छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटकचे? वाचा यामागचा खरा इतिहास!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
गेल्या ६५ वर्षांपासून सुरू असलेला बेळगाव महाराष्ट्र सीमावाद पुन्हा एकदा उफाळून आला.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषणा केली की, ‘जोपर्यंत सीमावाद संपत नाही तोपर्यंत बेळगाव केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करावा!’
त्यावर कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी पलटवार केला त्यांनी मुंबईला केंद्रशासित प्रदेश घोषित करा अशी मागणी केली! हा वाद सुरु असतानाच त्यामध्ये कर्नाटकातील आणखीन एका मंत्र्यांनी उडी घेतली आणि नव्या वादाला तोंड फुटले.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज ह्यांचे वंशज हे मूळ कर्नाटकातले आहे, असे विधान त्यांनी केले आहे. त्यामुळे भाषावाद, सीमावाद आणि आता वंशवाद हा एक नवीन मुद्दा समोर येतोय.
एकूणच भारताचा इतिहास पाहिला तर ठोस पुरावे खूप कमी प्रमाणात आहेत. आपले साम्राज्य वाढवण्याच्या उद्देशाने अनेकदा दुसऱ्या प्रदेशावर हल्ला करून तिथे आपला एक सेनापती नेमला जात असे व त्या सेनापतीचे वंशज हे पुढे तिथला कारभार पाहत असत!
तसेच भारतावर होणाऱ्या परकीय आक्रमणामुळे, नैसर्गिक आपत्तीमुळे अनेकदा लोकांचे स्थलांतर झाले.
तसेच काही संशोधनातून असे निष्कर्षात आले की शिवाजी महाराजांचे वंशज हे राजस्थान मधील आहेत जे मूळचे कर्नाटक मधून स्थालांतरित झाले आहेत.
यामागे इतिहास, संशोधन कितीही गोष्टी असल्या तरी शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचेच आहेत आणि राहतील हे सत्य काही केल्या बदलणार नाही, पण या सगळ्या वादामागे नेमका खरा इतिहास काय ते आपण आज या लेखातून जाणून घ्या!
शिवाजी महाराज आणि बंगलोर :
छत्रपतींचा जन्म शिवनेरीवर झाला असला तरी त्यांचे बालपणीचे काही दिवस हे बंगलोर येथे गेले आहेत कारण त्यांचे वडील शहाजी राजे हे बंगलोर संस्थानाचे जहागीरदार होते.
तिथे ते वडिलांकडून युद्धकौशल्य शिकले तसेच त्यांनी म्हैसूर येथील नरसाराजा ह्यांच्या प्रशासकीय कामाचे कौतुक केले व त्यांची प्रशासकीय धोरणे त्यांनी आपल्या स्वराज्यात राबवण्याचा प्रयत्न केला.
त्यांचे उदाहरण म्हणजे नरसाराजा ह्यांनी आपला अधिकार सांगणारे एक विशेष नाणे जाहीर केले होते.
हीच कल्पना शिवाजी महाराजांनी आपला राज्याभिषेक केल्यावर रायगडावर स्वतःच्या अधिकाराचे शिवराई म्हणून एक नाणे जाहीर केले होते.
शिवाजी महाराजांचा सई बाईंशी विवाह जरी महाराष्टात झाला असला तरी बंगलोर येथे वडिलांदेखत पुन्हा एकदा झाला.
त्यांनतर शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वराज्याची स्थापना केली त्यानंतर त्यांनी अनेकदा दक्षिणेत स्वारी करून अनेक प्रदेश जिंकले. त्यांचे सावत्र बंधू व्यंकोजी तंजावर संस्थानाचे प्रमुख होते आज ही त्यांच्या वंशजांचे वास्तव्य तिकडे आहे.
वाद नक्की कोणता?
बेळगाव सीमावाद वर्षानुवर्षे भिजत पडलेला प्रश्न आहे त्यावर अजून ठोस निर्णय होत नाही, कोणत्याही पक्षाचे सरकार जरी आले तरी हा मुद्दा सोयीस्कररित्या राजकारणासाठी वापरतात पुन्हा जैसे थे!
बेळगावमधील मराठी जनतेला खरंच महाराष्ट्रात यायची इच्छा आहे का? एकीकडे शिवाजी महाराजांचे वंशज आमचे म्हणवणारे रातोरात शिवाजी महाराजांचा पुतळा हलवतात,यातून नेमकं काय सिद्ध होतं?
बंगलोर आज IT हब असले तरी पूर्वी अनेक मराठी वास्तु तिथे अस्तित्वात होत्या त्या कालांतराने नष्ट केल्या गेल्या.
तसेच अनेक मराठी नावं कानडी मध्ये नामांतरित केले. त्यामुळे मंत्री महोदयांच्या ह्या वक्तव्यावरून त्यांचे सरकार महाराजांबद्दल किती जागरूक आहेत ते दिसून येते.
शिवाजी महाराज नक्की कुठले?
ज्या शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी अहोरात्र कष्ट घेतले अनेक प्रदेश स्वराज्यात सामील केले त्यांच्या वंशजावरून आज वाद निर्माण होत आहे.
त्यावर आपली पोळी भाजून घेणारे आहेतच पण त्या पलीकडे जाऊन त्यांनी उभारलेल्या स्वराज्याचा अनेकांना विसर पडलेला आहे.
आपल्याकडे माणूस कोणत्या घरात जन्मलेला आहे ह्यावरूनच त्या माणसाची ओळख ठरते परंतु त्यांने केलेल्या कर्तृत्वाबाद्दल नंतर बोलले जाते. वंशवाद, जातीतीवाद हे सुरु राहतीलच पण त्या माणसाने केलेल्या कर्तृत्वाबद्दल त्यांच्या शिकवणुकीबद्दल फक्त परीक्षेपुरतं लक्षात ठेवले जाते.
शिवाजी महाराज हे साऱ्या रयतेचे राजे होते त्यामुळे ते कोणत्या वंशाचे आहेत हे त्यांच्या रयतेने कधीच विचारले नाही, उलट त्यांच्या कारभारात अठरा पगड जातीचे लोक होते म्हणूनच त्यांना स्वराज्य उभारता आले.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.