' यंदाच्या मकरसंक्रांतीला केवळ परंपरा म्हणून नव्हे, तर आरोग्यासाठी तिळगुळ खा! – InMarathi

यंदाच्या मकरसंक्रांतीला केवळ परंपरा म्हणून नव्हे, तर आरोग्यासाठी तिळगुळ खा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

संक्रांतीनिमित्त केली जाणारी तिळाची पोळी असो की तिळगुळाच्या वड्या, लाडू असोत. या सगळ्याच्या मागे केवळ सणांची परंपरा जपणे हा उद्देश नाही तर त्याला काही शास्त्रीय आधारही आहे. तिळाचे गुणधर्म आणि उपयुक्तता समजली तर तिळाचा वापर केवळ सण म्हणून न करता आरोग्यासाठिही कराल. जाणून घ्या तिळाचे महत्व –

आपल्याकडे थंडीच्या दिवसांत तीळ, गूळ हे उष्ण पदार्थ खाण्याची परंपरा आहे. ऐन थंडीत साजरा केला जाणारा मकर संक्रांतीचा सणही तिळकुटाचं सारण भरून केलेल्या गुळाच्या पोळीनं साजरा केला जातो.

किंबहुना थंडी सेलिब्रेट करण्यासाठीच संक्रांतीचं प्रयोजन असावं.

आयुर्वेदानंही तिळाचं महत्व सांगून त्याचा आपल्या आहारात समावेश करायला सांगितलेला आहे याचं कारण, या छोट्याशा दिसणार्‍या दाण्यात पौष्टिकतेचा खजिना दडला आहे.

 

tilgul inmarathi

हजारो वर्षांपासून आपल्या स्वयंपाकात या ना त्या स्वरूपात तिळाचा समावेश केलेला आहेच शिवाय तिळाचं तेलही वापरलं जातं. तिळात कॅल्शियम असतंच पण याव्यतिरिक्त मॅन्गनीज, लोह, फॉस्फरस, सेलेनियम, ब गटातील जीवनसत्व आणि तंतुमय पदार्थही असतात.

तिळातील कॅल्शियम हाडांसाठी चांगलं आहे. तिळातलं झिंक हाडांचा ठिसुळपणा रोखण्यास मदत करते. स्त्रियांनी तर आहारात तिळाचा वापर नियमितपणे केलाच पाहिजे.

विशेषत: मेनोपॉजमधे हाडांचा ठिसूळपणा वाढण्याची शक्यता असते तेंव्हा याची मदत होते. तिळातलं लोह आणि कॉपर शरीरातल्या आयर्नच्या शोषणाला मदत करणारं असतं.

म्हणूनच संधीवातासारख्या व्याधीत तिळाच्या तेलानं मालिश केल्यानं, त्याचं सेवन केल्यानं रूग्णांना आराम वाटतो. या शिवायही तिळाचे अनेक फायदे आहेत –

 

१. केसांच्या वाढीसाठी –

 

hair style inmarathi

 

केस गळतायत? मग तिळाचं तेल तुम्ही वापरायला हवं. तिळाचं तेल केसांची मुळं घट्ट बनवतं. यातलं ओमेगा फॅटी ॲसिड केसांच्या वाढीसाठी पोषक असतं. इतकंच नाही तर केसांची झालेली हानिदेखिल ते भरून काढतं. तुटके, खरखरीत केस, टोकाला दुभंगलेले केस या सगळ्या समस्या तिळाच्या तेलानं आटोक्यात येतात.

त्वचेला मुलायम बनविण्याच्या याच्या गुणधर्मामुळे केसांच्या खाली ती त्वचा असते तिला तिळाचं तेल मृदू बनवतं आणि कोंडा होत नाही. त्वचेचं आरोग्य राखलं जातं.

त्वचेचं रक्ताभिसरण वाढल्यानं केसांची वाढही होते. एकूणच केसांच्या आरोग्यासाठी तिळाचं तेल फार उपयुक्त पर्याय आहे.

 

२. ॲण्टी एजिंग गुणधर्म –

 

anti ageing inmarathi

 

तिळाच्या दाण्यांत ॲण्टिऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात. यामुळे वयोमानानुसार त्वचेत होत जाणारे बदल रोखण्यास मदत होते. त्वचेला सुरकुत्या पडणे, ती निस्तेज होणे, डागाळलेली होणे या सगळ्यावर तीळ उत्तम काम करतात.

तिशीनंतरही त्वचा तरूण दिसायची असेल तर तिळाच्या तेलाचा वापर म्हणूनच त्वचेसाठी फ़ायद्याचा असतो.

 

३. त्वचेच्या आरोग्यासाठी –

 

skin care inmarathi

 

चेहराच नव्हे, तर एकूणच त्वचेच्या आरोग्यासाठी तीळ उपयुक्त आहेत. तीळ हे मुळातच तैल बी गटातलं आहे तिळात तेल असतं. हे तेल त्वचेवर जादुई परिणाम करतं. त्वचा मृदू मुलायम हवी असेल तर तिळाचं तेल नियमीत वापरावं.

Anti-inflammatory गुणधर्मामुळे त्वचेवर पाणारे लालसर डाग, सुजटपणा आदींवर याचा वापर उपयुक्त ठरतो.एक टेबलस्पून ऑलिव्ह ऑईल आणि दोन चमचे तिळाची पावडर एकत्र करून हे चेहर्‍यावला लावावं.

ही पेस्ट लावण्यापूर्वी चेहरा धुवून हलका पुसावा. उत्तम परिणामांसाठी आठवड्यातून एकदा किंवा दोनदा हे लावावं. मात्र तेलकट त्वचा असणार्‍यांनी डॉक्टरच्या सल्ल्यानेच याचा वापर करावा.

 

४. दातांच्या आरोग्यासाठी –

 

dental health inmarathi

 

तिळाच्या बियातलं जे तेल असतं ते दातांच्या आरोग्यासाठीही उत्तम आहे. दातातल्या प्लाकसारख्या समस्या याच्या वापरानं दूर होतात.

 

५. पचनासाठी उत्तम –

 

digestive system inmarathi

 

काळे तीळ बध्दकोष्ठतेवर उत्तम परिणाम करतात. यातल्या तंतुमय घटकांमुळे आणि unsaturated fatty acids मुळे बध्दकोष्ठतेवर आराम मिळतो.

आतड्याला मृदू करण्याचं, सारक बनण्याचं काम तिळातलं तेल करतं. ज्यांना बध्दकोष्ठतेचा त्रास वरचेवर होतो त्यांनी तिळाचा आहारात वापर करावा.

 

६. एनर्जीचा स्त्रोत –

 

ranveer singh inmarathi

 

यात जे fats चं मुबलक प्रमाण आहे त्यामुळे एनर्जी मोठ्या प्रमाणात मिळते. तिळाच्या तेलात polyunsaturated fatty acids आणि omega-6 मुबलक असल्यानं ते एनर्जीचा पुरवठा करणारं असतं.

याशिवाय यात, भरपूर तंतुमय पदार्थ, आयर्न, कॅल्शियम, मॅग्नेशियम असल्यानं एनर्जी लेव्हल उत्तम रहाते.

 

७. ब्लड प्रेशर नियंत्रणात रहाते –

 

blood pressure inmarathi

 

यात असणार्‍या मॅग्नेशियममुळे उच्च रक्तदाब नियंत्रणात रहातो. तिळाच्या तेलातील Polysaturated fats आणि compound sesame यामुळे रक्तदाब नियंत्रणात रहाण्यास मदत होते.

 

८. हाडांच्या बळकटीसाठी –

 

healthy bones inmarathi

 

पस्तिशीनंतर हाडाचा ठिसूळपणा वाढत जातो. विशेषत: मेनोपॉजच्या काळात स्त्रियांना हाडांशी संबंधीत समस्या जाणवू लागतात. Osteoporosis चा त्रास भेडसावू लागतो. या सगळ्यावर तिळाचं तेल उत्तम काम करतं.

तिळाच्या तेलाचा आहारातला वापर आणि तिळाच्या तेलाचा मसाज हे दोन्ही केल्यानं हाडांचं आरोग्य राखण्यास मदत होते.

 

९. तणावावर मात करण्यासाठी –

 

stress-inmarathi

 

तणावावर मात करायचीय? तणावामुळे रात्र रात्र झोप लागत नाही? मग तिळाचा वापर करून बघा. तिळातल्या अमिनो ॲसिडला tyrosine म्हणून ओळखलं जातं. याचा थेट संबंध serotonin activity आहे.

Serotonin हे neurotransmitter आहे जे आपल्या mood वर परिणाम करणारं असतं. यात जर असंतुलन झालं तर आपल्याला डिप्रेशन आणि तणाव जाणवू लागतो.

तज्ञांच्या मते सेरोटोनिन असणार्‍या खाद्यपदार्थांच्या आहारातल्या समावेशानं यावर मात करता येते. तिळाचं तेल यासाठी उत्तम पर्याय आहे.

१०. Unsaturated fats चा उत्तम स्त्रोत –

बाजारात जे बटर किंवा तूप मिळतं त्यात हे unsaturated fats असतात मात्र ते हानिकारक असतात. तिळाच्या तेलातले unsaturated fats मात्र याला अपवाद असतात.

आहार तक्त्यानुसार तिळात प्रत्येक १०० ग्रॅममधे ४० ग्रॅम monosaturated fats, ४२ ग्रॅम polysaturated fats आणि १४ ग्रॅमहून अधिक saturated fats असतात.

तिळाचा आहारात समावेश कसा करावा? –

· साखर, गूळ किंवा पामशुगर यांचा पाक करून त्यात भाजलेले तिळ घालून लाडू करावेत.

· तिळाच्या वड्या, गजक, तिळपापडी करावी.

 

til vadya inmarathi

 

· तिळ हलके भाजून ठेवावेत आणि सकाळी नाष्ट्यात जे खातो त्यावर भुरभुरावेत.

· पोह्यासारख्या पदार्थात फोडणीत घालावेत

· फळ भाजी करताना फोडणीत घालावेत किंवा शेंगदाण्याचं कूट करताना त्यात मिसळावेत.

· योगर्ट किंवा स्मूदीत घालावेत

· रात्रभर भिजत घातलेले तीळ कॅल्शियम आणि खनिजं यांचं शोषण करण्याची ताकद वाढवतं शिवाय यात असणारा oxalic acid चा परिणाम कमी करतं. ज्याचा काहीजणांना त्रास होतो.

· ज्यांना किडनी स्टोनचा त्रास आहे किंवा ज्यांचा कोठा हलका आहे अशांनी तिळाचा वापर टाळावा किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय खाऊ नयेत.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?