' अत्यंत महत्त्वाचं असलेलं पॅनकार्ड आता ‘ऑनलाईन’ सुद्धा मिळवता येतं… कसं ते वाचा! – InMarathi

अत्यंत महत्त्वाचं असलेलं पॅनकार्ड आता ‘ऑनलाईन’ सुद्धा मिळवता येतं… कसं ते वाचा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आजकाल आवश्यक त्या सगळ्या सेवा आणि गोष्टी आपल्याला सहजासहजी ऑनलाईन उपलब्ध होतात. गेल्या काही वर्षांपासून तर सरकार देखील वाहन चालवण्याचे लायसन्स, पॅनकार्ड, आधार कार्ड यासारख्या आवश्यक कागदपत्रांची उपलब्धता ऑनलाइन करून देण्याचा कसोशीने प्रयत्न करत आहे.

आज या लेखात ऑनलाईन पद्धतीने पॅन कार्ड कसे मिळवावे याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत.

जर तुम्हाला पॅनकार्ड तयार करायचे असेल, तर त्यासाठी पाच वर्षांपूर्वीपर्यंत किती किचकट पद्धती अस्तित्वात होती. त्यातही अनेक व्यक्ती तर कुठल्यातरी सायबर कॅफेत जाऊन त्या व्यक्तीला पैसे देऊन आपले पॅनकार्ड तयार करून घेत असत. तर काहीजण यातही ‘एजंटगिरी’ करत असत.

 

cyber-cafe-inmarathi

 

अनेक प्रसंगी भरपूर पैसे खर्च होऊन देखील पॅनकार्ड वेळेत हातात पडत नसे. जुन्या पद्धतीत पॅनकार्ड मिळवण्यासाठी तुम्हाला अनेक ठिकाणी अर्ज करावे लागत असत. बँकेमध्ये पॅनकार्ड मिळवण्यासाठी अनेक चकरा माराव्या लागत, सर्व कागदपत्र घेऊन प्रवास करायचे त्या कागदपत्रांची झेरॉक्स काढावी लागत असे.

त्यातही कधी कधी आवश्यक कागदपत्र गहाळ होण्याची भीती होती. अनेक व्यक्तींना तर एकदा ॲप्लिकेशन देऊन पॅनकार्ड मिळत सुद्धा नसे. त्यासाठी दोन-तीन वेळेस पाठपुरावा करावा लागत असे.

एवढी किचकट पद्धतीने कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर देखील तुमचे पॅनकार्ड केव्हा येईल याची शाश्वती नव्हती आणि म्हणूनच या सर्व भानगडींमधून तुम्हाला मुक्त करण्यासाठीच, सरकारने पारदर्शक अशी online व्यवस्था आणलेली आहे.

यात तुम्ही ऑनलाईन अर्ज भरून त्यासाठी लागणारे शुल्क ऑनलाइन भरून घरबसल्या पॅनकार्ड अगदी सहजपणे मिळू शकता.

पॅनकार्ड म्हणजे परमनंट अकाऊंट नंबर, हा अकाउंट नंबर तुम्हाला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटतर्फे तुमचे आर्थिक व्यवहार करण्यासाठी देण्यात आलेला असतो.

 

pan-card-inmarathi

 

पॅन कार्डच्या मदतीने इन्कम टॅक्स डिपार्टमेंट देशातील आर्थिक उलाढालीकडे सहजपणे लक्ष देऊ शकते. पॅन कार्डच्या साहाय्याने आर्थिक व्यवहार केल्यामुळे तुमच्या टॅक्सबद्दलची संपूर्ण माहिती इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला लीलया मिळते.

आजकाल तर अगदी चाळीस हजाराच्यावर आर्थिक व्यवहार करायचा असेल तरी देखील तुम्हाला पॅनकार्डची आवश्यकता आहे. याशिवाय इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी देखील पॅनकार्ड गरजेचे आहे. घर किंवा प्लॉट घेण्यासाठी देखील तुम्हाला पॅनकार्ड आवश्यक आहे.

यासोबतच सध्या तर तुम्हाला हे पॅनकार्ड तुमच्या बँक अकाउंटसोबत देखील लिंक करावे लागते. आजच्या काळात भारतात आधार कार्ड आणि इलेक्शन कार्ड एवढेच पॅन कार्डदेखील महत्त्वाचे आहे.

 

aadhar-inmarathi

 

ऑनलाइन अर्ज कसा करावा?

पॅनकार्डसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत अत्यंत सोपी आहे. त्यासाठी तुम्हाला TIN-NSDL च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन, तिथे आवश्यक ती सर्व माहिती भरावी लागेल आणि तुमची संपूर्ण माहिती भरुन झाल्यानंतर पंधरा दिवसांच्या आत तुमच्या हातामध्ये पॅनकार्ड असेल. यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या काही स्टेप्स पाळणं गरजेचे आहे.

१. सर्वप्रथम तुम्ही TIN-NSDL च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन Services या ऑप्शन वर क्लिक करा.

२. त्या ठिकाणी आवश्यक ती सर्व महत्त्वाची माहिती आपल्या आधार कार्ड प्रमाणे भरावी; उदाहरणार्थ नाव नागरिकत्व इत्यादी. तुमची माहिती भरल्यानंतर त्या ठिकाणी खाली Captcha code अगदी जसा दिसतो तसा भरून सबमिट या बटणावर क्लिक करा.

 

captcha-inmarathi

 

३. सबमिट झाल्यानंतर ती वेबसाईट तुम्हाला पुढे डॉक्युमेंट सबमिट करण्याच्या पेजवर घेऊन जाईल. याठिकाणीही तुम्हाला काही पर्याय उपलब्ध करून दिलेले असतील.

याच पर्यायांचा वापर करत तुम्हाला तुमची सर्व आवश्यक कागदपत्रे सबमिट करायची आहेत. सगळी कागदपत्रे अपलोड केल्यानंतर या बटणावर क्लिक करा.

४. हे झाल्यानंतर तुम्हाला आणखी एका पेजवर माहिती भरावी लागेल. या पेज वर तुमच्या उत्पन्नाचा स्रोत, तुमचा पत्ता, संपर्क क्रमांक इत्यादी माहिती भरावी लागेल. तुमची माहिती भरून झाल्यानंतर save draft वर क्लिक करा.

५. त्यानंतर पुढे तुम्हाला तुमच्या वास्तव्याचा पत्ता वर इतर गोष्टींबद्दल संपूर्ण माहिती भरावी लागते. ती माहिती भरून झाल्यानंतर तुम्ही नेक्स्ट या बटणावर ती क्लिक करा.

६. नेक्स्ट या बटणावर क्लिक केल्यानंतर वेबसाईट तुम्हाला आणखी एका पेजवर घेऊन जाईल. या पेजवर तुम्ही सबमिट केलेल्या कागदपत्रांची माहिती देणे आवश्यक असते. ही माहिती दिल्यानंतर सबमिट बटणवर क्लिक करून तुम्ही तुमचा अर्ज यशस्वी पद्धतीने सबमिट करू शकता.

तुमचा अर्ज सबमिट झाला याचा अर्थ काम संपले असे नाही. तर पॅनकार्ड तयार करण्यासाठी लागणारे शुल्क देखील तुम्हाला ऑनलाइन पद्धतीनेच भरावे लागणार आहे.

 

online-payment-inmarathi

 

त्यामुळे शुल्क भरताना तुमच्या आधार कार्डशी निगडित मोबाईल नंबरवर ओटीपी म्हणजेच वन टाइम पासवर्ड येईल पासवर्डच्या सहाय्याने तुम्ही शुल्क भरू शकता. याच्या नंतर अगदी काही सेकंदांमध्ये तुम्हाला शुल्क भरण्याची ऑनलाईन पावती उपलब्ध होईल. हे सर्व पार पडल्यानंतर १५ दिवसांच्या आत तुमचे पॅनकार्ड तुमच्या हातात असेल.

काय मग मंडळी, आहे की नाही उपयुक्त माहिती? मग तुमच्या ओळखीच्या लोकांसोबत सुद्धा ही माहिती जरूर शेअर करा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?