भारतात सोन्याचा धूर निघायचा, तो ‘मिनी इंग्लंड’ मानल्या जाणाऱ्या या खाणीतून
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
“केजीएफ बघितला का?” हा प्रश्न सध्या सगळीकडे विचारला जात आहे. पहिला भाग ज्यांनी बघितला असेल त्यांना आठवत असेल की हा तोच सिनेमा आहे ज्यामध्ये दर पाच मिनिटांनी फायटिंग आहे. भलीमोठी स्टारकास्ट आहे. परिस्थिती सोबत सामना करण्याची एक वृत्ती आहे.
नुकताच या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची घोषणा झाली असून त्याचं एक छोटं टीझर युट्यूबवर रिलीज केलं गेलं.
या टीझर ने युट्यूबवरचे सगळे रेकॉर्ड मोडीत काढून युट्यूबवरच्या ट्रेंडिंग मध्ये हा व्हीडियो दिसू लागला, आणि लोकांमध्ये या चर्चेला उधाण आलं!
साऊथच्या बाहुबली सिनेमाचे रेकॉर्डसुद्धा केजीएफ २ मोडेल अशीही चर्चा सध्या प्रेक्षकांमध्ये रंगताना दिसत आहे!
दक्षिणेकडचा सिनेमा असल्याने थोडी अतिशयोक्ती आहे. पण, दिगदर्शकाने दक्षिणेच्या सुपरस्टार यश कडून जे काम करून घेतलं आहे त्यातून या मूळ विषयाची दाहकता आपल्याला लगेच लक्षात येते.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
ज्यांनी KGF चा पहिला भाग बघितला नाही आणि दुसरा भाग सुद्धा बघू शकणार नाहीयेत, त्यांच्यासाठी केजीएफ म्हणजे काय? या सिनेमाची आणि विषयाची इतकी क्रेझ का आहे? याबद्दल जाणून घेऊयात.
कोलार गोल्ड फिल्ड्स (केजीएफ) ही बँगलोर पासून १०० किलोमीटर अंतरावर असलेल्या एक सोन्याच्या खाणीची कथा आहे. १२१ वर्ष जुनी असलेली आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाची खोल खाण आहे.
–
- “सोनं सापडलं!” – ऐकून बरं वाटतं! पण सोनं शोधण्याची ‘ही’ रंजक प्रक्रिया जाणून घेतलीत का?
- एक गूढ रहस्य : जगातील सर्वांत श्रीमंत पद्मनाभ मंदिराचा सातवा दरवाजा
–
१९०३ मध्ये जेव्हा इंग्रज भारतावर राज्य करत होते तेव्हा ते कोलार गोल्ड फिल्ड्सचा ‘मिनी इंग्लंड’ या नावाने उल्लेख करायचे. भारत देशातील वीजपुरवठा असलेलं हे १९०२ मध्ये एकमेव ठिकाण होतं.
ब्रिटिश सरकारने कोलार गोल्ड फिल्ड्सला पाणी पोहोचवण्यासाठी ‘बेथमंगला’ हा तलाव बांधला होता. हा तलाव काही वर्षांनी ब्रिटीश लोकांसाठी पिकनिक स्पॉट झाला होता.
एकेकाळी सर्व सोयींनी उपयुक्त असलेल्या या खाणीला २८ फेब्रुवारी २००१ रोजी आर्थिक नुकसान झाल्याने बंद करावं लागलं होतं. सोन्याचा उतरलेला भाव हे सुद्धा ही खाण बंद असण्याचं कारण सांगितलं जातं.
कोलार गोल्ड फिल्ड्समध्ये काम करणाऱ्या मजुरांची जशी संख्या वाढली तशी या भागातील लोकसंख्या वाढली होती.
९ लोकांच्या परिवाराने या शहरात लोकांची टाऊनशीप बनायला सुरुवात झाली होती आणि नंतर त्याचं रूपांतर हे ‘रॉबर्टसनपेट’ आणि ‘अँडरसनपेट’ या दोन टाऊनशीप मध्ये झालं होतं.
जोपर्यंत कोलार गोल्ड फिल्ड्स मध्ये सोनं होतं तोपर्यंत या ठिकाणचा सुवर्ण काळ होता असं म्हणता येईल. जसं या खाणीमधून सोनं मिळणं बंद झालं तसं या जागेचं वैभव निघून गेलं असे स्थानिक जाणकार लोक सांगतात.
कोलार गोल्ड फिल्ड्सचा इतिहास हा १००० वर्ष जुना आहे. १००४ साली कोलार मध्ये ‘चोला राज्य’ होतं. १११७ मध्ये होयसालस यांनी कोलारचा ताबा मिळवला आणि ‘चोला’ यांना पायउतार व्हावं लागलं होतं.
तत्पुर्वी चोला याने कित्येक मंदिरं निर्माण केली होती. ज्यामध्ये रेणुका माता आणि शिव मंदिरांचा समावेश होता.
त्यानंतर ३०० वर्षे विजयनगरचं प्रशासन तिथे होतं. त्यानंतर काही वर्ष मराठा, निजाम यांची सत्ता कोलार मध्ये होती.
जॉन टेलर २ या इंग्रज अधिकाऱ्याने १८८० मध्ये कोलार गोल्ड फिल्ड्स मधील खाणींचा ताबा घेतला होता. जॉन टेलर १९५६ पर्यंत इथल्या खाणीचे ते एकमेव मालक होते.
–
- हरवलेला इतिहास: भारताच्या “या” सुवर्ण युगाचा अभिमानास्पद इतिहास प्रत्येकाने समजून घ्यायलाच हवा
- जमीन खोदल्यावर पाण्याऐवजी या गावातून निघतंय सोनं !
–
जवळच एक वीजनिर्मितीचा प्रकल्प सुद्धा सुरू करण्यात आला होता. १९५६ मध्ये कोलार गोल्ड फिल्ड्सचा ताबा हा म्हैसूरच्या सरकारकडे सुपूर्त झाला होता. १९६० मध्ये नवीन लोकांमध्ये लोकप्रियता मिळवणं हे तितकं अवघड नव्हतं.
आज स्वातंत्र्य असूनही स्वच्छता, शिस्त हे प्रश्न कोलार गोल्ड फिल्ड्स मध्ये मोठ्या प्रमाणावर आहेत. खूप मोठी जागा आणि कामगार उपलब्ध असलेल्या कोलार गोल्ड फिल्ड्स मध्ये औद्योगिक प्रगती व्हावी ही प्रत्येकाची इच्छा आहे.
पण, सोनं मिळण्याची शाश्वती नसल्याने सरकार किंवा कोणती खासगी कंपनी इथे कोणताच प्रकल्प सुरू करू शकत नाही.
“कोणतीही सरकारी किंवा खासगी कंपनी ही एका रात्रीतून बंद होऊ नये यासाठी भारतीय कायद्यात काही बदल करणं अपेक्षित आहे. सरकारने ही त्यांच्या मालकीची जागा असल्याकारणाने कंपनी सारखं या जागेकडे बघावं आणि त्याचं पुनर्वसन करावं.” असं एका रिसर्च मध्ये सांगण्यात आलं आहे.
काही वर्षांपूर्वी कर्नाटक राज्य सरकारने कोलार गोल्ड फिल्ड्सच्या जागेत एक इंडस्ट्रीयल पार्क उभारण्याचा निर्णय घेतला आहे. ३२०० एकर्स इतकी जागा वापरली जाणार आहे. या सर्व बदलांनंतर सामान्य माणसाला इथे जगणं सुसह्य होईल की असह्य होईल हे येणारा काळच ठरवेल.
आजच्या कोलार गोल्ड फिल्ड्स मध्ये जर का रस्ते, वीज, पाणी हे सहज उपलब्ध होऊ लागलं तर या जागेचा कायापालट नक्की होऊ शकतो.
असं झाल्यास सर्वांचा KGF चा जर तिसरा भाग तयार झाला तर तो फक्त एका जागेच्या सकारात्मक बदलांवर भाष्य करणारा असेल अशी अपेक्षा आपण करू शकतो.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.