आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
लेखक – मिलिंद वेर्लेकर
===
सकाळी नेहमीप्रमाणे पुण्यातल्या टिळक रोडवरच्या ग्राहक पेठेत महिन्याचे किराणा सामान आणायला गेलो होतो. घरातले हे महत्वाचे काम माझ्याकडे असते आणि जे मला मनापासून प्रचंड आवडते. त्यामुळेच उच्च प्रतीच्या मालापासून ते पैसे वाचवणारी उत्तमोत्तम डील्स मिळतात. म्हणून वेळात वेळ काढून मी नित्यनियमाने गर्दीच्या वेळा टाळून आणि भरपूर निवांत वेळ काढून अगदी एकटाच ग्राहक पेठेत जात असतो.
कालही असाच गेलो असता एक अत्यंत सुंदर दृश्य मी ग्राहक पेठेत अनुभवलं. ग्राहक पेठेत शब्दश: सर्व प्रकारच्या सामानाचे अनेकानेक ब्रँड्स उपलब्ध असतात. यात स्वदेशीसोबत विदेशी कंपन्यांचे ब्रॅण्ड्स देखील मुबलक असतात.
आखीव रेखीव मांडणी सोबत, माहितीपूर्ण असे बोर्ड्स आणि अनेक प्रॉडक्टसोबत तुम्ही किती पैसे वाचवता आहात हे सुद्धा बऱ्याच ठिकाणी लिहिलेले बोर्ड्स ठळकपणे लटकवलेले असतात.
आता या काल क्लिकलेल्या या तीन फोटोंबद्दल माहिती ज्यासाठी मी ही पोस्ट कौतुकाने लिहितोय आणि आपण सर्वांनीही याचे अनुकरण करावे अशी माझी आग्रही विनंती आहे.
ग्राहक पेठेत ट्रॉली घेऊन फिरताना मी साबणांच्या सेक्शनमध्ये आलो जिथे मी हे फोटो क्लिकलेत. या साबणांच्या सेक्शनमध्ये जिथे जिथे विदेशी परकीय कंपन्यांच्या ब्रँड्सचे साबण विक्रीसाठी मांडून ठेवले होते उदाहरणार्थ डेटॉल, लाईफबॉय, लक्स वगैरे तिथे तिथे ‘विदेशी’ असे ठळकपणे लिहिलेले बोर्ड्स लावून ठेवले होते…
शेजारच्याच रॅकवर जिथे जिथे स्वदेशी भारतीय कंपन्यांचे ब्रॅण्ड्स मांडून ठेवले होते उदाहरणार्थ सॅव्हलॉन, पतंजली वगैरे तिथे तिथे ‘स्वदेशी’ असे बोर्ड्स नेमकेपणे मांडले होते.
भारतात डॉ. मनमोहन सिंगांनी पंतप्रधान असताना मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारली आणि त्यामुळे जागतिक ब्रँड्स भारतात स्पर्धेस्तव उतरले. आणि स्वदेशी ब्रॅण्ड्सना मालाच्या दर्जासोबतच मार्केटिंगमध्ये सुद्धा दणकट स्पर्धेला तोंड देणे भाग पडू लागले.
म्हणूनच याच मुक्त बाजारपद्धतीला फॉलो करत ग्राहक पेठेने स्वदेशीसोबतच विदेशी ब्रॅण्ड्सच्या वस्तू सुद्धा मुबलकपणे विक्रीला उपलब्ध करून दिल्या आहेत.
परंतु ग्राहक पेठेत येणाऱ्या ग्राहकांना हातात केवळ स्वदेशी वस्तूंची एक यादी देण्याऐवजी चिकाटीने, कष्टपूर्वक सर्वच्या सर्व, अक्षरश: हजारो प्रॉडक्ट्सवर ‘स्वदेशी अन विदेशी’ असे माहितीपर बोर्ड्स निग्रहाने लावले जेणेकरून ग्राहकांना स्वदेशी आणि विदेशी मालाची नेमकी पारख करून माल घेता येऊ शकेल.
इतकं करून ग्राहक पेठ थांबली नाही तर जिथे जिथे सर्वदूर विदेशी प्रॉडक्ट्स ठेवली आहेत तिथे तिथे ‘भारताला आत्मनिर्भर करायला स्वदेशी वस्तू वापरा’ असा संदेश देणारे स्वामी विवेकानंदांचा फोटो असणारे बोर्ड्स सुद्धा जागोजागी लावले.
म्हणजेच तुमच्या आवडीनिवडी प्रमाणे तुम्ही विदेशी ब्रॅण्डचा माल घ्यायला गेलातच तरी शेवटच्या क्षणी तुमच्यातल्या राष्ट्रप्रेमी नागरिकाच्या भारतीयत्वाला स्वदेशीची हाक घालून तुम्हाला भारताला आत्मनिर्भर करण्यासाठी स्वदेशी घेण्याची विनंती केलीये.
अफाट आवडलं मला हे सगळं, गेली कित्येक वर्ष आम्ही सर्व वेर्लेकर्स केवळ स्वदेशी वस्तू विकत घेतोय पण अत्यावश्यक ठिकाणी जिथे भारतीय ब्रॅण्ड्स उपलब्धच नाहीत आणि त्या विदेशी ब्रॅण्ड्सच्या गोष्टी वापरणं जेव्हा अत्यावश्यकच आहे त्या सर्व या ठिकाणी मात्र विदेशी ब्रँड्स नाईलाजाने का होईना वापरतोय.
त्यामुळेच स्वदेशी आणि विदेशी वस्तूंच्या याद्याच्या याद्या आम्हाला तोंडपाठ आहेत हे जरी खरं असलं, तरी जेव्हा आपण थेट वस्तू विकत घेतो तेव्हा जर अशी सोय उपलब्ध असते तेव्हा सर्व ग्राहकांना हे फारच सोयीचे ठरते आणि साहजिकच ग्राहक तुलना करून का होईना स्वदेशी सामान विकत घेतो असा माझा अनुभव आहे.
म्हणजेच स्वदेशीचा व्यर्थ अभिमान न बाळगता आणि विदेशीचा अकारण दुःस्वास न करता, स्वदेशी प्रॉडक्ट्सना सुद्धा स्वतःचा सर्वांगीण दर्जा उंचावण्याची सर्व संधी ग्राहक पेठ या निमित्ताने उत्पादकांना देते हे विशेष.
ग्राहक पेठेचे मनःपूर्वक अभिनंदन या कौतुकास्पद अन अनुकरणीय उपक्रमासाठी!
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.