वाचा, सामान्यांचं अंतराळात फिरायचं स्वप्न पूर्ण करणाऱ्या या उद्योगपतीबद्दल!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
इलॉन मस्क – आजच्या घडीचा जगातील सर्वात श्रीमंत माणूस. ‘टेस्ला’ या इलेक्ट्रीकल कार कंपनीचे संचालक. जुलै २००३ मध्ये अमेरिकेत स्थापन झालेल्या टेस्ला या कंपनीने केलेली प्रगती आणि इलॉन मस्क यांचा १८ वर्षांचा प्रवास हा थक्क करणारा आहे.
‘टेस्ला‘ हे नाव कंपनीच्या इलेक्ट्रिकल इंजिनियर निकोला टेस्ला यांच्या नावावरून देण्यात आलं आहे. इलॉन मस्क हे २००८ पासून कंपनी चे CEO म्हणून कार्यरत आहेत.
टेस्ला कार तयार करण्याचा उद्देश इलॉन मस्क यांनी, “इलेक्ट्रिकल आणि सौर ऊर्जेचा योग्य विनियोग व्हावा” हे सांगितलं होतं.
२००८ हा तो काळ होता जेव्हा मर्सिडीज बेंझ सारख्या पेट्रोल कारची मार्केट मध्ये धूम होती.
त्या काळात इलेक्ट्रिकल कार तयार करण्यात गुंतवणूक करणे आणि २०१९ मध्ये ‘टेस्ला’ कारला जगातील पहिल्या क्रमांकाची ‘प्लग-इन’ कार हा बहुमान मिळवून देण्यात इलॉन मस्क यांचं कुशल नेतृत्व दिसून येतं.
टेस्ला मधील इलॉन मस्कचा प्रवास हा एक गुंतवणूकदार म्हणून सुरू झाला होता. २००९ पासून त्यांना ‘को-फाउंडर’ हे पद सुद्धा देण्यात आलं.
कंपनीचा पदभार सांभाळताना इलॉन मस्क यांचा भर हा ‘मध्यमवर्गीय लोकांना विकत घेता येईल अशा ‘इलेक्ट्रिकल कार’ याकडेच होता. त्यासोबतच, या ग्रुपला अशी कंपनी व्हायची होती, ज्या कंपनी मध्ये कार तयार करण्यासोबतच तंत्रज्ञानाची जोड असेल.
सध्या टेस्लाने भारतावर लक्ष केंद्रित केलं आहे. ‘पेट्रोल वर होणारा खर्च कमी होणार’ यामुळे टेस्लाचं नक्कीच स्वागत होईल.
काही प्रश्न अनुत्तरित राहतात की, इलॉन मस्क हा जगातील सर्वात श्रीमंत माणूस कसा झाला? एक व्यक्ती म्हणून त्यांचा हा प्रवास कसा होता? जाणून घेऊयात.
इलॉन मस्क यांचा जन्म १९७१ मध्ये प्रिटोरिया येथे झाला होता. १७ व्या वर्षी ते कॅनडाला आले. १२ व्या वर्षी त्यांनी ‘ब्लास्टर’ हा एक व्हिडिओ गेम तयार केला होता. या गेमचं कोडिंग इलॉन मस्क यांनी केलं होतं.
दक्षिण आफ्रिकेच्या एका कंपनीने त्या गेम चे हक्क ५०० युएस डॉलर्स मध्ये विकत घेतले होते.
पदवीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर इलॉन मस्क हे कॅलिफोर्नियाला पदव्युत्तर शिक्षणासाठी गेले होते. पण, त्यांनी ते शिक्षण दोन दिवसातच सोडून दिलं आणि स्वतःची ‘झीप २ कॉर्पोरेशन’ ही कंपनी सुरू केली.
आजपर्यंत इलॉन मस्कने आठ कंपन्यांची स्थापना केली आहे. टेस्ला मधून इलॉन मस्क पगार घेतात तो फक्त १ युएस डॉलर इतका आहे. त्यांची पूर्ण कमाई ही शेअर्स मधून त्यांना मिळते.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
===
हे ही वाचा – शब्दांनी नव्हे तर कृतीतून अपमानाची परतफेड कशी करावी हे सांगणारी टाटांची ही कथा
===
रोबोटिक्स, टेक्नॉलॉजीचं प्रचंड वेड असलेल्या इलॉन मस्क यांनी २०१३ मध्ये टेस्ला ‘गुगल’ कंपनीला विकण्याचा निर्णय घेतला होता. पण, काही कारणांमुळे नंतर तसं झालं नाही.
ऍपल च्या CEO ने तर इलॉन मस्कला भेटण्याची परवानगी त्यावेळी नाकारली होती. इलॉन मस्क यांनी कित्येक कंपन्या स्थापन केल्या आणि नंतर त्यांना चांगल्या किमतीत विकल्या.
त्यातील एक उदाहरण म्हणजे ‘पे पाल‘ ही एक कंपनी आहे. ‘झिप २’ ही कंपनी सुद्धा त्यांनी १९९९ मध्ये खूप मोठया किंमतीला विकली.
कंपनी उभी करायची, नफा कमवायचा आणि नंतर कंपनीचं विकून टाकायची हे त्यांच्या यशाचं एक गमक म्हणता येईल. २००८ मध्ये त्यांनी टेस्ला मध्ये ३०० करोडची गुंतवणूक केली होती आणि त्यानंतर कंपनीने कधीच मागे बघितलं नाही.
आज इलॉन मस्क हे २०.८ % इतके कंपनीचे मालक आहेत ज्याची किंमत १० लाख करोड रुपये इतकी आहे. जगातील सर्वात श्रीमंत इलॉन मस्कला ५ मुलं आहेत आणि त्यांना वेळ देणं हे त्याचं सर्वात आवडतं काम आहे.
२००८ मध्ये इलॉन मस्क यांच्याकडून प्रेरणा घेऊन ‘आयर्न मॅन‘ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमातील हिरो हा एक रॉकेट अवकाशात पाठवतो तर एक कंपनी महागड्या कार तयार करते. त्या माणसाचं ध्येय हे माणसाचं मन आणि मशीन हे एकत्र यावेत असं होतं. इलॉन मस्कचं सुद्धा तेच ध्येय आहे.
लहानपणीपासूनच वाचनाची आवड असलेले इलॉन मस्क हे इतके शांत होते की त्यांच्या वडिलांना एकदा शंका आली होती की इलॉनला आपलं बोलणं ऐकू तर येत असेल ना?
हे त्यांनी डॉक्टरला विचारलं सुद्धा होतं. शांत असल्याने इलॉन मस्क यांना कित्येक मुलांनी शाळेत त्रास सुद्धा दिला होता.
रॉकेटच्या आवडीमुळे इलॉन मस्क हे रॉकेट विकत घेण्यासाठी रशियाला गेले होते. पण, किंमत जास्त होती म्हणून त्यांनी ते टाळलं.
पण, इलॉन मस्क तिथेच थांबले नाहीत. त्यांनी २००२ मध्ये ‘स्पेस एक्स‘ ही कंपनी स्थापन केली जीचं काम हे माणसांना अंतराळात International Space Station वर नेऊन आणणे आहे. त्यासोबतच, इतर ग्रहांवर सुद्धा सहज जाता यावं अशी इलॉन मस्क यांची इच्छा आहे.
पहिल्या तीन रॉकेट्सची चाचणी अयशस्वी झाल्यावर ही कंपनी सुद्धा इलॉन मस्क हे विकणार होते. पण, २००८ मध्ये ‘फाल्कन १’ हे रॉकेट यशस्वीरित्या अवकाशात पोहोचलं.
अपयशाच्या तीन पायऱ्या चढल्यावर इलॉन मस्क यांना यशाची पायरी सापडली होती. त्याच वर्षी नासा ने ‘स्पेस एक्स’ कंपनीशी अवकाशात पाठवण्यासाठी करार केला.
सौर्य ऊर्जेचा योग्य वापर व्हावा यासाठी त्यांनी ‘सोलर सिटी’ ही कंपनी २००६ मध्ये सुरू केली. २०१३ मध्ये ‘सोलर सिटी’ ही अमेरिकेतील सोलर पॅनल तयार करणारी सर्वात मोठी कंपनी झाली. २०१६ मध्ये इलॉन मस्क यांनी ही कंपनी टेस्ला मोटर्स ला विकली.
टेस्ला कंपनीला अमेरिकन सरकारने २०१० मध्ये कर्ज दिलं जे की कंपनी ने IPO लॉंच करून २०१३ मध्ये टेस्लाने फेडून टाकलं. इलॉन मस्क यांनी ‘हायपरलुप’, ‘ओपन AI’ आणि ‘न्यूरा लिंक’ सारख्या कंपनीची स्थापना केली.
ट्रॅफिकपासून सुटका व्हावी म्हणून त्यांनी ‘बोरिंग कंपनी’ ही बोगदा तयार करणारी कंपनी सुरू केली. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मानवी मेंदूला मशीन सोबत जोडणारी ‘न्यूरा लिंक’ या कंपनीने विज्ञानाला खूप मदत केली आहे असं म्हणता येईल.
इलॉन मस्क सारखं व्यक्तिमत्व हे खरंच अद्वितीय असतं जे की इतक्या वेगवेगळ्या दिशांमध्ये विचार करून त्यावर कृती करेल आणि यशस्वी होईल.
===
हे ही वाचा – श्रीमंत लोकांच्या श्रीमंतीचं सिक्रेट- या “१५ गोष्टी” ते चुकूनही करत नाहीत!
===
प्रयत्न तर खूप जण करत असतात, पण जो सर्व आघाड्यांवर यशस्वी होईल असा इलॉन मस्क सारखा एखादाच असतो आणि म्हणूनच तो सर्वोच्च श्रीमंत माणसाच्या पदावर सध्या विराजमान आहे. लोकांना प्रेरणा देणारं असंच काम इलॉन मस्क कडून घडत राहो!
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.