संपर्क करावा.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version