तुम्हाला माहित नसेल, पण रस्ता शोधण्याव्यतिरिक्त “गुगल मॅप्स”चे आहेत हे भन्नाट फायदे
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
गुगल हा आपल्या सर्वांच्या जीवनातील अविभाज्य घटक कधीच झाला आहे. स्मार्टफोन आल्यापासून आपलं आयुष्य सुसह्य झालं आहे. काही वर्षांआधी ज्या कामांसाठी आपल्याला प्रत्यक्ष जावं लागायचं अशा कामात आता लक्षणीय घट झाली आहे.
एखाद्या ठिकाणी जायचं असले तर आज आपण त्या व्यक्तीला ‘गुगल मॅप’मुळे नक्की वेळ सांगू शकतो. गुगल मॅपच्या ‘रिअल टाईम ट्रॅफिक चेक’चा सर्वात जास्त उपयोग होतो तो सेल्स आणि मार्केटिंगमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना. एका दिवसात ५-६ जणांना भेटायचं असतं, वेळ मर्यादित असते. “किती वाजेपर्यंत पोहोचणार?” या प्रश्नाचं उत्तर आज फक्त गुगल मॅप देऊ शकतो.
काही लोकांच्या डोक्यात हा गुगल मॅप फिट बसलेला असतो. ते पत्ता सांगताना त्यांच्या भागातील बिल्डिंगचे रंग, झाडांची संख्या अगदी तंतोतंत सांगत असतात, पण जे लोक त्या शहरात, देशात नवीन असतात ते एकच वाक्य म्हणत असतात, “प्लिज लोकेशन पाठवा ना… “
कोणत्याही ठिकाणी पोहोचवू शकणाऱ्या या गुगल मॅपचे इतरही बरेच फायदे आहेत ज्याबद्दल फारसं कधी बोललं जात नाही. संपूर्णपणे मोफत आणि जाहिरात विरहित असलेल्या, ऑफलाईन सुद्धा मदत करू शकणाऱ्या या ॲपचे इतर फायदे :
१. वाट बघण्याचा वेळ:
तुम्ही कोणत्याही हॉटेलमध्ये जाण्याचा प्लॅन करत असाल, तर गुगल मॅपच्या नवीन अपडेटनुसार तुम्हाला तिथलं ‘वेटिंग टाईम’ सुद्धा कळणार आहे.
साहजिकच, कोणालाही हॉटेलसमोर जाऊन ताटकळत रहायला आवडत नाही. हे टाळण्यासाठी गुगल मॅपने ‘पॉप्युलर टाईम्स’ हे एक फिचर दिलं आहे, ज्यामध्ये त्या हॉटेलमध्ये कोणत्या वेळी जास्त गर्दी असते हे दिलेलं असतं. आपण ती वेळ टाळून किंवा ती गर्दीची वेळ होण्याआधी तिथे पोहोचण्याचं नियोजन त्यामुळे करू शकतो.
२. कच्चा, डोंगराळ रस्ता:
तुम्ही एखाद्या ठिकाणी बाईकवर जाणार असाल, तर गुगल मॅपमध्ये आठवणीने बाईकचा पर्याय निवडा आणि ‘डायरेक्शन्स’ वाचा. त्या रस्त्यात एखादा भाग हा कच्च्या रस्त्याचा किंवा डोंगराळ असेल तर तुम्हाला आधीच कळेल. तुमच्या मनाची तयारी झाली असेल.
रस्ता कळण्यासाठी मॅपमधील रस्ता वाचून मग निघणं कधीही चांगलं. त्यासाठी बाईक सुरू करण्याआधी मॅपमध्ये पूर्ण रस्ता बघून मग प्रवासाचा आनंद घ्यावा.
३. ‘तिथून पुढे’ जाण्याचा रस्ता:
एखाद्या दिवशी आपल्याला बऱ्याच ठिकाणी जायचं असतं. अशावेळेस मोबाईल काढून मॅपमध्ये टाकत बसण्याची गरज नाहीये.
तुम्ही जर मॅपच्या स्क्रीनच्या उजव्या बाजूला असलेल्या तीन टिंबावर बोट ठेवलं तर लक्षात येईल, की ‘ॲड स्टॉप’ हा एक पर्याय आहे, ज्यामुळे आपण कुठे पोहोचायचं आहे आणि तिथून पुढे कुठे जायचं आहे? हे एकदाच निवडून ठेवू शकतो.
४. स्ट्रीट व्ह्यू:
मॅप दिसल्यावर उजव्या हाताला एक चिन्ह दिसतं त्यावर आपण निवडलेल्या ठिकाणाचे वेगवेगळे ‘view’ बघायला मिळतात. तिथे स्ट्रीट व्ह्यू हा पर्याय निवडला तर त्या रस्त्याचे गुगलकडे असलेले फोटो हे काही काळाने त्या रस्त्यासोबत दिसू शकतात.
आतासुद्धा आपण गुगल ॲपवर चेक केलं, तर त्या जागेचे उपलब्ध फोटो आपण बघू शकतो. ‘फोटोग्राफिक मेमरी’ असलेल्या लोकांसाठी हे फिचर उपयुक्त असणार आहे.
५. ऑफलाईन वापर:
काही रस्ते असे असतात जिथे जाताना रेंजचा प्रश्न येऊ शकतो. अशा लोकेशन्ससाठी आपण आधीच ते लोकेशन सेव्ह करून ठेवू शकतो आणि ऑफलाईन असतांना सुद्धा तिथे वेळेत पोहोचू शकतो.
–
हे सुद्धा वाचा
–
६. महिनाभरात केलेला प्रवास:
तुम्ही भेट दिलेल्या प्रत्येक जागेची माहिती ही गुगल मॅपमध्ये स्टोअर होत असते. तुम्हाला जर परत तिथे जायचं असेल, तर तुम्ही लगेच ते ठिकाण निवडून त्या मार्गावर पटकन निघू शकता.
तुम्हाला जर ही माहिती गुगलने ठेवू नये असं वाटलं, तर तुम्ही ‘मॅनेज लोकेशन हिस्ट्री’ मधून हे सेटिंग बदलू शकता.
७. खाण्या-पिण्याची सोय:
एखाद्या ठिकाणी पोहचून तिथे जवळपास काही खाण्या-पिण्याची सोय आहे का? हा प्रश्न आपल्याला नेहमीच पडत असतो. तुम्ही ठरवलेल्या लोकेशनवर झूम केल्यास जवळचे पेट्रोल स्टेशन्स, हॉटेल्स हे सगळं दिसत असतं. त्याचा फायदा आपण करून घेऊ शकतो.
८. कार पार्किंग केलेली जागा:
एखाद्या मोठ्या सभागृहातून बाहेर पडल्यावर तुमची कार जर किल्लीच्या रेंजच्या बाहेर असेल, तर तुम्ही कार पार्क केलेली जागा ही मॅपच्या सहाय्याने तुम्ही पिन करून ठेवू शकता.
त्यासाठी कारमधून बाहेर पडण्याआधी मॅपमध्ये निळ्या डॉटला “पार्किंग लोकेशन” म्हणून सेट करा. परत जाताना आपण ते लोकेशन वापरून आपल्या कारपर्यंत लगेच पोहोचू शकतो.
९. तुमचं सध्याचं लोकेशन:
तुम्ही कार चालवत आहात आणि एखाद्या व्यक्तीला तुमचं सध्याचं लोकेशन पाहिजे असेल तर ते तुम्ही मॅप मधून सुद्धा पाठवू शकता. तुम्ही निवडलेला मार्ग सुद्धा तुम्ही इतरांसोबत शेअर करू शकता.
व्हाट्सॲपने गुगल मॅपच्या सहाय्याने दिलेलं लाईव्ह लोकेशन हे फिचर तर महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा खूप उपयुक्त आहे. तुमचा प्रवास योग्य दिशेने आहे, की नाही हे तुम्हाला ती व्यक्ती लगेच सांगू शकते. आता रिक्षावाले तुम्हाला कोणत्याही ठिकाणी लांबून नेऊ शकत नाहीत.
काही दिवसात कॅब बुक करणारे ॲप सुद्धा लिंक झाले असतील जेणेकरून, मॅप मधूनच कॅब सुद्धा बुक करता येईल. एकापेक्षा अधिक कॅब चार्जेस तिथेच दिसतील आणि कोणती कॅब निवडायची हे ठरवता येईल. हे फिचर काही देशांमध्ये सध्या लागू करण्यात आलं आहे.
प्रत्येक वेळी, गुगल मॅपचे अपडेट्स आले की अपडेट करत रहा आणि गुगलच्या सेवेचा, तत्परतेचा फायदा घेत रहा.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.