' काकडीचे ‘सगळे’ फायदे माहित नसतील, तर आरोग्य उत्तम राखणं खूपच कठीण जाईल! – InMarathi

काकडीचे ‘सगळे’ फायदे माहित नसतील, तर आरोग्य उत्तम राखणं खूपच कठीण जाईल!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

काकडी म्हणजे आपल्या स्वयंपाक घरातील एक तोंडी लावणे प्रकारातील खाद्यपदार्थ! काकडीचे विविध गुणधर्म म्हणजे त्यात भरपूर प्रमाणात पाणी असतं.

त्यात विविध व्हिटॅमिन्स असतात, जसे की व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन सी, तसंच मॅंगनीज, पोटॅशियम बीटा कॅरोटीन इत्यादी घटकही असतात, जे आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात.

कधी नुसती खाण्यासाठी, कधी सलाड म्हणून खाण्यासाठी, तर कधी कोशिंबीर म्हणून खाण्यासाठी आपण काकडी वापरतो. आपण काकडी खावी म्हणून लहानपणी आई आपल्याला धाक दाखवूनही काकडी खाऊ घालते.

कधी कधी मुलं काकडी खात नाहीत म्हणून विविध पदार्थात त्याचा वापर करून छुप्या पद्धतीने मुलांना काकडी खाऊ घालतात. कधीकधी या काकडीचा रस काढून त्यापासून वेगळी ड्रिंक्स तयार करून देखील मुलांना दिली जातात.

या सगळ्या मागचा उद्देश हाच असतो की आपल्या मुलांना अनेक व्हिटॅमिन्स, प्रोटिन्सची गरज आहे ती काकडीतून पूर्ण व्हावी.

मुलांच्या जिभेला काकडीची चव हवीहवीशी वाटावी. कधी कधी मुलं खेळण्याच्या नादात पाणी प्यायला विसरतात. काकडी थंड असते, त्यामुळे त्यांच्या शरीरातील पाण्याची कमी झालेली पातळी वाढण्यास मदत होते. कारण, काकडीमुळे शरीरातील पाण्याची पातळीही व्यवस्थित राहते.

 

cucumber-inmarathi

 

काकडी खाणं जितकं फायदेशीर आहे, तितकाच तिचा वापर आपल्या चेहऱ्यावर किंवा बाहेरून वापर केल्यावर सुद्धा ती फायदेशीर ठरते.

सौंदर्य खुलवण्यासाठी कुठेही बाहेर जायची गरज नाही किंवा भरमसाठ पैसे खर्च करण्याची तर बिलकुल गरज नाही. काकडीच्या वापराने देखील आपलं सौंदर्य खुलतं. काकडीचा वापर केल्याने आपलं सौंदर्य कसं खुलतं ते पाहू…

 

१. कोरड्या त्वचेसाठी उपयोगी

काकडीमध्ये ९६ टक्के पाणी असतं. त्यामुळे काकडी कोरड्या त्वचेसाठी खूपच उपयुक्त आहे. जर तुमचा चेहरा कोरडा पडत असेल तर अगदी मॉइश्चरायझर लावण्याचीही गरज लागणार नाही.

यासाठी काकडी किसून तिचा रस काढून घेऊन त्यामध्ये तितकंच दही मिसळल्यास एक प्रकारचा फेस पॅक तयार होईल. तो चेहऱ्याला लावून ठेवावा आणि वाळल्यावर चेहरा धुवावा.

काकडी आणि दही हे नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणूनच काम करतात. त्यामुळे चेहऱ्याला थंडावा देखील मिळतो.

 

cucumber-curd-inmarathi

 

२. तेलकट चेहऱ्यासाठी

जर तुम्हाला उन्हात फिरावं लागत असेल आणि त्यामुळे चेहरा काळा पडला असेल, किंवा चेहरा तेलकट असेल तर काकडी या प्रकारच्या त्वचेसाठी देखील उपयुक्त आहे. याचा अर्थ काकडी हे नैसर्गिक टोनर म्हणून काम करते.

 

oily skin inmarathi

 

काकडीच्या रसामुळे चेहऱ्यावरील डाग कमी होतात. कोणतंही ब्युटी प्रोडक्ट वापरलं, तर त्वचेचं नुकसान होईल का याची भीती वाटते. काकडी वापरल्यावर चेहऱ्याचं नुकसान कधीच होणार नाही. उलट चेहरा चमकदार होईल.

यासाठी काकडी, लिंबाचा रस आणि हळद मिक्स करून पॅक तयार करावा आणि चेहऱ्याला लावावा. पॅक वाळल्यावर चेहरा थंड पाण्याने धुवावा.

३. चेहऱ्याचे टॅनिंग आणि चट्टे कमी करते

काकडीचा रस चेहऱ्यावर लावल्यामुळे उन्हामुळे झालेले टॅनिंग तसंच चेहऱ्यावर पडलेले डाग, चट्टे कमी होतात आणि चेहरा उजळतो. जर आपल्याला उजळलेला, प्रसन्न चेहरा हवा असेल तर काकडी आणि लिंबाचा रस मिसळून पॅक तयार करावा आणि तो चेहऱ्याला लावावा.

हे सुद्धा वाचा – केवळ आवड म्हणून खाल्ला जाणारा हा पदार्थ आरोग्यासाठी किती लाभदायी आहे याची तुम्हाला कल्पनाही नसेल

पंधरा मिनिटं हा पॅक चेहऱ्यावर ठेवावा आणि नंतर थंड पाण्याने धुऊन घ्यावा. केवळ काही आठवडे असं केल्यास तुमच्या चेहऱ्यात काय फरक पडतो हे तुम्हालाच दिसून येईल. अगदी शरीरावर इतर कुठेही टॅनिंग वाटत असेल, तरी हा पॅक वापरल्यास नक्कीच फरक पडेल.

 

washing face inmarathi

 

४. वृद्धत्वाच्या खुणा लवकर येत नाहीत

चेहऱ्याची काळजी न घेतल्यास अनेकांना अकाली वृद्धत्व आल्यासारखं दिसतं. चेहऱ्यावर सुरकुत्या दिसतात, सूक्ष्म रेषा दिसतात आणि व्यक्ती आहे त्या वयापेक्षा जास्त प्रौढ वाटायला लागते. पण काकडीचा वापर केल्यास या खुणा लवकर दिसणार नाहीत.

काकडीमध्ये असलेल्या पोटॅशियम आणि मँगनीजमुळे चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कमी होतील. काकडीचा रस आणि अंड्यातील पांढरा भाग एकत्र करून चेहऱ्याला लावल्यास त्याचा नक्कीच फायदा होईल.

 

cucumber-egg-inmarathi

 

अंड्याचा वास जर सहन होत नसेल तर केवळ दहा ते पंधरा मिनिटे हा पॅक लावून ठेवावा आणि चेहरा थंड पाण्याने धुवावा.

५. डोळ्याखालील काळी वर्तुळे

आज-काल राहणीमान खूपच बदललेलं आहे. वेळी-अवेळी खाणं, अर्धवट झोप, सतत टीव्ही, मोबाइल, लॅपटॉप यांच्या स्क्रीनकडे पाहून डोळ्यांखाली काळी वर्तुळं तयार होतात. तसेच डोळ्यांचा खालचा भाग हा सुजल्यासारखा वाटतो.

 

black-circles-under-eyes-inmarathi

 

अशा वेळेस काय करावं हे कळत नाही. डोळ्याखाली कोणतंही क्रीम लावायला नको वाटतं. त्यावेळी काकडी कापून काकडीचे काप डोळ्यावर पंधरा मिनिटं ठेवल्यास त्याचा नक्कीच फायदा होईल. काही दिवसातच डोळ्याखालची वर्तुळे नाहीशी होतील, डोळ्याखालचा फुगवटा कमी होईल.

६. केसांच्या मजबुतीसाठी

सगळ्यांनाच आपल्या केसांची खूप काळजी असते. आपले केस चांगले राहावेत यासाठी लोक हरतऱ्हेने प्रयत्न करतात. त्यांच्यासाठी सुद्धा काकडी उपयुक्त आहे. यासाठी वेगळं काही करायची गरज नाही.

तुमच्या रोजच्या आहारात काकडीचा समावेश असावा. तसंच काकडीचा ज्यूस रोज प्यावा. कधीकधी आंघोळीच्या पाण्यात ही काकडीचा रस मिसळावा आणि त्याने केस धुवावेत.

 

hair wash inmarathi

 

७. केस चमकदार होण्यासाठी

जरी केस लांब आणि मजबूत झाले तरी सगळ्यांना आपले केस चमकदार असावेत ते छान ग्लॉसी दिसावेत असं वाटतं. तर त्याच्यासाठीदेखील काकडीचा एक हेअर पॅक वापरता येऊ शकतो. ज्यामुळे केस मजबूतच नाही, तर चमकदार होतील.

 

hair spa inmarathi

 

त्यासाठी काकडी, ऑलिव ऑइल आणि एक अंड एकत्र करून मिक्सरमध्ये फिरवून पॅक तयार करावा आणि तो केसांना फक्त १० मिनिटं लावून ठेवावा आणि त्या नंतर केस धुऊन घ्यावेत केस एकदम चमकदार होतील.

हे सुद्धा वाचा – अनेक आरोग्यादायी फायदे देणारा पदार्थ तुमच्या घरात आहे! कोणता पदार्थ? जाणून घ्या.

अशी ही काकडी, आपल्या घरातल्या फ्रिजमध्ये नेहमी सापडणारी, सलाड म्हणून खाता येणारी, हेल्दी ड्रिंक म्हणून पिता येणारी त्याचबरोबर आपलं ब्युटी प्रोडक्ट म्हणूनही काम करणारी.

 

cucumber-inmarathi

 

तिचा वापर रोज आपल्या आहारात आणि ब्युटी प्रोडक्टमध्ये केल्यास आपल्या चेहऱ्याचं सौंदर्य नक्कीच उठून दिसेल.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?