Site icon InMarathi

वय वर्ष ३४, रोज कोटींची उलाढाल….श्रीमंत तरुणांची अविश्वसनीय यशोगाथा!

trading inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

‘ऑनलाईन ट्रेडिंग’ मराठी घरात नेहमीच भीतीने बघितला जाणारा विषय. आपण ‘मार्केट रिस्क’ हा शब्द इतका लावून धरतो, की त्या वाटेला जाणंच नको हे ठरवूनच टाकतो. बहुतांश लोकांचं असं होतं. काहीजण मात्र या भीतीवर मात करतात. हे क्षेत्र कसं चालतं? हे शिकून घेतात. त्याला आवश्यक तो वेळ देतात आणि ‘ट्रेडर’ म्हणून करिअर करतात.

हे आपल्याकडे अजूनही तितकंसं प्रचलित नाहीये, पण तुम्ही प्रोफेशनल नेटवर्क साईटवर चेक केलं तर लक्षात येईल, की आज कित्येक लोकांनी ४०व्या वर्षापर्यंत जॉब करून मग पूर्ण वेळ ट्रेडिंगला दिला आहे.

ऑनलाईन ट्रेडिंग हे क्षेत्र करिअर म्हणून कधी मान्य होईल? “आमचा मुलगा ट्रेडर आहे.” हे कोणत्याही पालकाला कधी सहजपणे सांगता येईल?जेव्हा या क्षेत्रातील यशस्वी उदाहरणं समोर येतील तेव्हा. निखिल कामथ आणि त्यांचा भाऊ हे असंच एक उदाहरण आहे.

वयाच्या १४ व्या वर्षी ‘ट्रेडिंग’चं काम सुरू केलेले हे दोघे आज जगातील सर्वात तरुण बिलेनियर म्हणून फोर्ब्सच्या यादीत समाविष्ट झाले आहेत.

 

 

‘झेरोधा ब्रोकिंग लिमिटेड’ ही निखिल कामथ यांनी २०१० मध्ये सुरू केलेली रिटेल ब्रोकरेज कंपनी आज या क्षेत्रात भारतात प्रथम क्रमांकावर आहे. या कंपनीचा रोजचा टर्नओव्हर करोडोंच्या घरात आहे. होय, ४० लाखांपेक्षा जास्त अॅक्टिव्ह ग्राहक असलेल्या कंपनीचं काम लोकांना ट्रेडिंगमधून पैसे कमावून देणं हे आहे.

झेरोधामध्ये आज ११०० हून अधिक लोक काम करतात. कोणतीही बाह्य गुंतवणूक नसल्याने झेरोधा ब्रोकिंग लिमिटेड, निखिल कामथ आणि बंधूंचं विशेष कौतुक सध्या होत आहे.

बँगलोरमध्ये हेड ऑफिस असलेल्या झेरोधा ग्रुपला २०१४ आणि २०१५ मध्ये ‘इमर्जिंग इक्विटी ब्रोकिंग हाऊस अवॉर्ड’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. याव्यतिरिक्त, २०१६ मध्ये झेरोधाला ‘इकॉनॉमिक टाईम्स स्टार्टअप अवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आलं. यानंतर नॅशनल स्टॉक एक्सचेंजने झेरोधाला २०१८ मध्ये ‘रिटेल ब्रोकर अवॉर्ड’ हा पुरस्कार बहाल केला.

 

 

निखिल कामथ यांना वयाच्या ५ व्या वर्षापासून बुद्धिबळाची आवड आहे. राष्ट्रीय स्तरावर त्यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. १७ व्या वर्षापर्यंत त्यांनी बुद्धिबळ खेळाडू म्हणून खूप नाव कमावलं. काही दिवस त्यांनी कॉल सेंटरमध्ये पार्ट टाईम नोकरी केली, पण तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की, काहीतरी राहतंय.

निखिल कामथ यांचे काही नातेवाईक, मित्र तेव्हा स्टॉक मार्केट, ऑनलाईन ट्रेडिंग मध्ये काम करत होते. तेव्हापासून त्यांनी ट्रेडिंगला सुरुवात केली. ट्रेडिंग तुम्हाला इतकं का आवडतं? हे विचारल्यावर निखिल कामथ सांगतात, “हे क्षेत्र अमर्याद आहे, म्हणून मला ते आवडतं. अजून एक कारण म्हणजे ट्रेडिंग करण्यासाठी तुम्हाला कोणत्या पदवीची गरज नाहीये. गरज आहे ती फक्त हे मार्केट कसं चालतं? हे समजून घेण्याची. आज तर आपण हे घरबसल्या सुद्धा आत्मसात करू शकतो.”

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

हेदेखील वाचा : डिलीव्हरी बॉयने सुरु केला अफलातून व्यवसाय कमावतोय महिना ८० हजार!

===

काय वेगळं केलं?

 

 

 

निखिल कामथ यांना सुद्धा सुरुवातीला अपयशाचा सामना करावा लागला होता. खूप नुकसान सोसावं लागलं होतं. थोडा फायदा व्हायचा, पुन्हा नुकसान व्हायचं. काही वर्ष अशीच गेली.

आपल्या सर्वात चांगल्या शिक्षकाबद्दल विचारल्यावर निखिल नाव घेतात ‘आर्थिक नुकसान’ या गोष्टीचं. ट्रेडिंगमध्ये “नुकसान”च तुम्हाला खूप काही शिकवत असतं.

डिसेंबर २०१५ मध्ये झेरोधाने काही काळासाठी ‘ब्रोकरेज फ्री’ म्हणजेच कोणत्याही कन्सलटिंग चार्जेस शिवाय ग्राहकांसाठी ट्रेडिंग करण्याची एक ऑफर चालवली. ही स्टेप झेरोधासाठी सर्वात उपयुक्त ठरली आणि त्यानंतर कित्येक नवीन ट्रेडर्स झेरोधाच्या लिस्ट मध्ये सहभागी झाले.

‘काईट’ सारखा स्ट्रॉंग बॅकअप आयटी सपोर्ट सुरू करून निखिल कामथ यांनी ग्राहकांना ट्रेडिंग समजण्यासाठी एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे.

 

 

‘रेनमॅटर’ हा एक उद्योजकांना ट्रेनिंग देणारा कार्यक्रम निखिल कामथ यांनी तयार केला आणि त्यातून अजून कितीतरी लोक झेरोधाग्रुप सोबत जोडले गेले. ‘रेनमॅटर’द्वारे स्टार्टअपला फंडिंग केलं जाऊ लागलं. वातावरणावर अवलंबून असलेल्या सर्व संस्थांना ‘रेनमॅटर क्लाउड फंड’चा खूप फायदा झाला. ‘टेराडो’सारख्या ऑनलाईन शाळा या ‘रेनमॅटर’च्या फंडमुळे स्थापन होऊ शकल्या.

ब्लु स्काय अनलिटिक्स हा स्टार्टअप पर्यावरणातील बदलांचा अभ्यास करण्यासाठी स्थापन करण्यात आला आहे. ‘रेनमॅटर’च्या फंडिंगचा या कार्यात मोठा वाटा आहे.

कोरोनाने इतकं आर्थिक नुकसान केलेल्या मागील वर्षात झेरोधाने मात्र ३५० करोड इतका नेट फायदा कमावला आहे. याचं श्रेय ते केवळ ‘कस्टमर सर्विस’ ला देतात. “कोणत्याही मार्केटिंगपेक्षा कस्टमर सर्विसवर भर दिला, तर व्यवसाय नक्कीच वाढतो” असं निखिल सांगतात.

“तुम्हाला जे काम सर्वात जास्त आवडतं त्याच्याशी निगडित व्यवसाय सुरू करा. तुम्हाला व्यवसाय करत आहोत असं वाटणार सुद्धा नाही.” असंही ते म्हणतात.

===

हेदेखील वाचा : ३० हजारच्या भांडवलावर सुरु केलेल्या व्यवसायाचा आज आहे १८० कोटींचा टर्न ओव्हर!

===

३४ वर्षीय निखिल कामथ यांचा व्यवसाय प्रवास हा थक्क करून सोडणारा आहे. मागच्या वर्षी त्यांनी ट्रू बीकॉन या नावाने स्वतःचा ‘फंड’ लाँच केला. हा फंड सध्या ग्राहकांना १४ महिन्यात ३५% फायदा करून देत आहे.

झेरोधा ही या काळातील एकमेव अशी कंपनी आहे जिथे कोणत्याही प्रकारचं सेल्स टार्गेट हे दिलं जात नाही. आपल्या स्पर्धकांपेक्षा वेगळा विचार करत त्यांनी प्रत्येक व्यवहारात २० रुपये चार्ज लावण्यापेक्षा व्यवहार हा ग्राहकांसाठी फुकट द्यायचं ठरवलं आणि ‘झिरो से झिरोधा’ हा प्रवास त्यांनी अवघ्या दहा वर्षात त्यांनी साध्य केला आहे.

 

 

नितीन आणि निखिल कामथ हे दोन भाऊ आज झिरोधाचा पूर्ण व्यवहार सांभाळत आहेत. मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या या दोघांची आई शिक्षिका आहे आणि वडील कॅनरा बँकेत मॅनेजर आहेत.

लहानपणी एक छंद म्हणून सुरू केलेल्या ट्रेडिंगला इतक्या मोठ्या व्यवसायाचं स्वरूप येईल असं सुरुवातीला कोणालाच वाटलं नसेल! मेहनत, चिकाटी आणि अभ्यास या जोरावर काहीही शक्य होऊ शकतं याचं हे उदाहरण म्हणता येईल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version