जीन्सचा अतिवापर म्हणजे पोटदुखी ते वंध्यत्व अशा गंभीर समस्यांना निमंत्रण!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
८० चं दशक संपता संपता जीन्सनं भारतात प्रवेश केला. त्यावेळेस या जाड्या भरड्या कापडाला नाकं मुरडली गेली मात्र दोन दशकांनंतर चित्र पालटलं आणि जीन्सला ‘सेकंड स्किन’ म्हणून दर्जा प्राप्त झाला.
सर्व वयोगटात लाडकी असणारी ही जीन्स वापरताना काही गोष्टींचं भान राखायला हवं!
जीन्स हा शब्द जगाला माहिती झाला तो १८०० मध्ये. twill cotton कापडाचा पॅण्टसाठी पहिल्यांदा वापर केला गेला. जेकब डेव्हिस आणि लेव्ही स्ट्र्स यांनी १८७३ साली या कापडाचा शोध लावला.
हे ही वाचा –
===
जीन्सचा इतिहास रंजक आहे यात शंका नाही, मात्र या जीन्सचा अतिरेकी वापर तुमच्या प्रकृतीसाठी अत्यंत घातक ठरू शकतो.
एककीडे सोईस्कर म्हणून वापरली जाणारी जीन्स शरिरासाठी हानीकारक ठरत नाही ना हे पाहणं गरजेचं आहे.
अनेकांच्या गळ्यातली ताईत असलेली जीन्स नेमकी आली कुठून?
जीन्स हे नाव इटलीतल्या जिनोआ या शहरावरून पडलं. आज या निळ्या रंगाच्या कापडाला डेनिम म्हणून ओळखलं जातं. जीन्स अस्तित्वात कशी आली? याची गोष्टही गंमतीशीर आहे.
गरज ही शोधाची जननी आहे म्हणतात ते जीन्सच्याबाबतीत अगदी खरं आहे. त्याचं झालं असं, की १८५१ साली मोठ्या भावाला कामात मदत करण्यासाठी म्हणून लेव्ही जर्मनीहून न्युयॉर्क शहरात आला.
गोल्ड रश विषयी ऐकून तो सॅन फ्रॅन्सिस्कोला गेला. इतर गोष्टिंच्या विक्रीसोबतच तो सुती कापडाचीही विक्री करत असे. त्याच्या ग्राहकांमधे जेकब या टेलरचा समावेश होता.
कपड्यांसोबतच डेव्हिस तंबू, हॉर्स ब्लॅन्केटस आणि वॅगन कव्हर्स हे देखील शिवून देत असे.
एके दिवशी त्याच्या एका ग्राहकानं त्याच्याकडे एकदम दणकट टिकावू अशा कापडाची पॅण्ट शिवून मागितली. जीचा वापर मेहनतीचं काम करताना त्याला करायचा होता. जे कापड सतत धुवावं लागणार नाही आणि ते लवकर फाटणारही नाही असं वापरण्याविषयी या ग्राहकानं सूचना केल्या.
या मागणीचा विचार करून डेव्हिसनं लेव्हिसकडून आणलेल्या डेनिमच्या कापडापासून त्यानं पॅन्ट शिवली. ज्याठिकाणी पॅन्ट सगळ्यात जास्त फाटते तिथे म्हणजे खिशांच्या जागी त्यानं तांब्याच्या पट्ट्या बावल्या.
ही पॅन्ट शिवल्यानंतर डेव्हिसच्या लक्षात आलं की भविष्यात अशा पॅन्टना कामगार लोकांकडून मोठी मागणी येऊ शकते. त्यानं हुशारीन याचं पेटंट घ्यायचं ठरवलं आणि या व्यवसायातल्या भागीदारीविषयी लेव्हिसला विचारलं.
लेव्हिसनं अर्थातच होकार दिला आणि दोघांनी मिळून एक मोठा कारखानाच टाकला. अशा रीतीने जीन्सचा जन्म झाला तोच मुळात दीर्घकाळ टिकणार्या, मळखाऊ पॅण्ट शिवण्यातून.
कालांतरानं जीन्सचं ग्लॅमर सर्वत्र पसरलं आणि ते एक फॅशन स्टेटमेंट बनलं. आज अशी कोणीही व्यक्ती नाही जी जीन्स वापरत नाही.
===
हे ही वाचा –
===
वर्षानुवर्षं वापरल्या जाणार्या जीन्स जरी खिशाला परवडणार्या आणि वापरायला सोयीच्या असल्या तरिही सततच्या वापरानं काही दुष्परिणामही होण्याची शक्यता असते.
योग्य ती खबरदारी घेत जीन्स वापरायला हरकत नाही मात्र तिचा अतिरेकी वापर टाळायला हवा.
१. रक्ताभिसरणाच्या समस्या
जीन्स या फिटींगला तंग असतात. यामुळे सतत त्या वापरत राहिल्यानं आरोग्याच्या समस्या उदभवण्याची शक्यता असते. हार्टबर्न, abdominal discomfort. Belching testicular torsion अशा प्रकारच्या समस्या भेडसावू शकतात.
सतत तंग जीन्स वापरल्यानं रक्ताभिसरणावर परिणाम होतो. शरीराच्या खालच्या बाजूस रक्त पुरवठा पुरेसा होत नाही. कमरेत सततच्या कापडामुळे घाम येऊन त्वचेच्या तक्रारी सुरू होतात.
त्याचप्रमाणे मांड्याच्या त्वचेवर जीन्स घासून त्वचा सोलवटली जाते. रक्ताभिसरणारताली महत्वाची समस्या म्हणजे जीन्सचं तंग असणं.
२. पोटात दुखणं
काही जीन्स या त्वचेवर अगदी टाईट बसतात. त्या इतक्या टाईट असतात की पोट दाबलं जातं. पोटातले स्नायू सतत दाब पडल्यानं दुखावले जातात. नितंबांच्या सांध्यांवरही टाईट जीन्सचा विपरीत परीणाम होतो.
पायांची मोकळी हालचाल न झाल्यानं गुडघ्याच्या सांध्यांवरही परिणाम होतो. बसताना या टाईट जीन्समुळे पोटावर दाब तर येतोच शिवाय हे फारच गैरसोयीचं असतं.
ज्यांचं काम दीर्घकाळ उभं रहाण्याचं असतं अशांच्या मणक्यावर या टाईट जीन्सचा ताण येऊन पाठदुखीचा त्रास होण्याची शक्यता असते.
३. त्वचेचे संसर्ग
सतत त्वचेला चिकटलेली जीन्स त्वचेला हवा लागू देत नाही. त्वचेवर येणारा घाम जीन्स शोषून घेते परिणामी कापडात ओलसर दमटपणा रहातो. या सततच्या घामानं आणि जीन्सच्या दमटपणामुळे त्वचेवर विपरीत परिणाम होतात.
Canadida yeast infection सारख्या समस्या उदभवतात. मूत्रमार्गाचे संसर्ग होण्यच्या शक्यताही टाइट जीन्समुळे वाढतात.
त्वचेची उष्णता वाढते, कापडच्या खरखरीत घर्षणामुळे त्वचेवर लाल चट्टे पडण, सुजणं, खाज सुटणं अशा समस्या सुरू होतात.
४. वंध्यत्व
पुरूषांच्या सतत जीन्स वापरण्यामुळे crotch area मधे हवा खेळती रहात नाही. याचा परिणाम वीर्याच्या दर्जावर होतो. पुरुषांच्या व्यंधत्वाचं सतत टाईट जीन्स घालणं हे एक कारण देखील आहे.
स्त्रियांच्याबाबतीत टाईट जीन्समुळे मूत्रमार्गाच्या संसर्गात वाढ होण्याची शक्यता असते.
याशिवाय, जीन्स एकतर वरचेवर न धुतल्यानं त्यात घाम आणि मळ साचत गेल्यानं त्वचेवर परिणाम होतोच पण दुसर्या बाजूला ती वरचेवर धुतल्यानं कापड आणखीन खरखरीत होत जातं. परिणामी त्वचेवर खरखरीत कापड घासून त्वचा सोलवटली जाते.
हे सगळं वाचून तुम्हाला प्रश्न पडला असेल की, याचा अर्थ जीन्स वापरणं बंद करायचं का? इतकी सोयीची आणि सवयीची झालेली जीन्स कशी काय बुवा वापरायची नाही? तर अर्थातच याचं उत्तर आहे जीन्स वापरायला अगदीच हरकत नाही फक्त खबरदारी घ्या.
सर्वात महत्वाचं म्हणजे, जर अगदी रोज आणि दिवसातला बराच वेळ जीन्स वापरणार असाल तर स्किनी जीन्स वापरू नका. त्याऐवजी कम्फर्ट फिट असणार्या जीन्सची निवड करा.
शक्यतो एक दिवसा आड एक जीन्स वापरा. विशेषत: मुंबईसारख्या शहरात याचं भान राखायला हवं. कारण इथल्या हवेत दमटपणा जास्त असल्यानं घामही खूप येत असतो तेंव्हा शक्यतो रोज जीन्स घालणं टाळा.
जीन्सचे दोन जोड ठेवा. आलटून पालटून घाला. धुतल्यानंतर इस्त्री करून ती मऊ झाल्यावरच वापरायला घ्या. इस्त्री करतानाही शक्यतो वाफेची इस्त्री वापरा जेणेकरुन कापड मऊ राहील. हॉट आयर्नमुळे कापड आणखीन कडक होण्याची शक्यता असते.
विशेषत: स्त्रियांनी रोज जीन्स घालू नये, या ऐवजी कॉटन ट्राउजर निवडाव्या.
अलिकडे स्ट्रेचेबल जीन्स मिळतात त्याचा वापर करावा. तुलनेनं पातळ कापड असलेल्या जीन्सही बाजारात उपलब्ध आहेत, त्या निवडाव्यात!
===
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.