समुद्राच्या पाण्याखाली विराजमान असलेलं भारतातलं अद्भुत “शिव” मंदिर!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
आपला भारत म्हणजे चमत्कारिक गोष्टींची खाणचं आहे जणू! भारतात अशी काही आश्चर्यकारक ठिकाणे आहेत की ज्याचं अस्तित्व आपल्याला स्तब्ध करून सोडतं आणि त्यांच्याबद्दलचं कुतुहूल काही केल्या आपली पाठ सोडत नाही.
आपल्या अद्भुत भारतामधील असंच एक ठिकाण म्हणजे समुद्रात पाण्याखाली असलेलं भगवान शंकराचं मंदिर होय!
काय म्हणता? अजूनही या मंदिराबद्दल तुम्हाला माहित नाही? चला तर मग जाणून घेऊया या अति आश्चर्यकारक मंदिराबद्दल!
भगवान शंकरांचं हे मंदिर निशकलंकेश्वराचं मंदिर म्हणून ओळखलं जातं. जगातील अतिरंजक मंदिरांमध्ये या मंदिराचा समावेश होतो हे विशेष!
–
- निसर्गाच्या सानिध्यातील स्वयंभू शिवशंकर! रत्नागिरीतल्या नयनरम्य मंदिराला भेट द्याच
- रुसलेल्या मेव्हण्यामुळे भगवान शंकराला मिळाली हक्काची सासुरवाडी…!
–
गुजरातच्या भावनगरमधील अरबी समुद्री पट्ट्यात हे मंदिर स्थित आहे. किनाऱ्यापासून दीड किलोमीटर आत पाण्यात गेल्यावर मंदिरात पोहचता येतं.
येथील ५ शिवलिंगाची स्थापना पांडवांनी केल्याचे सांगितले जाते. याच शिवलिंगांचे दर्शन घेण्यासाठी आणि त्यांची मनोभावे पूजा करण्यासाठी भाविक इथे मोठ्या संख्येने हजर होतात.
या मंदिराचं मुख्य आकर्षण म्हणजे त्याचं पाण्यात असलेलं स्थान होय. भरतीच्या वेळी हे मंदिर पूर्णपणे पाण्याखाली जातं. भरतीच्या वेळी पाहिल्यास लांबवर पसरलेला केवळ समुद्र नजरेस पडतो, त्यामुळे एखाद्या नवख्यास शंका यावी कि खरोखर इथे एखादे मंदिर आहे कि नाही? भर समुद्रामध्ये केवळ मंदिराच्या वरचा झेंडा तेवढा नजरेस पडतो.
पण ओहोटीच्या वेळी मात्र संपूर्ण मंदिर परिसर नजरेस पडतो. समुद्राच्या लाटांनी स्नान घातल्यावर जेव्हा हे मंदिर उघडे होते तेव्हा त्याचे रूप पाहण्यासारखे आहे.
ज्या प्रमाणे पांडवांनी आपल्या सर्व पापे धुवून जावीत म्हणून या शिवलिंगांची स्थापना केली होत त्याचप्रमाणे दर भरतीवेळी जणू हे मंदिर आपल्या सर्व भक्तांची पापे धुवून टाकतं असा एक समज या परिसरात रूढ आहे.
या मंदिराच्या खांबांची उंची २० फुट इतकी आहे. दुपारी १ च्या आधी समुद्राच पाणी या खांबाना देखील आपल्या कवेत घेतं.
भाविकांसाठी मंदिर प्रवेशाची वेळ दुपारी १ नंतर रात्री १० वाजेपर्यंत असते. या काळात समुद्र आपल्या लाडक्या देवाच्या भेटीसाठी जाणून भक्तांना वाट मोकळी करून देतो.
–
- देवांचा देव भगवान शंकराच्या “तिसऱ्या डोळ्याविषयी” या काही आख्यायिका जाणून घ्या!
- असुरांच्या नाशासाठी भगवान शंकरांनी घेतला अवतार, ‘महाबळेश्वर मंदिरा’ची कथा
–
१० नंतर पुन्हा एकदा समुद्र आपले मूळ रूप धारण करतो आणि लाटांच्या सानिध्यात मंदिर जाणून शांत झोपी जाते.
तर अश्या या अद्भुत भारतातील अद्भुत मंदिराला एकदा तरी एका वेगळ्या अनुभवासाठी भेट दिलीच पाहिजे!
(हे देखील वाचा: भगवान शंकरांचे स्थान ‘कैलास’ : जगातील सर्वात रहस्यमयी पर्वत)
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.