आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
२६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी दिल्लीत उसळलेल्या जनक्षोभाची धग अजूनही कायम आहे. कृषीकायद्याविरोधात आंदोलन छेडलेल्या शेतकऱ्यांनी पोलिसांनी ठरवून दिलेल्या रस्त्याने न जाता दुसऱ्याच रस्त्याने लाल किल्ला गाठला आणि किल्ल्यावर निशाण साहेब आणि शेतकऱ्यांचे लाल-निळे झेंडे फडकवले गेले.
हे सगळं होत असताना पंजाब फिल्म इंडस्ट्री मधली एक नावाजलेली व्यक्ती व्हिडीओ शूट करत होती. त्यावेळी पोलिसांसोबत झालेल्या त्याच्या बाचाबाचीचा व्हिडीओ सुद्धा व्हायरल झाला. त्या भांडणात त्याचे शब्द होते,” यह एक क्रांती है, अगर वो मुद्दे की गंभीरता को नहीं समझते हैं, तो यह क्रांती इस देश और दक्षिण एशिया की भू-राजनीति को परिभाषित करेगी.”
हा व्हिडीओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाली आणि सोबत ती व्यक्ती सुद्धा.
पुढ्यात येऊन ठेपलेली वादाची आग दिसताच किसान नेत्यांनी या व्यक्तीपासून स्वतःला लांब करून घेतले आणि त्या व्यक्तीवर शेतकऱ्यांना चिथावण्याचा आरोप लागला.
ही व्यक्ती होती पंजाबी सिने अभिनेता ‘दीप सिद्धू.’
जसा दीप सिद्धूचा व्हिडीओ व्हायरल झाला तसेच त्याचे जुने फोटो आणि व्हिडीओ यांनाही तोंड फुटलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभा खासदार सनी देओल यांच्या सोबत असलेले त्याचे फोटो वा-याच्या वेगात व्हायरल झाले.
मोर्चा भडकवणारा भाजपचा एजंट म्हणून सोशल मीडियावर त्याची चर्चा सुरु झाली. अखेर स्वतः पुढे येऊन सिद्धूने आपल्या आणि भाजपमध्ये काहीही संबंध नसल्याचे जाहीर केले.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
हे देखील वाचा – कूल वाटतं म्हणून चे ग्वेराचे टी शर्ट्स, फोटोज घेणाऱ्या तरुणांना या माणसाचं क्रूर रूप माहितीच नाहीये
–
तर बघूया हा दीप सिद्धू नक्की आहे कोण?
दीप सिद्धू हा पंजाबच्या मुक्तसर साहेब या जिल्ह्याचा मूळ रहिवासी. त्याचे वडील सुरजित सिंग हे पेश्याने वकील होते. दीपला दोन भावंडं. मोठा नवदीप कॅनडास्थित तर दुसरा मनदीप कायद्याचा अभ्यास करतोय.
दीप सिद्धू स्वतः सुध्दा कायद्याचा विद्यार्थी. दीपचे वडील सोडले तर इतर चुलते पंजाब मध्ये आपली शेती सांभाळत आहेत.
दीप लॉच्या अभ्यासासाठी पुण्यात आला. तिथून पुढे मुंबईला येऊन स्थायिक झाला. इथेच ‘बालाजी फिल्म्स’ च्या एका छोट्या फिल्ममध्ये त्याने लहानसा रोल केला आणि इथूनच त्याचा फिल्मी जगतात प्रवेश झाला.
पंजाबी कलाकार आणि त्याचे स्वतःचा म्युझिक अल्बम नाबी हे शक्यच नाही. पंजाबमध्ये आधी कलाकार सिंगर होतो मग ऍक्टर होतो हे बिरुद सार्थ ठरवत दीपने स्वतःचे अल्बम रिलीज केले आहेत.
कालांतराने संगीत सोडून दीप अभिनय क्षेत्रात आपलं नशीब आजमवायला आला. २०१७ साली अमरदीप सिंग गिल यांच्या ‘जोरा दस नंबरिया’ या फिल्मच्या माध्यमातून दीप पंजाबच्या प्रत्येक घराघरात पोहोचला.
मुंबईमध्ये असताना दीपने अनेक ब्रँड साठी मॉडेल म्हणून काम केले होते. इथूनच त्याची अभिनेता बनायची वाटचाल सुरु झाली होती.
देओल परिवाराच्या घरेलू ‘विजेता फिल्म्स’ या बॅनरखाली दीप सिद्धूला पहिला ब्रेक मिळाला. गुड्डू धानोआ यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘रमता जोगी’ या चित्रपटात सिद्धू अभिनेता म्हणून पहिल्यांदा झळकला. परंतु मोठं प्रोडक्शन बॅनर आणि प्रसिद्ध दिग्दर्शक असताना सुद्धा दीपची ही फिल्म काही कमाल करू शकली नाही.
नंतर साडे आले, जोरा, जोरा सेकंड चाप्टर या चित्रपटांनी सिद्धूला नावलौकिक मिळवून द्यायला मदत केली.
देओल परिवारासोबत जवळीक
वरिष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी दीप सिद्धूचे फोटो ट्विट करून तो भाजप नेत्यांच्या जवळचा असल्याचे आरोप केले. त्यातल्या त्यात भाजप खासदार सनी देओलच्या जवळचा असल्याचे सांगत अनेकांनी त्यांच्या फोटोंनी सोशल मिडीयावर गर्दी केली.
यावर स्पष्टीकरण देताना सिद्धूने स्पष्टीकरण दिले की, “गुरुदासपूर लोकसभा उमेदवारीच्या कॅम्पेनसाठी त्याने सनी देओलचा प्रचार केला होता. याच दरम्यान भाजपच्या वरीष्ठ नेत्यांशी त्याच्या भेटीगाठी झाल्या. पुढे भाजप जॉईन करायचा विचार केला होता पण वैचारिक मतभेदांमुळे हा बेत रद्द केला. ”
पंजाबी बॅकग्राऊंड संगीत आणि फिल्म यामुळे त्याच्या देओल कुटुंबाशी अनेकवेळा भेटीगाठी झाल्या आहेत. त्यामुळे तेव्हांच्या फोटोंचा संबंध आता जोडला जात असल्याचं तो वारंवार सांगतोय.
लाल किल्ल्यावर जे काही घडलं त्यावर फेसबुक लाईव्हव्दारे दीप सिद्धूने स्पष्टीकरण दिलं.
ज्यात तो म्हणतो, “आंदोलनात कोणीही तिरंगा उतरवला नाही. रिकाम्या असलेल्या पोलवर निशाण साहेब आणि किसान एकताचा झेंडा लावला गेला.आणि हा गर्दीचा राग होता, जिथे मी कोणालाही उकसवले नव्हते. आंदोलकांच्या रागाच्या भरात ही घटना घडल्याचे तो सांगतो.
सिद्धू आणि किसान आंदोलन
कृषी कायद्याविरोधात जेव्हा आंदोलन सुरू झालं तेव्हा दीप सिद्धू किसान नेत्यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनात सहभागी झाला. कालांतराने नेतृत्वाच्या निर्णयाबाबत झालेल्या मतभेदांमुळे सिद्धूने सिंघु बॉर्डर वर आपला वेगळा मंच तयार केला.
–
हे देखील वाचा – “शेतकऱ्यांच्या हलाखीस नेहरूंनी लादलेली “जीवघेणी न्यायबंदी” कारणीभूत…”
–
सिद्धूच्या भाषणात किसान बिल ऐवजी संविधानात असलेल्या त्रुटींवर जास्त आक्षेप असायचा. सिद्धू विषय भरकटत आहे हे नेत्यांना कळून चुकले.
त्यामुळे किसान नेतृत्वाने त्याच्या सिंघु बॉर्डरच्या मुख्य मंचावरील भाषणावर बंदी घातली.
दीप सिद्धूने जेव्हा स्वतःच्या सोशल मीडिया अकाउंटवरून भिंद्रेवालाचा फोटो अपलोड केला तेव्हा पासून किसान युनियनने त्याला आपल्यापासून दूर लोटायला सुरवात केली. त्यामुळे दीपने आपल्या समर्थकांना या आंदोलनापासून दूर होण्यास सांगितले. मात्र जेव्हा २६ जानेवारीला ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन करण्यात आले तेव्हा तो पुन्हा आंदोलनात सक्रिय झाला.
मोर्च्यादरम्यान मंगळवारी जेव्हा आंदोलकांचे एक दल लाल किल्ल्याजवळ पोहोचलाे तेंव्हा त्यांच्यासोबत दीप सिद्धू देखील तिथे होता. एवढंच नव्हे तर तो ठीक तिथेच होता जिथे निशाण साहेब झेंडा फडकवला गेला.
वादग्रस्त कृती ठिकाणी त्याची उपस्थिती आणि वादग्रस्त वक्तव्यांमूळे दीप सिद्धू आज किसान आंदोलनासह चर्चेचा विषय झाला आहे.
चंदेरी पडद्यावर प्रेक्षकांना आपल्या संगीताने भुरळ घालणा-या या दीपने शेतक-यांना आपल्या तालावर नाचवले, चिथवले अशा अनेक आरोपांच्या गराड्यात आज दीप अडकला आहे.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.