फक्त तिळगूळच नव्हे, संक्रांतीला या ६ गोष्टी करणं सुद्धा आहे तितकंच महत्त्वाचं!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
भारतीय संस्कृतीत सणांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. कोणताही सण असुदे, आपल्याकडे उत्साहाची कमतरता कधीच नसते. २०२० हे वर्ष सगळ्यांनीच घरी बसून काढलं होत पण त्यातही आपण घरबसल्या सण साजरे करण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा ओमिक्रोनचे सावट आहे.
गणपती, दिवाळी हे सण इतरवेळेसारखे साजरे झाले नाहीत, पण अनेकांनी उत्साहाने घरबसल्या वेगळीच दिवाळी साजरी केली. गणपतींचं दर्शन ऑनलाईन झालं… फराळही ऑनलाईनच वाटला गेला, सणाचे कपडे घालून जवळच्या लोकांना व्हिडिओ कॉल केले गेले… एकंदरीतच काय, सणांची हौस आपण थोडीफार का होईना, भागवलीच!
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
इंग्रजी वर्षातला पहिला सण म्हणजे “मकर संक्रांत”! वर्षाचा पहिला सण म्हणून या सणाचा महत्त्व जास्त आहे. भारतीय सणांची मांदियाळी याच सणापासून सुरु होते असं म्हटलं तर वावगं ठरायचं नाही. यादिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, म्हणून या सणाला “मकर संक्रांत” असं म्हटलं जातं.
मकर संक्रांतीला “तिळगुळ” वाटले जातात, पतंगबाजी, गुळपोळी, हळदीकुंकू यांची रेलचेल असते, पण तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का, की दरवर्षी हा सण १४ जानेवारीलाच का येतो? याच उत्तर आमच्याकडे आहे…
===
हे वाचा : मकर संक्रांत १४ किंवा १५ जानेवारीलाच का येते? या दिवशी पतंग का उडवतात? वाचा
===
आता पाहूया अशा काही गोष्टी ज्या संक्रांतीला करायलाच हव्यात:
१. भोगीचे स्नान, भोगीची भाजी
संक्रांतीच्या आदल्या दिवशी “भोगी” हा सण साजरा केला जातो. यादिवशी पाण्यात तीळ टाकून स्नान केले जाते. याशिवाय भोगीची भाजी, तीळ लावून ज्वारी किंवा बाजरीची भाकरी खाल्ली जाते.
हिवाळ्यात अनेकविध भाज्या येतात, या काळातील भाज्यांची चव ही काहीशी वेगळीच असते. या मिक्स भाजीमुळे आणि तिळामुळे अंगात उष्णता निर्माण होते, जी हिवाळ्यात फार गरजेची असते. म्हणूनच ‘न खाई भोगी तो सदा रोगी’ असं म्हटलं जातं. वर्षाची सुरुवातच ऊर्जात्मक झाल्याने वर्षभर काम करण्याचा उत्साह टिकून राहतो.
२. तिळगुळ घ्या, गोडगोड बोला
आपल्याकडे कोणताही सण म्हटला तरीही गोड खाणं हे ओघाने आलंच, पण संक्रांतीला गोडाचं जरा जास्तचन महत्त्व आहे. “तिळगुळ घ्या, गोडगोड बोला” हे आपण लहानपणापासून ऐकत आलोय, पण तिळगुळच का?
तीळ आणि गूळ हे उष्णतेचा उत्तम स्रोत आहे. जानेवारीत असणाऱ्या थंडीत शरीराला उष्णतेची गरज असते. ही उष्णता योग्य प्रमाणात तिळगुळातून किंवा गुळाच्या पोळीतून मिळते. त्यामुळे हे पदार्थ या दिवसांमध्ये खाल्ले पाहिजेतच. अर्थात, योग्य प्रमाणातच बरं का!
३. काळे कपडे
मकर संक्रांतीच्या बाबतीत अनेक श्रद्धा- अंधश्रद्धा आहेत, पण वैज्ञानिक कारण बघायचं झालं, तर मगाशी म्हटल्याप्रमाणे थंडीत ऊब मिळणं महत्त्वाचं असतं. काळ्या कपड्यांमध्ये उष्णता टिकून राहते, म्हणून यादिवशी काळे कपडे घालून सण साजरा करतात.
४. बोरन्हाणं
तुमच्या घरात लहान मूल असेल, तर ही गोष्ट तुम्ही केलीच पाहिजे. या दिवसात बोरं खूप छान मिळतात. म्हणूनच बोरं, फुटाणे, चॉकलेट्स, कुरमुरे, छोटी बिस्किटं अशा गोष्टी एकत्र करून ‘बोरन्हाण’ केलं जातं.
यानिमित्ताने, इतर लहान मुलांना घरी बोलवलं जातं आणि लहान मुलांनाही मज्जा येते. एक “फन ऍक्टिव्हीटी” म्हणून हे नक्की करून पहा.
५. हळदी-कुंकू
स्त्रियांची आवडीची गोष्ट म्हणजे, हळदी-कुंकू. वाण देणे- घेणे, त्यानिमित्ताने एकत्र भेटणे, गप्पा मारणे या गोष्टी घडतात. रोजच्या धकाधकीच्या जीवनात तोच काय तो दिलासा!
६. पतंगबाजी
जुन्या काळी सकाळच्या वेळी अंघोळ वगैरे करून पतंग उडवण्याची पद्धत होती. जेणेकरून त्वचेशी कोवळ्या सूर्यकिरणांचा संपर्क यावा. सूर्याची कोवळी किरणे म्हणजे ड जीवनसत्वाचा स्त्रोत! पतंग उडवताना सण साजरा करत आरोग्य राखले जावे म्हणून ही पद्धत आहे.
७. हलव्याच्या दागिन्यांची हौस
नवीन लग्न झालेल्या वधूसाठी ही मजा काही औरच असते. पहिलं हळदी-कुंकू, हलव्याचे दागिने घालून काढलेले फोटो, काळी साडी यांची हौस यंदाच्या संक्रांतीत अनुभवायला हवीच.
अजूनही आपण सगळेजण कोरोनाच्या भीतीतच जगत आहोत, पण तरीही योग्य काळजी घेऊन आपण घरच्या घरीच सणांचा आनंद घेऊ शकतो.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.