आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
आपल्या इथे रामायण हे आदर्शवाद आणि महाभारत हा वास्तववाद मानला जातो!
जस रामायणात राम मनुष्य जातील एक आदर्श उभा करून देतो तसेच महाभारतात आपल्याला स्वभावातले द्वेष, कपट,इर्षा असे वेगवेगळे पैलू समोर येतात!
महाभारतात विजय जरी पांडवांचाच झाला असला तरी कौरव पांडव यातले प्रत्येक पात्र हे खूप महत्वाचे आहेत तशाच महाभारतातल्या काही कथा किंवा दंतकथा देखील तितक्याच महत्वाच्या आहेत!
महाभारतातील याच एकूण एक कथा आपण निरनिराळ्या निमित्ताने, अगदी लहानपणापासून ऐकत आलोय!
या कथांतून आपल्याला शिकायला सुद्धा बरच काही मिळत पण काही काही कथा ज्या आहेत त्या आपल्या मनावर इतक्या स्पष्टपणे कोरल्या गेल्या आहेत कि ज्या विसरणं हे कधीच शक्य नाही!
कारण त्या कथाच इतक्या रंजक आहेत कि आपण आजही त्यात रममाण होऊ इच्छितो!
भारतातच काय पण जगामध्ये सुद्धा महाभारत हे महाकाव्य अतिशय प्रसिद्ध आहे. अनेक अभ्यासकांनी त्यावर अभ्यास करून अनेक पुस्तके लिहिली आहेत. असं म्हणतात की जे जे जगात आहे ते सर्व महाभारतामध्ये आहे आणि जे महाभारतामध्ये नाही ते जगात कुठेही नाही.
अतिशयोक्तीचा भाग सोडला तर महाभारतामध्ये सर्व प्रकारची माणसे आणि प्रवृत्ती सापडतात.
कसे वागावे इथपासून कसे वागू नये ह्या सगळ्याची उदाहरणे महाभारतामध्ये आहेत. आपल्याकडे लहानपणापासूनच आपले आई, आजी, आजोबा गोष्टी स्वरुपात आपल्याला महाभारताची ओळख करून देतात.
थोडं मोठं झाल्यावर टीव्ही वर सिरीयलच्या स्वरुपात आपण महाभारत समजावून घेतो. काहींना जास्त रस असेल तर ते त्यावरची अनेक पुस्तके वाचून काढतात.
थोडक्यात काय, तर महाभारत माहिती नाही असा माणूस निदान भारतात तरी नाही.
महाभारताबद्दल बेसिक माहिती सर्वांनाच असते.पण तुम्हाला माहित आहे का की महाभारताच्या महायुद्धामध्ये फक्त १८ दिवसांमध्ये युद्धात भाग घेतलेले जवळजवळ ८०% पुरुष ठार झाले होते.
पण महाभारताचे युद्ध संपल्यानंतर काय झाले हे मात्र सर्वांनाच माहित असेल असे नाही.
–
हे ही वाचा – रामायण, महाभारतापुर्वी इतिहासातील हे पहिलं महायुद्ध भारतभूमीवर लढलं गेलं होतं!
–
तर आज जाणून घेऊया महाभारताचे युद्ध संपल्यानंतर पांडवांचे काय झाले, कौरवांचे काय झाले, भगवान श्रीकृष्ण ह्यांनी काय केले!
१. महाभारताचे युद्ध जिंकल्यानंतर पांडवांना राज्य मिळाले. हस्तिनापुर येथे युधिष्ठिराचा राज्याभिषेक करण्यात आला. त्याने आपल्या बाकी भावंडांच्या मदतीने राज्यकारभार सुरु केला.
आपल्या पुत्रांचा पांडवांकडून वध झालेला पहिल्याने व्यथित झालेल्या गांधारीने भगवान श्रीकृष्णाला शाप दिला की त्याच्या वंशजांचा आणि पर्यायाने यादव कुळाचाही असाच भयानक पद्धतीने सर्वनाश होईल जसा कौरवांचा झाला.
२. पांडवांनी हस्तिनापुरवर ३६ वर्ष राज्य केले. ह्या काळात गांधारीचा शाप आकारास येण्यास सुरुवात झाली होती. द्वारकेमध्ये काही अभद्र घटना घडल्यानंतर श्रीकृष्ण सर्व यादवांना प्रभास क्षेत्री घेऊन गेले.
तिकडे त्या सर्वांची एकमेकांबरोबर भांडणे होऊन सर्वांनी एकमेकांना संपवले. जवळजवळ संपूर्ण यादव कुळाचा निर्वंश झाला.
३. एका पारध्याने शिकार करताना चुकून भगवान श्रीकृष्णांनाच बाण मारल्याने त्यांचा मृत्यू झाला.(ही त्यांचीच अवतार कार्य संपवण्याची लीला होती.)
त्यानंतर त्या पारध्याला त्यांनी चतुर्भुज श्रीविष्णू स्वरुपात दर्शन देऊन वैकुंठास प्रयाण केले.
श्रीकृष्णांच्या अवतारसमाप्ती नंतर गुरु वेद व्यासांनी अर्जुनाला सांगितले की त्यांचे (पांडवांचे) ह्या जन्मातील पृथ्वीवरील कार्य पूर्ण झाले आहे तर त्यांनी स्वर्गारोहण करावे.
४. त्याच वेळी द्वापार युग संपून कलियुगाची सुरुवात झाली होती.
आपल्या राज्यात अधर्म आणि अनागोंदी माजलेली पाहून युधिष्ठिराने परीक्षितास राज्यकारभार सोपवून सर्व पांडव व द्रौपदीसह स्वर्गारोहण करण्यासाठी हिमालय पर्वत चढण्यास प्रारंभ केला.
ह्या प्रवासात त्यांच्याबरोबर मृत्यूची देवता प्रत्यक्ष यमराज एका श्वानाच्या रुपात होते.
५. हा प्रवास करताना एक एक करून सर्व पांडव मृत्यू पावले. सुरुवात द्रौपदी पासून झाली आणि शेवटी फक्त भीम युधिष्ठीरा बरोबर राहिला.
पण शेवटी तोही स्वर्गा पर्यंत पोहोचू शकला नाही.ह्या सर्वांच्या मृत्यूचे कारण त्यांच्या इच्छा, त्यांच्या गर्वामुळे उभे राहिलेले प्रश्न/समस्या असे सांगितले जाते.
फक्त युधिष्ठीरच, श्वान रूपातील यमराजांबरोबर हिमालयाच्या शिखरावर असलेल्या स्वर्गाच्या दारापर्यंत पोहोचू शकला कारण त्याने आयुष्यात कधीही कशाचाही गर्व केला नाही.
६. स्वर्गाच्या दाराशी पोचल्यानंतर यमराजांनी युधिष्ठिराला स्वतःचे खरे रूप दाखवले व त्याला नरक काय असतो ह्याचे दर्शन घडवले. तिथे त्याने पहिले कि त्याचे सर्व बंधू व त्याची पत्नी द्रौपदी आपापल्या कर्माचे फळ भोगीत आहेत.
त्यानंतर स्वर्गाधिपती इंद्रदेवाने युधिष्ठिराला स्वर्गात जागा दिली व वचन दिले कि आपापल्या कर्माची फळे भोगून झाल्यानंतर युधिष्ठिराचे सर्व बंधू व पत्नी सुद्धा स्वर्गात येतील.
तर अशा प्रकारे महाभारताचे महायुद्ध संपल्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी आपले अवतार कार्य संपवले.
महाभारतातील महत्वाचे पात्र म्हणजेच पांडव ह्यांनी ह्या जगाचा निरोप घेतला.
ह्या नंतर कलियुग सुरु झाले व संपूर्ण जगात मानवाच्या माणुसकी विसरून वागण्यामुळे अशांती माजली जी आपण आज सगळीकडे पाहतो आहोत.
===
हे ही वाचा – कौरव पांडवांच्या एकुलत्या एक बहिणीची करुण कथा – जिला खुद्द अर्जुनानेच विधवा केले
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.