Site icon InMarathi

हजारो अपयशानंतर ६२व्या वर्षी सुरु केलेला धंदा, आणि मग त्याला अख्ख्या जगाने डोक्यावर घेतलं

kfc inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

===

सर्वसाधारणपणे आपण पाहतो की साठी उलटल्यावर माणसाची जगण्याची इच्छा हळू हळू कमी होत जाते. साठी नंतर ‘आता काय माझं वय झालंय! आता काय जमणार आहे मला! आता फक्त उरलेलं आयुष्य बोनस समजून आला दिवस ढकलायचा!’ असा विचार करणारे बरेच सापडतील.

 

covaicare.com

पण जगात असेही काही लोक आहेत जे साठाव्या वर्षी सुद्धा १६ वर्षाच्या तरुण मुलाइतके उत्साही असतात आणि वाढणाऱ्या वयापुढे, कमी झालेल्या शक्तीपुढे, वयानुसार जडलेल्या शारीरिक व्याधींपुढे हार न मानता उत्साहाने आयुष्य जगतात. नवे काही करून पाहतात.

सामान्य माणसाला तर तरुण असताना सुद्धा बिझनेस करून रिस्क घेण्याची भीती वाटते. पण हे उत्साहाचे झरे मात्र सर्वांना प्रेरणा मिळेल असे काम करतात. अश्याच एका साठी पार केलेल्या म्हाताऱ्याने ६२ व्या वर्षी नव्या व्यवसायाची सुरुवात केली आणि बघता बघता जगभरातील चिकणप्रेमी लोकांची चिकन खाण्याची पद्धतच बदलून टाकली…ती ही एकट्याच्या जीवावर!

 

हे ही वाचा –

===

 

हा नवा व्यवसाय म्हणजे – सर्वांच्या परिचयाची प्रसिद्ध KFC चिकन रेस्टोरंट चेन!

 

 

तुम्हाला जेव्हा आयुष्यात कुठल्याही टप्प्यावर असे वाटले कि आयुष्यात आपण काहीच केले नाही, सतत अपयशाला सामोरे जातोय, आता नवीन काही सुरु करू शकत नाही कारण वय वाढत चाललंय!

तेव्हा एकच गोष्ट लक्षात ठेवा कि Colonel Sanders ह्यांनी त्यांचा KFC हा बिझनेस वयाच्या ६२ व्या वर्षी सुरु केला. आणि नंतर तो इतका वाढवला कि केएफसी ही जगातल्या सर्वात मोठ्या फूड चेन्स पैकी एक म्हणून ओळखली जाऊ लागली.

अर्थात ह्या यशामागे अनेक दुःखद, कठीण प्रसंगांची मालिका आणि तयांचयावर मात करण्याची सँडर्स ची चिकाटी होती.

Colonel Sanders ह्यांचे वडील ते खूप लहान असताना मरण पावले. त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. ह्या परिस्थितीमुळे Sanders वयाच्या केवळ ७ व्या वर्षी स्वयंपाक करायला शिकले. त्यांनी नंतर इंडस्ट्रीयल सेल्समन म्हणून काम करणे सुरु केले.

काही वर्ष त्यांनी उपजीविकेसाठी टायर विकणे, फेरी बोट चालवणे, रेल्वेचे वाफेचे इंजिन चालवणे अशी लहानसहान कामे केली. वयाच्या ४०व्या वर्षी त्यांना Kentucky येथील कॉर्बीन येथे एका सर्विस स्टेशनवर कुकिंग चे काम करण्याची संधी मिळाली.

त्यांनी काही तिकडचे दाक्षिणात्य पदार्थ प्रवाश्यांना बनवून विकण्याचे काम केले. त्यांचे पदार्थ लोकांना इतके आवडले कि हळू हळू त्या सर्विस स्टेशनचे एका हॉटेल मध्ये रुपांतर झाले.

हौशी सँडर्स त्यांच्या चिकन रेसिपीवर सारखे प्रयोग करत असत. चिकनच्या “परफेक्ट पाककृती” साठी ते वर्षानुवर्ष सतत प्रयत्न करीत होते. शेवटी १९३९ साली त्यांनी त्यांच्या फेमस चिकनची पाककृती शोधून काढली.

आपल्या ह्या नव्या रेसिपीवर कर्नल प्रचंड खुश होते आणि त्यांची इच्छा होती की ही चव अधिकाधिक खवैय्यांच्या जिभेवर रुळावी.

 

 

मग काय – ६२ वर्षांच्या ह्या तरूणाने गल्लोगल्ली, दारोदारी फिरणं सुरू केलं. कल्पना ही होती की ह्यांनी आपल्या चिकनची माहिती द्यायची आणि समोरच्याने तयारी दाखवली तर त्याच्या समोर चिकन बनवून द्यायचं! परंतु अपेक्षेनुसार प्रतिसाद मिळाला नाही. कुणीच सँडर्स चं चिकन टेस्ट करायला तयार नव्हतं. सँडर्स ने कार काढून आपल्या परिसरातील सर्व रेस्टोरंट पालथे घातले. त्यांची डील स्पष्ट होती –

माझं चिकन चाखून बघा, आवडलं तर तुमच्या हॉटेलमध्ये ते विका!

पण शून्य प्रतिसाद.

किती वेळा? तब्ब्ल १००९ वेळा.

कल्पना करा – एक वृद्ध मनुष्य एका मागे एक सलग १००९ रिजेक्शन्स पचवतोय! पण म्हातारा हरला नाही! स्वतःच्या रेसिपीवरील विश्वास आणि चिकाटीच्या जोरावर “One more time!” म्हणत पुढे सरकत राहिला.

आणि शेवटी यश मिळालं. पहिला होकार मिळाला…!

Pete Harman – ज्यांचे स्वतःचे हॉटेल होते, त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. सॅन्डर्सने त्यांच्याशी भागीदारी केली आणि त्यांच्या स्पेशल चिकनला Kentucky Fried Chicken असे नाव दिले.

हे ही वाचा –

===

 

कर्नल सँडर्स, हर्मन सोबत

 

इथून सॅन्डर्सने मागे वळून बघितलं नाही. बघता बघता १९६४ सालापर्यंत अमेरिकेतील ६०० पेक्षा जास्त हॉटेलमध्ये Kentucky Fried Chicken विकले जात होते.

त्यांचे चिकन लोकांमध्ये इतके प्रसिद्ध झाले कि Kentucky च्या राज्यपालांनी Sanders ह्यांना १९५० साली Colonel हि पदवी बहाल केली.

ह्या झपाटल्यासारख्या कामाचा परिणाम फार लवकर दिसून आला – एका दशकानंतर Colonel Sanders जगातले दुसऱ्या क्रमांकाचे लोकप्रिय सेलेब्रिटी झाले.

 

theverge.com

 

त्यानंतर जेव्हा Sanders ह्यांच्या लक्षात आले कि केएफसी आता जगप्रसिद्ध झाले आहे आणि त्यावर आणखी मेहनत घेऊन काम करण्याची गरज आहे – तेव्हा, १९६५ साली, त्यांनी त्यांच्या कंपनीचे हक्क २ मिलियन डॉलरला विकले.

पण केएफसी चे ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून ते कायम राहिले आणि त्यासाठी त्यांना आयुष्यभर ७५,००० डॉलर मिळतील असा करार झाला.

त्यांनी त्यांचे कॅनडा मधील रेस्टॉरंट मात्र स्वतःच्या मालकीचे ठेवले. त्यानंतर केएफ़सी जगात किती लोकप्रिय झाले हे सर्वांनाच माहित आहे. Colonel ह्यांनी स्वतःची ओळख पांढऱ्या रंगाचा सूट आणि प्रसिद्ध Kentucky Colonel टाय घातलेले गृहस्थ अशी तयार केली.

 

चीन मधील पहिल्या KFC रेस्टोरंट बाहेरची गर्दी आणि कर्नलचा पुतळा. (स्रोत: china-mike.com)

 

कुणालाही विश्वास बसणार नाही अशा पद्धतीचे यश Sanders ह्यांना मिळाले ते ही वयाच्या साठीनंतर, जेव्हा बहुसंख्य लोक फक्त आपण म्हातारे झालो म्हणून दु:खी असतात.

खरं सांगायचं झालं तर Colonel Sanders ह्यांचे ध्येय पैसा कमावणे कधीच नव्हते. त्यांना फक्त त्यांचे स्पेशल चिकन लोकांना खाऊ घालायचे होते आणि स्वतःची ‘जगातील सर्वोत्तम चिकन बनवणारे’ अशी ओळख मिळवायची होती. त्यासाठी त्यांनी आयुष्यभर मन लावून प्रयत्न केले आणि भरपूर कष्टही केले. त्याचे फळ त्यांना मिळाले.

पैसा तर मिळालाच परंतू ‘केएफसी म्हणजे जगातील सर्वोत्तम चिकन’ अशी ओळख सुद्धा मिळाली.

त्यांच्यासाठी पैसा महत्वाचा नव्हता तर त्यांनी बनवलेल्या पदार्थाची चव आणि क्वालिटी सर्वोत्तम असावी असा त्यांचा ध्यास होता. ह्याच ध्यासाच्या दिशेने KFC आजतागायत प्रगती करत आहे.

pinterest.com/explore/history-of-kfc/

आयुष्यात ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करताना सुरुवातीला अपयश मिळणार, यश मिळवणे सोपे नक्कीच नाही आणि त्याची कुणी खात्रीही देऊ शकत नाही. पण स्वतःच्या मनाचा कौल घेऊन तुम्ही मार्ग शोधलात तर यश तुमचेच आहे. भलेही मग तुमचे वय कितीही असो!

Colonel Sanders नी त्यांच्या मनाचा कौल ऐकला आणि त्यांना त्यांचा मार्ग सापडला…तुम्हीही विचार करा…कदाचित तुम्हालाही तुमचा मार्ग सापडेल!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version