Site icon InMarathi

फणस मजा म्हणून खाताय? हे वाचल्यावर गुणकारी औषध म्हणूनही फणस खाल्ला जाईल

jackfruit image inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

भटो रे भटो..कुठं गेला होता? कोकणात..

कोकणातून काय आणलं? फणस!!!

हे बडबडगीत माहीत नाही अशी मुलं विरळंच असतील. सोशल मिडीयाच्या वेगवेगळ्या पेजेसवर करवंद, जांभळं, फणसाचे रसाळ गरे हा कोकणातील मेवा पाहताना खरे तोंडाला पाणी सुटलं नाही तरच नवल.

 

 

रस्त्याच्या कडेला विक्रीसाठी रचलेला फणसाचा ढीग पाहण्यापेक्षा त्याचा सुवास अनुभवणे हा वेगलाच आनंद आहे याचा अनुभव तुम्ही कधी घेतला आहे का? जवळून गेलं तरी पिवळ्या धम्मक रंगाचे, गोड वासाचे गरे घ्यायचा मोह होतोच होतो.

 

 

कोकणात तर फणसाची पोळी पण करतात. त्याला साटं असंही म्हणतात. उन्हाळ्यात तयार केलेल्या या पोळीचा आनंद तुम्ही वर्षभर घेऊ शकता.

त्यासह तळलेले फणसाचे खमंग गरे आवडत नाहीत असा माणूस दुर्मिळच. कोकणातून येणा-या मित्राला हे खमंग गरे आणायला सांगणं आणि गप्पांच्या मैफलीत त्यावर मनसोक्त ताव मारणं ही मजा काही औरच!

 

आपल्याकडे एखादा माणूस वरकरणी पाहता कठोर पण मनाने मात्र खूप चांगला असेल तर त्याला फणस म्हणतात, कारण फणस देखील वरुन खूप काटेरी असतो पण आत रसाळ गोड गरे असतात.

फणस आणून कापायचा, गरे सुटे करायचे हे फार कटकटीचे काम आहे. फणसात असलेला चीक हाताला लागू नये म्हणून तेल लावून एखादा धारदार कोयता किंवा मोठा सुरा घेऊन कापावा लागतो. आतमध्ये असलेल्या चारखंडाच्या जाळीतून एक एक गरा सुटा करणं हे तसं कौशल्याचंच काम आहे.

 

 

एकदा का ते गरे सुटे करुन ठेवले की येता – जाता लहान थोर सगळे एक एक गरा खाऊन प्लेट रिकामी करून टाकतात.

फणस मुख्यतः कोकणात आढळतो. खूप मोठ्या आकाराचं हे फळ बाहेरुन काटेरी असतं. अननस आणि केळाच्या मिश्रणाचा स्वाद असलेले याचे गरे असतात.

आता फणस जगभर पसरला आहे. थायलंड, फिलीपिन्स, आॅस्ट्रेलिया, ब्राझील, आफ्रीका या देशांतही आता फणस पोहोचला आहे.

 

 

फणसाच्या जाती-

फणसाच्या मुख्य जाती कापा आणि बरका.

कापा

कापा फणस हा गरे काढून छान खाता येतो. त्यांचे गरे करकरीत असतात.

बरका

बरका फणस हा करकरीत गरे काढून घेण्याजोगा नसतो. तो थोडासा बुळबुळीत असतो. त्याचा वापर सांदण करण्यासाठी केला जातो. पोळी करायला पण याचाच वापर केला जातो.

 

 

विलायती

विलायती फणसातील कच्चा फणस भाजी करायला वापरला जातो. फणसात असलेला चारखंड तळून पण खाल्ला जातो.

फणसाच्या बियांना आठळ्या असं म्हणतात. या पण शिजवून, भाजून खातात. यामध्येही विपुल प्रमाणात जीवनसत्वे असतात.

एकंदरीत फणसात विपूल प्रमाणात जीवनसत्वे असतात. अक्रोड, सफरचंद, केळं यांच्याही पेक्षा जास्त जीवनसत्त्वे असलेलं फणस हे फळ. व्हिटॅमिन ए हे भरपूर प्रमाणात फणसात असते.

या फणसाचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत

प्रचंड प्रमाणात अँटीआॅक्सिडंट्स उपलब्ध असलेल्या फणसात मानवी शरीराला अनेक उपयुक्त घटक आहेत. हृदयरोग, कॅन्सर अशा रोगांवर फणसाचा खूप चांगला परिणाम होतो.

त्याचबरोबरीने डोळ्यांचे त्रास पण फणसाच्या सेवनाने दूर होतात. पेशींचा ऱ्हास होऊ नये यासाठी फणस खूप उपयोगी पडतो.

बद्धकोष्ठता

 

 

फणसामध्ये असलेले तंतूमय पदार्थ हे पचनशक्ती वर खूप चांगला परिणाम करतात. त्यामुळे आतड्यांची हालचाल व्यवस्थित होऊन बद्धकोष्टतेचा त्रास कमी होतो.

अल्सर

पोटातील व्रण म्हणजे अल्सर. पोटदुखी असो वा तोंडाला येणारे फोड अशी अल्सरची अनेक लक्षणे दिसून येतात. त्यावर फणस हा त्यावरील उत्तम इलाज आहे.

 

 

फणसाच्या सेवनाने अल्सरचा त्रास कमी होतो.

अर्थात फणस हा शरिरासाठी उष्ण असल्याने तुमच्या प्रकृतीनुसार तो किती खावा याबाबत सतर्कता बाळगा. 

मधुमेह

मधुमेहाची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. तरुणांमध्येही हा रोग झपाट्याने वाढत असल्याने वेळीच काळजी घेणे गरजेचे आहे.

 

 

मधुमेहींना आपल्या आवडत्या पदार्थांसाठी कायम आपल्या जीभेवर ताबा ठेवावा लागतो. गोड पदार्थ, फळे याबाबत कायमच त्यांना रोखले जाते.

 

 

फणस पचायला थोडा वेळ लागतो. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढत नाही. इतर फळांची पचनक्रिया जलद गतीने होते त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण थोडे वाढते.

पण फणसाच्या सेवनाने हे होत नाही. रक्तातील साखर नियंत्रित राहते. अर्थात मधुमेही रुग्णांनी त्याचे प्रमाणात सेवन करणे कधीही योग्यच!

उच्च रक्तदाब

 

 

फणसात असलेली पोटॅशियमची मात्रा रक्तदाब नियंत्रणात आणण्यासाठी उपयुक्त आहे. त्यामुळे हृदयरोग, हाडांची झीज या रोगांना प्रतिबंध होतो.

त्वचाविकार

फणसात असलेली व्हिटॅमिन ‘सी’ ची मात्रा त्वचारोगावर अतिशय गुणकारी आहे. उन्हाने रापलेली, काळवंडलेली त्वचा फणसाच्या सेवनाने उजळते.

 

 

त्वचेचा पोत सुधारतो. सुरकुत्या कमी होतात.

कर्करोग

फणसात असलेले अँटीआॅक्सीडंट आणि इतर घटक शरीरातील पेशींची बेसुमार वाढ होऊ देत नाहीत. त्यामुळे कर्करोग होण्याची शक्यता कमी होते.

 

 

अर्थात हा शरिराला होणारा एक महत्वाचा फायदा असला तरी त्यावर पूर्णपणे अवलंबून राहणे योग्य नाही.

काळजी घ्या

काही जणांना फणसाची अॅलर्जी असू शकते. त्यांनी मात्र सावधान! फणस खाऊन तोंडाला खाज सुटणे, ओठांना ज्वर उठणे अशी लक्षणं दिसली तर थांबा! फणस खाऊ नका.

 

पण काही असो निसर्गासारखा उत्तम डाॅक्टर कुणीही नाही. आपल्याला विविध प्रकारची फळफळावळ उपलब्ध करुन देऊन कितीतरी रोगांना प्रतिबंध करायचं काम निसर्गानं आपल्याच हातात दिलं आहे. पण खूपदा ‘तुझे आहे तुजपाशी परि जागा चुकलासी’ म्हणायची वेळ आपणच आणतो!

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version