चीनवर नजर ठेवणाऱ्या भारतीय सैन्याची “उबदार” मदत करणारं “हिम तापक”
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
“थंडी जरा जास्त आहे यावर्षी…” वातावरणानुसार आपण आपली जीवनशैली बदलत असतो. ‘गिझर’, ‘एअर कंडिशनर’सारखी घरातील उपकरणं ठराविक ऋतूमध्येच जास्त उपयोगी पडत असतात.
स्वतःची काळजी घेत असताना संवेदनशील लोकांना लडाख, सियाचीनमध्ये आपले सैन्य इतक्या कमी तापमानात कसे तैनात राहत असतील? हा प्रश्न नक्कीच पडत असेल.
सियाचीनमध्ये तर सध्या बर्फवृष्टी होत आहे, रस्त्यावरही बर्फ आहे. अशा वातावरणात लडाख, सियाचीनमध्ये अन्न आणि इतर अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक करणं हे सुद्धा आपल्या सैन्यासमोर एक आव्हान आहे.
भारतीय सैनिकांना त्यांच्या कामावर लक्ष केंद्रित करता यावं आणि भौगोलिक आव्हानांचा सामना करता यावा म्हणून DRDO म्हणजेच डिफेन्स रिसर्च आणि डिफेन्स ऑर्गनायझेशन ही संस्था नेहमीच तत्पर असते.
या संस्थेची स्थापना १९५८ मध्ये करण्यात आली आहे. भारतीय संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत ही संस्था काम करत असते. ही संस्था वैमानिक, इलेक्ट्रॉनिक, मिसाईल्स, मटेरिअल्स या क्षेत्रात भारतीय सैनिकांना नेहमीच मदत करत असते.
डिआरडीओने नुकतंच सियाचीनमध्ये तैनात असलेल्या आपल्या ५०,००० सैनिकांसाठी ‘हिम तापक’ म्हणजेच बर्फ वितळवणाऱ्या यंत्रणेची ऑर्डर केली आहे.
पूर्व लडाखमध्ये शून्य डिग्री किंवा त्यापेक्षा कमी तापमानात तैनात असलेल्या आपल्या सैनिक बांधवांना ‘हिम तापका’मुळे खूप मदत होणार आहे. वातावरणातील गारवा किंवा त्याची तीव्रता कमी करणे हा या यंत्रणेचा उद्देश आहे.
डिआरडीओ सोबत संलग्न असलेल्या डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ फिसिओलॉजी अँड अलाईड सायन्सेसचे डायरेक्टर श्री. राजीव वार्ष्णेय यांनी नुकतीच या प्रोजेक्टची माहिती मीडिया सोबत शेअर केली.
‘हिम तापका’बद्दल माहिती देतांना श्री. राजीव यांनी सांगितलं, की “हिम तापक हे तेलाची कमीत कमी गरज पडणारं उपकरण आहे.
‘हिम तापका’मुळे भारताची वार्षिक रु. ३,६५०/- करोड इतक्या किमतीच्या तेलाची बचत होणार आहे. ‘हिम तापक’ म्हणजे स्पेस हिटिंग डिव्हाईस निर्मितीच्या ऑर्डरचा खर्च हा रु. ४२० करोड इतका असणार आहे. ‘हिम तापक’ हे काही दिवसांनी इतर ठिकाणी सुद्धा लावण्यात येईल.
आपण पैश्यांची तर बचत करणारच आहोत. त्याशिवाय हवेच्या गतीमुळे वातावरणात पसरणाऱ्या कार्बन मोनॉक्साईडचा प्रादुर्भाव रोखू शकणार आहोत. या कारणामुळे आपल्या कित्येक जवानांना याआधी जीव गमवावा लागला होता.
उंचीवर काम करणाऱ्या सैनिकांसाठी हवेचा जोर आणि बॅकब्लास्टचा धोका नसणारी यंत्रणा असणार आहे. ‘बॅकब्लास्ट’ म्हणजे तो त्रिकोणी भाग जिथे रॉकेट, बंदूकमधून धूर बाहेर पडतो. या धुराचा धोका ‘हिम तापकात’ अजिबात नाहीये.
‘हिम तापका’ची क्षमता ही ६ लिटर्स इतकी असणार आहे. ती क्षमता पूर्ण वापरणाऱ्या ‘हिम तापका’ मधून कार्बन मोनॉक्साईडसारख्या कोणताही गॅस वातावरणात सोडला जाणार नाही.”
–
शिक्षण अर्धवट सोडून सुतारकाम करणारा, बनलाय सगळ्यात मोठा एडिटर!
पाकिस्तानात भारताचा ठसका – अस्सल भारतीय रेस्टॉरंट : इंडियन चस्का..!
–
डीआरडीओने या व्यतिरिक्त, “अलोकल क्रीम”ची निर्मिती केली आहे, जी सैनिकांना बर्फाळ प्रदेशात काम करतांना उपयुक्त असणार आहे. बर्फाळ प्रदेशात काम करताना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी ‘फ्लेक्सिबल वॉटर बॉटल’ आणि ‘सोलर स्नो मीटर’ची सुद्धा निर्मिती करण्यात आली आहे.
तिबेटीयन सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांना या यंत्रणेचा सध्या खूप उपयोग होत आहे. फ्लेक्सिबल वॉटर बॉटल ही -५० ते -१०० डिग्री तापमानात सुद्धा पाण्याचा बर्फ न होऊ देण्यासाठी केलेलं प्रयोजन आहे. त्याशिवाय या बॉटल मध्येच फिल्टर सुद्धा बसवण्यात आलं आहे.
श्री. सतीश चौहान या शास्त्रज्ञाने ‘सोलर स्नो मीटर’ बद्दल माहिती दिली, की “सौर्य ऊर्जेवर चालणाऱ्या या मीटरमुळे प्रति तास ५ ते ७ लिटर्स इतकं पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे. पाणी स्टोअर करण्याची बॉटल ही या मीटर सोबत जोडलेली असेल. -४० डिग्री तापमानात सुद्धा हे स्नो मीटर काम करू शकणार आहे.”
देशाच्या सुरक्षेची धुरा आपल्या खांद्यावर घेणाऱ्या सैनिकांची सुरक्षा जास्त महत्त्वाची आहे आणि त्याचसाठी केले जाणारे हे प्रयत्न पाहून खरोखरंच बरं वाटतं!
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.