' महिन्यात दिवस कधी ३० तर कधी ३१, फेब्रुवारीत तर त्याहून कमी… असं का? जाणून घ्या – InMarathi

महिन्यात दिवस कधी ३० तर कधी ३१, फेब्रुवारीत तर त्याहून कमी… असं का? जाणून घ्या

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

एका महिन्यात दिवस किती असतात? हे लक्षात ठेवण्यासाठी आपण सगळेच जण हाताच्या बोटांच्या मदतीने मोजमाप केली जाणारी एक पद्धती वापरतो.

जानेवारीचा महिना ३१ दिवसांचा तर फेब्रुवारी चा २८ दिवसांचा की लगेच मार्च ३१ दिवसांचा. लहानपणी या सर्व महिन्यांच्या बदलणाऱ्या दिवसांची आपल्याला फार गंमत वाटायची.

 

moth calculation inmarathi

 

लक्षात ठेवायचं तरी हे कोणत्या फॉर्म्युलामध्ये बसत नाही. कारण, सलग दोन येणारे जुलै, ऑगस्ट हे महिने सुद्धा ३१ दिवसांचे असतात.

बारा महिन्यांच्या एका वर्षात ६ महिने हे ३० किंवा त्यापेक्षा कमी दिवसांचे असतात. तर, उरलेले ६ महिने हे ३१ दिवसांचे असतात. असं आपण म्हणू शकतो.

पण, कोणत्या महिन्यानंतर कोणता महिना यावा, त्याचे दिवस किती असावेत? हे कोणत्या गोष्टींवर ठरलं असेल? हे प्रश्न जर तुम्हाला सुद्धा कधी पडले असतील तर त्याची उत्तरं या लेखात नक्की मिळतील.

ग्रेगोरीयन कॅलेंडर जे आपण सध्या फॉलो करतो ते जुन्या ज्युलियन कॅलेंडरचं बदललेलं स्वरूप आहे हे आपण जाणतो. हे कॅलेंडर म्हणजे सर्वात जुन्या रोमन कॅलेंडरची सुधारीत आवृत्ती आहे.

 

gregorian calendar inmarathi

 

महिन्यातील दिवसांची संख्या ही चंद्राच्या स्थितीने ठरवली गेली आहे. चंद्राच्या एका परिक्रमेला २९.५ दिवस लागतात. एका वर्षात ३६५ दिवस असावेत आणि वर्षात १२ महिने असावेत हे आधीच ठरवण्यात आलं होतं.

सर्वात पहिल्या रोमन कॅलेंडरमध्ये एका महिन्यातील दिवस हे केवळ २९ किंवा ३० या प्रमाणात ठरवण्यात आले होते. रोमन कॅलेंडर तयार करताना, ग्रीक कॅलेंडरप्रमाणे एका वर्षात १० महिनेच असावेत, असं ठरवण्यात आलं. त्यामुळे सगळ्या गोष्टी अधिक क्लिष्ट झाल्या.

त्यामुळे वर्षाच्या शेवटी ६५ दिवस शिल्लक रहायचे. या ६५ दिवसांसाठी जनुरिअस हा एक महिना आणि फेब्रुवारी हा दुसरा महिना, असे २ महिने वर्षाच्या शेवटी जोडण्यात आले.

७०० बी.सी. मध्ये सुरू झालेली ही प्रथा ४५२ बी.सी. पर्यंत सुरू होती. त्यानंतर एका रोमन कौन्सिलने जानेवारी आणि फेब्रुवारीला शेवटून काढून कॅलेंडरच्या सुरुवातीला जोडलं.

४६ बी.सी. म्हणजे येशू ख्रिस्त यांच्या जन्माच्या आधी ४६ व्या वर्षी ज्युलियस सीझर यांनी रोमन कॅलेंडरमध्ये प्रत्येक महिना हा ३० किंवा ३१ दिवसांचा असावा ही एक सुधारणा घडवून आणली.

 

christ inmarathi

 

अपवाद फक्त फेब्रुवारी महिन्याचा! ज्या महिन्यामध्ये २९ दिवस ठेवण्यात आले जे की ४ वर्षातून एकदाच येतील. ज्युलियस सीझर आणि त्याचा मुलगा ऑगस्टस यांच्या सन्मानासाठी जुलै आणि ऑगस्टमध्ये ३१ दिवस ठेवण्यात आले.

हे दोन्ही अधिकचे दिवस हे फेब्रुवारीमधून काढण्यात आले होते अशी नोंद आहे. १५८२ मध्ये सुरू झालेल्या या ग्रेगोरीयन कॅलेंडरने पृथ्वीच्या सुर्याभोवतीच्या प्रदक्षिणेला समोर ठेवून तयार केलेल्या या कॅलेंडरने वर्षातील सर्वात मोठा दिवस २१ मार्चची सुद्धा नोंद घेतली होती.

इतकंच नाही तर कॅलेंडरची सुरुवात ही ११ मार्चपासून होणार होती ज्यामुळे एकूण दिवसांमध्ये १० दिवसांचा फरक पडणार होता. हे दहा दिवस प्रत्येक वर्षात समाविष्ट करण्यासाठी ‘लिप इयर’चा नियम सुरू करण्यात आला.

ज्यामध्ये असं ठरलं की, दर चार वर्षांनी येणारा फेब्रुवारी हा महिना २९ दिवसांचा असेल. बारावे पोप ग्रेगोरी यांच्या संमतीने हे कॅलेंडर तयार करण्यात आलं आणि जे की पूर्ण जगाने मान्य केलं.

 

february calender inmarathi

 

ग्रेगोरीयन कॅलेंडर हे सर्वात आधी म्हणजे १५ ऑक्टोबर १५८२ पासून स्पेन, पोर्तुगाल आणि इटली या देशांनी अमलात आणलं. जुन्या ज्युलियन कॅलेंडरमध्ये हा दिवस ४ ऑक्टोबर १५८२ हा होता.

ब्रिटिश एम्पायरने ग्रेगोरीयन कॅलेंडर हे १७५२ मध्ये आमलात आणलं होतं. तेव्हा त्यांनी हा ११ दिवसांचा फरक २ सप्टेंबर १७५२ नंतर १४ सप्टेंबर १७५२ असं करून भरून काढला होता.

हे ही वाचा – इंग्रजी इतिहासातील चमत्कारिक वर्ष – २ सप्टेंबरला झोपलेली लोकं १४ सप्टेंबरलाच उठली!

ब्रिटिश लोकांची टॅक्स पद्धती सुद्धा दरवर्षी २५ मार्च पासून सुरू व्हायची. पण, १७५२ मध्ये बदललेल्या कॅलेंडरमुळे नवीन टॅक्स वर्षाचा दिवस ५ एप्रिल रोजी येऊ लागला.

त्यामुळे दरवर्षी ६ एप्रिल ही तारीख टॅक्स, भाडं यासाठी राखीव ठेवण्यात आली आणि त्याच कारणाने जगातील बहुतांश देशाचं आर्थिक वर्ष हे एप्रिल ते मार्च असं होण्यास सुरुवात झाली. ही पद्धत आजही कायम आहे.

एका वर्षातील १२ महिन्यांचं ३०, ३१ दिवसांचं हे गणित पूर्णपणे चंद्राच्या परिक्रमेवर ठरवण्यात आलं आहे आणि सर्वात जुन्या रोमन कॅलेंडरमुळे सुद्धा असं आपल्याला ढोबळ मानाने म्हणता येईल.

एका वर्षातील प्रत्येक महिना हा एकसारखा नसतो म्हणून सुद्धा त्यात एक नावीन्य आहे असं म्हणता येईल. अन्यथा, प्रत्येक महिना, वर्ष हे अगदीच एकसारखं वाटलं असतं.

 

kalnirnay inmarathi

 

तसं नाहीये, हे सुद्धा कधी विचार केला तर बरं वाटतं. ‘हाताची पाचही बोटं सारखी नसतात’ या म्हणीप्रमाणे वर्षाचे १२ महिने सुद्धा सारखे नसतात असं सुद्धा आपण म्हणू शकतो.

===

हे ही वाचा – आपल्या रोजच्या वापरातील कॅलेंडर कधी, कसं जन्मलं? भारतीय कॅलेंडरची सुुरुवात कधी झाली याचा रोचक इतिहास वाचा

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?