अनेक गंभीर आजारांवर लागू होणारा हा रामबाण उपाय नक्की ट्राय करा!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
भारतामध्ये तीन मुख्य ऋतु आहेत. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या तिन्ही ऋतूंचे आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे फायदे आहेत. आपले शारीरिक बदलही ऋतूशी निगडीत असतात.
बाळाचा जन्म झाला की डॉक्टर एक सल्ला नवजात बालकांच्या पालकांना देतात, तो असा की बाळाला सकाळचे कोवळे ऊन दाखवा. आता तुम्ही विचार कराल की कोवळे ऊन दाखविणे म्हणजे काय? या उन्हाचे शरीरासाठी फायदे कोणते?
–
कोवळ्या ऊन्हाची योग्य वेळ
सकाळी ७ वाजता जेव्हा सूर्याचे किरण पृथ्वीवर पडायला सुरवात होते तेव्हा त्यातील पहिल्या काही किरणांना कोवळं ऊन म्हटलं जातं. हे किरण जास्त प्रखर नसतात. जसा दिवस चढत जातो तसे ऊन वाढत जाते.
ऊन दाखविणे म्हणजे फक्त नुसते ऊन पाहणे नव्हे तर काही मिनिटे त्या उन्हात बसणे. किमान २० मिनिटे तरी आपण कोवळ्या उन्हात बसायला हवे.
त्वचेच्या रंगानुसार किती ऊन घ्यावे हेदेखील सांगितले जाते. ज्यांची त्वचा गोरी आहे त्यांनी किमान २० मिनिटे ऊन घ्यावे. तसेच ऊन हे शरीराच्या अधिकाधिक भागापर्यत पोहचायला हवे. परंतु ऊन घेताना तुम्हाला उन्हाची अलर्जी नाही याची खात्री करावी.
ड जीवनस्तवाचा मुख्य स्त्रोत
संपूर्ण जगाला जर कोणत्या जीवनसत्वाची कमतरता भासत असेल तर ते म्हणजे ड जीवनसत्व.
एका रीपोर्टमधून तर अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे ती अशी आहे, की जगात जवळपास एक अब्जावधीहून अधिक लोकांना ड जीवनस्तवाची कमतरता आहे आणि त्यामुळे अशा लोकांना अनेक शारिरीक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
कोणत्याही पदार्थातून जितके ड जीवनसत्व मिळत नाही, तितके हे जीवनसत्व आपल्याला कोवळ्या उन्हातून मिळते.
ड जीवनसत्व हे आपल्या शरीरात सुप्त संप्रेकाच्या स्वरूपात असते. उन्हाची कोवळी किरणे आपल्या शरीरावर पडतात आणि मग जीवनसत्व ड एक्टीव्ह होते.
कॅल्शियम शरीरापर्यत पोहचवण्यासाठी ड जीवनसत्व खूप महत्वाची भूमिका निभावते.
मात्र दिवसभरात कोणत्याही वेळेत मिळणारे सूर्याचे किरण ही ‘ड जीवनसत्व’ निर्माण करत नाहीत. त्यासाठी काही ठराविक वेळेतील उन्हाचे किरण गरजेचे असतात.
अगदी आपण ऋतूचा विचार केला तर हिवाळ्यात अगदी दुपारपर्यंतचे ऊनही उबदार वाटते. पावसाळ्यात ऊन नियमित पडत नसल्याने पावसाळ्यात खूप कडक ऊन अंगावर घेऊ नये. ऑक्टोबर हीटमधील ऊन शरीरासाठी चांगले नसते.
कोवळ्या ऊन्हाचे इतर फायदे
मुडदूस
मुडदुस हा शब्द अनेकदा आपण वाचतो. जिथे बर्फ पडतो आणि जिथे पुरेसा सूर्यप्रकाश नसतो अशा जागेवरील लोकांना हा आजार होतो.
मडदुस म्हणजे शरीराची हाडे ठिसूळ होणे, दात वाकडे होणे, दात उशिरा येणे , वाढ व्यवस्थित न होणे , हातापायांची हाडे वाकडी होणे, त्वचा निस्तेज होणे. ही सर्व लक्षणे मुडदुस या प्रकारात दिसून येतात.
हा आजार बऱ्याचदा लहानमुलांनमध्ये दिसून येतो. अशा आजारांनी ग्रस्त असलेल्या बालकांना कोवळे ऊन घेण्याचा सल्ला दिला जातो. ब आणि क जीवनसत्व कमी असेल तर शरीरातील ड जीवनसत्व कमी होते.
रक्तदाब ,रक्तशर्करा यासारख्या आजारांसाठी उपयुक्त
आजच्या युगात प्रत्येक व्यक्ती हा कोणत्या ना कोणत्या व्याधीने त्रस्त आहे. रक्तदाब आणि रक्तशर्करा यासारख्या व्याधी तर प्रत्येकालाच आहेत. अशा व्याधीसाठी देखील जीवनसत्व ड खूप उपयुक्त ठरते.
रक्तदाब आणि शुगर यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोवळे ऊन अतिशय फायदेशीर असते. कोवळ्या उन्हातून ड जीवनसत्व मिळते.
संधिवात असलेल्या लोकांनी देखील सकाळी कोवळ्या उन्हात बसावे. त्यामुळे त्यांना सांधे दुखीपासून चांगला आराम मिळतो.
ऑस्टिओपोरोसिसच्या, सोरायसिसयासाठी देखील उपयुक्त
ऑस्टिओपोरोसिसच्या आणि सोरायसिस या त्वचेच्या विकारांसाठी ड जीवनसत्व खूप महत्वाची भूमिका निभावते. अनेकांना त्वचेचा कॅन्सरदेखील होतो. यासाठी सुद्धा कोवळे ऊन अतिशय फायदेशीर आहे.
बाळंतपणातदेखील शरीरातील कॅल्शियम कमी होते. अशावेळेस नवजात बालकांच्या मातासाठी कोवळे ऊन फायदेशीर आहे. स्तनपान करणाऱ्या मातासाठी देखील कोवळे ऊन गरजेचे आहे.
रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त
नवजात बालकांमध्ये रोगप्रतिकार शक्ती अतिशय कमी असते, कारण ते जेव्हा उदरात असतात तेव्हा ते अतिशय सुरक्षित वातावरणात वाढत असतात. मातेच्या नाभीकेतील नलिकेमार्फत बाळाला अन्नपुरवठा उत्तमरित्या होत असतो.
–
हे सुद्धा वाचा – रोगप्रतिकारक शक्तीशी निगडीत या ५ लक्षणांकडे दुर्लक्ष करणे म्हणजे स्वतःहून रोगाला आमंत्रण देणे
–
त्यामुळे बाळाची प्रतिकारशक्ती उत्तम असते, पण बाळ जेव्हा बाहेर येते तेव्हा येथील वातावरणामुळे त्याची प्रतिकारशक्ती कमी होते. ते अनेक आजारांना बळी पडते.
कावीळ हा जवळपास सर्व नवजात बालकांना होणारा आजार आहे. यामध्ये बाळाचे संपूर्ण शरीर पिवळसर पडते, पण जर अशा बालकांना कोवळे ऊन दाखवले, तर नक्कीच त्यांना त्याचा फायदा होतो.
त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढते. तसेच नवजात बालकांना ऊन दाखविले तर त्यांची दृष्टी देखील सुधारते. लाहानपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सर्वांनी कोवळ्या उन्हात बसावे कारण प्रतिकार शक्ती वाढणे गरजेचे असते.
त्वचेच्या समस्या दूर होतात
हिवाळ्यात तर अनेकांना त्वचेवर मुरूम येणे, त्वचा काळवंडणे अशा अनेक समस्या उद्भवतात. अशा लोकांनी सुद्धा सकाळच्या कोवळ्या उन्हात बसावे.
शरीराबरोबर मेंदूचा विकासदेखील उत्तमरित्या होतो. कोवळ्या उन्हात मेलाटोनिन हे संप्रेरक असते, त्यामुळे अनिद्रेचा जर त्रास होत असेल तर तो दूर होतो. कोवळ्या उन्हात बसल्यामुळे वजन देखील कमी होण्यास मदत होते.
–
हे ही वाचा – मानवी स्पर्श झाला तर पाने मिटवून घेणारी ही वनस्पती आहे अनेक आजारांवर उपयुक्त!
–
हिवाळ्यात अनेकांना सर्दी – पडसे असे त्रास होतात अशा वेळेस हिवाळ्यात तर नक्कीच कोवळ्या उन्हात बसावे. अशा प्रकारे सकाळचे कोवळे ऊन आपल्यासाठी फायदेशीर आहे.
===
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.