Site icon InMarathi

या अपमानास्पद प्रसंगामुळे तुफान बॉक्सरने चक्क ऑलिंपिक मेडल नदीत फेकून दिलं

muhammad ali featured inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपल्या देशात क्रिकेटला जितकं अनन्यसाधारण महत्व दिलं जातं तितकं इतर देशात दिलं जात नाही! म्हणजे क्रिकेट हा जरी आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळला जाणारा खेळ असला तरी त्या ऐवजी इतरही काही असे खेळ आहेत जे क्रिकेटपेक्षा जास्त प्रसिद्ध आहेत!

ऑलिंपिक गेम्स, ट्रायथलॉन, टेनिस, नेमबाजी, टेबल टेनिस, फुटबॉल, बास्केटबॉल हे असे कित्येक खेळ इतर देशात जास्त लोकप्रिय आहेत. त्यापैकीच आणखीन एक प्रसिद्ध खेळ म्हणजे बॉक्सिंग.

अर्थात आपल्याकडे कुस्ती हा खेळ तसा नवीन नाही. आजही आपल्याकडे कुस्तीच्या बऱ्याच स्पर्धा होतात. यावरच आधारतीत दंगल सारखा सिनेमा सुद्धा प्रचंड हीट झाला होता.

 

 

बॉक्सिंग म्हणजे कुस्तीचं एक सुधारतीत स्वरूप. खरंतर दोन्ही खेळ आणि त्यांचे नियम तसे बरेच वेगळे आहेत. पण २ खेळाडूंची झुंज ही कॉन्सेप्ट दोन्ही खेळात सारखीच!

बाॅक्सिंग हा एकदम तगड्या लोकांचा खेळ. या विषयावर कितीतरी सिनेमे बनले. मिलियन डॉलर बेबी, रॉकी, मेरी कोम. बाॅक्सिंग म्हटलं की दोन नावं ठळकपणे समोर येतात ती म्हणजे माईक टायसन, मुहम्मद अली!

माईक टायसन काही वेळा वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. पण मुहम्मद अली मात्र व्यावसायिक बाॅक्सर होताच पण माणूस म्हणूनही परोपकारी होता असं म्हटलं जातं.

 

 

याचं कारण कदाचित त्यांच्या बालपणात सापडतं. सहसा, माणसाचे वाईट दिवस संपून चांगले दिवस सुरू झाले की एकतर ती व्यक्ती अतिशय नम्र आणि चांगली तरी होतात किंवा अतिशय उद्धट आणि उर्मट तरी होतात. मुहम्मद अली पहिल्या प्रकारातील माणूस.

लहानपण अत्यंत सामान्य परिस्थितीमध्ये गेलेलं असल्याने सहसा वाईट वागायची बुद्धी होऊ दिली नाही त्यांनी.

अमेरिकेत केंटुकी येथे कॅशिअस क्ले ज्यु. या नावाने १७ जानेवारी १९४२ रोजी जन्मलेला हा मुलगा. याचे वडील कॅशिअस क्ले सिनिअर हे साईन बोर्ड पेंटिंग करत तर त्याची आई ओडेसा ही मोलकरीण म्हणून काम करायची.

खाऊन पिऊन सुखी असलेलं चौकोनी कुटुंब होतं त्यांचं. आई बाबा, आपला धाकटा भाऊ रुडी आणि स्वतः कॅशिअस क्ले ज्यु. असे चौघे जण कुटुंबातील सदस्य.

===

हे ही वाचा“चोराला धडा शिकवण्याचं ट्रेनिंग” घेऊन “जगातील सर्वश्रेष्ठ बॉक्सर” बनलेला अवलिया

===

 

कॅशिअस मोठा होत असतानाच दक्षिण अमेरिकेतील राज्यांचे विभाजन झाले आणि काळे गोरे असा वर्णभेद सुरू झाला. गोऱ्या लोकांना सुविधा जास्त, काळ्या रंगाच्या लोकांना अपमानास्पद वागणूक, सुविधांचा अभाव हा प्रकार तेथे चालू झाला.

उपहारगृहे, पोहण्याचे तलाव, विश्रामगृह या ठिकाणी हा भेदभाव तर सर्रास सुरू झाला. जिम क्रो लाॅ पास झाल्यानंतर तर‌ गोऱ्या लोकांना अत्याचाराची मुभाच मिळाली होती. कॅशिअस सारख्या आफ्रिकन लोकांचं जगणं कठीण करुन टाकलं होतं.

कॅशिअस बारा वर्षांचा असताना एका घटनेने त्याचं आयुष्य वेगळ्याच वळणावर आलं. त्याची सायकल चोरीला गेली. तक्रार करायला पोलिस स्टेशनची पायरी चढलेला कॅशिअस प्रचंड संतापला होता.

रागारागाने तो म्हणाला, तो चोर सापडला की मी त्याला बडवून काढणार आहे. ज्या पोलिस आॅफीसरसमोर तो हे बोलला होता तो आॅफीसर म्हणजे ज्यो मार्टिन. ज्यो मार्टिन हे स्वतः बाॅक्सिंग कोच होते. ते मार्गदर्शन करत!

त्यांनी सांगितलं, कुणालाही मारण्याआधी कसं लढायचं हे शिकून घे! मी शिकवेन तुला, कॅशिअस तयार झाला.

त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं, कॅशिअस फार चांगला बॉक्सर होऊ शकतो. इतर खेळाडूंपेक्षा तो चपळाईने हालचाल करायचा. प्रतिस्पर्ध्याला जोरदार ठोसा द्यायचा आणि तो प्रतिकार करण्याआधीच याचा दुसरा ठोसा बसायचा.

 

 

प्रतिस्पर्ध्याला प्रतिकाराची, बचावाची संधीही न देता कॅशिअस चपळाईने हल्ला करायचा. हौशी बाॅक्सर म्हणून कॅशिअस एकूण १०५ फाईट्स लढला त्यातील १०० फाईट्स जिंकून फक्त ५ फाईट्समध्ये त्याचा पराभव झाला होता.

गोल्डन ग्लोव्ह चँपियनशिप जिंकून कॅशिअस बेस्ट अमॅच्युअर लाईट- हेवीवेट बाॅक्सर म्हणून ओळखला जाऊ लागला.

१९६० साली इटलीमधील रोम येथे झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत सर्वोत्कृष्ट बाॅक्सर म्हणून सुवर्णपदक विजेता ठरला कॅशिअस!

ऑलिंपिक म्हणजे उत्तमातील उत्तम खेळाडूंशी असणारी स्पर्धा. ती कॅशिअसने सहज जिंकली होती. ऑलिंपिकमधून परतलेला कॅशिअस आता अमेरिकन लोकांच्या मनात हिरो ठरला होता. त्यानं व्यावसायिक बॉक्सर होण्याचं नक्की केलं.

व्यावसायिक बॉक्सर झाल्यानंतर पण त्याने बरीच बक्षिसं जिंकली. १९६४ साली सनी लिस्टन सोबत तो एक मॅच खेळला. आणि चपळाईने सातव्या फेरीतच त्याला गारद केलं आणि तो जागतिक दर्जाचा हेविवेट बाॅक्सर म्हणून ओळखला जाऊ लागला.

 

 

त्याला प्रतिस्पर्ध्याला नेहमी किरकोळ टिप्पणी करायची सवय होती. तो स्वतःबद्दल म्हणायचा, मी फुलपाखरासारखा तरंगतो आणि मधमाशीसारखा डंख करतो.

१९६४ साली त्यानं आपला धर्म बदलला आणि इस्लाम धर्म स्वीकारला. आणि आपलं नावही बदलून मुहम्मद अली ठेवलं! नंतर त्यानं सैन्यात भरती होण्यास नकार दिला. त्यामुळे जागतिक बॉक्सिंग संघटनेने त्याच्यावर तीन वर्षांसाठी बंदी घातली.

१९७० साली त्यानं पुनरागमन केलं. १९७१ साली झालेल्या बॉक्सिंग स्पर्धेत अली पहिल्यांदाच हरला. १९७४ साली मात्र त्यानं पुन्हा एकदा बाजी मारली. जागतिक हेविवेट चँपियनशिप जिंकून!

१९७५ मध्ये मुहम्मद अलीने त्याच्या आत्मचरित्रात एका मोठ्या गोष्टीचा खुलासा केला.

रोम ऑलिंपिकहून परतल्यावर त्याला मिळालेलं सुवर्णपदक त्याने ओहियो नदीत फेकून दिलं. यामागचं कारण खूप विचित्र होतं. रोम मधल्या एका हॉटेल मध्ये त्याला रंगभेदामुळे प्रवेश नाकारला होता. या प्रसंगामुळेच त्याने ते मेडल पाण्यात फेकून दिलं!

 

 

मुहम्मद अली १९८१ साली बाॅक्सिंगमधून निवृत्त झाले. ट्रेव्हर बेर्बिककडून पराभूत झाल्यानंतर त्यांनी बाॅक्सिंगला राम राम ठोकला.

पण नंतर बाॅक्सिंगसाठी तसेच चॅरीटीसाठी कामं केली. लोकांना खूप मदतही केली. त्यासाठी त्यांना जाॅर्ज बुश यांच्या हस्ते मेडल ऑफ फ्रीडम दिलं गेलं. नंतर त्यांना पार्किन्सन्सचा म्हणजे कंपवाताचा विकार जडला.

मुहम्मद अली यांनी चार लग्नं केली. त्यांना ९ मुलं झाली. त्यांची मुलगी लैला ही सुद्धा वडीलांसारखीच अजेय बाॅक्सिंग खेळाडू आहे. २० व्या शतकातील जगातील एक नंबरचा हेविवेट बॉक्सर म्हणून त्यांना निवडलं गेलं.

 

 

२०१६ साली मुहम्मद अली यांनी जगाचा निरोप घेतला. पण आजही त्यांचा सामान्य माणूस ते असामान्य बाॅक्सिंग खेळाडू हा प्रवास सतत प्रेरणादायी आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version