' जागा २० एकर, टर्नओव्हर ५०० कोटी, जगप्रसिद्ध भारतीय वाईन ब्रॅंडची कथा! – InMarathi

जागा २० एकर, टर्नओव्हर ५०० कोटी, जगप्रसिद्ध भारतीय वाईन ब्रॅंडची कथा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

वाईन – हे एक मद्यपेमींचं आवडतं पेय आहे. वाईनची विक्रमी विक्री करण्याचा पराक्रम महाराष्ट्रातील एक उद्योग समूह मागच्या २० वर्षांपासून करत आहे. २००० साली सुरू झालेला हा प्रकल्प आता ५०० करोड टर्नओव्हरपर्यंत पोहोचला आहे.

होय, आम्ही नाशिकच्या ‘सुला वाईन्स’ बद्दलच बोलत आहोत. जाणकार आणि दर्दी लोकांनी नाशिकच्या ‘सुला वाईन्सला नक्कीच भेट दिली असेल. जितकी त्यांच्या वाईनची चव चांगली तितकीच नाशिकची ‘सुला वाईनयार्ड’ ही जागा खूप प्रेक्षणीय आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

समोर हिरवेगार शेत, मध्यभागी गॅलरी सारखं एक हॉटेल किंवा टेस्ट सेंटर, लांब नजर जाईपर्यंत दिसणारी शेती आणि हातात वाईनचा ग्लास हा अनुभव आपल्यापैकी कित्येकांनी घेतला असेल.

 

sula wine inmarathi2

 

द्राक्षाच्या शेतीसाठी प्रसिद्ध असलेलल्या नाशिक शहरात सुला वाईन्सची निर्मिती आणि निर्यात करून सुला वाईन्सने जगातील प्रमुख वाईन तयार करणाऱ्या कंपन्यांमध्ये आपलं स्थान निर्माण केलं आहे.

‘राजीव सामंत’ या मराठी माणसाने या उद्योगात उतरणं आणि इतकी मोठी मजल मारणं हे खरंच कौतुकास्पद आहे. काही वर्ष भारताबाहेर काम करून मग नाशिकमध्ये हा व्यवसाय सुरू करण्याचा कसा अनुभव होता राजीव सामंत यांचा? जाणून घेऊया.

सुरुवात कशी झाली?

 

sula wine inmarathi1

१९९६ मध्ये ‘सुला वाईन्स’ ची सुरुवात करणारे राजीव सामंत यांचा जन्म मुंबईत झाला होता. स्टॅनफोर्ड विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्रात पदवीचं शिक्षण घेतलं आणि पदव्युत्तर शिक्षण हे इंजिनियरिंग मॅनेजमेंट मध्ये घेतलं होतं. दोन वर्ष अमेरिकेत नोकरी केल्यानंतर त्यांना भारतात येऊन स्वतःचा व्यवसाय करण्याची इच्छा होती.

राजीव सामंत यांच्या परिवाराने नाशिकमध्ये २० एकर्सचा एक प्लॉट खूप आधी घेतला होता. सुरुवातीच्या काळात या शेतामध्ये आंबे, फुलं, सागवान, द्राक्ष असे विविध प्रकारची शेती केली जायची.

१९९६ मध्ये राजीव सामंत यांच्या लक्षात आलं, की नाशिकचं वातावरण हे द्राक्षासाठी उपयुक्त आहे. काही दिवस संशोधन करून त्यांनी परत एकदा कॅलिफोर्नियाला जायचं ठरवलं.

‘केरी डांसकी’ या अनुभवी वाईन तयार करणाऱ्या व्यक्तीची राजीव सामंत यांनी भेट घेतली. नाशिकच्या वाईनसाठी उपयुक्त वातावरणाबद्दल त्यांनी केरी यांना सांगितलं. दोघांनी एकत्र येऊन नाशिकच्या जागेत वाईन तयार करण्याचा प्लॅन्ट सुरू करण्याचा निर्णय घेतला.

 

sula wine inmarathi3

 

१९९७ मध्ये या जोडीने फक्त वाईनसाठी उपयुक्त द्राक्षांवर लक्ष केंद्रित केलं आणि फ्रांस, कॅलिफोर्निया, चेनिन ब्लॅंक सारख्या झाडांची शेती भारतात प्रथमच केली. १९९८ मध्ये ‘सुला वाईनयार्ड्स’ ही कंपनी अस्तित्वात आली आणि २००० साली ‘सुला वाईन्स’ निर्मित पहिली वाईन लोकांपर्यंत पोहोचली.

२० वर्षात ‘सुला वाईन्स’ ही ६५% मार्केट शेअरसह भारतातील सर्वात मोठी आणि सर्व प्रकारच्या किमतीत, रंगात वाईन उपलब्ध असलेली एकमेव कंपनी आहे.

२००५ मध्ये सुला वाईन्सने ‘टेस्टिंग रूम’ची संकल्पना त्यांच्या नाशिकच्या प्लॅन्ट मध्ये सुरू केली. ही कृती त्यांच्या व्यवसायाला कलाटणी देणारी ठरली.

 

sula wine inmarathi

 

वाईन म्हणजे ‘फॉरेनच्या लोकांचं पेय’ हा समज दूर करण्यासाठी राजेश सामंत आणि केरी यांना काही काळ जाऊ द्यावा लागला. दोन वर्ष तर त्यांना फक्त वाईन बनवण्याचा परवाना मिळवण्यासाठी लागले. आज ‘सुला वाईनयार्ड्स’ मध्ये एकूण १००० हून अधिक लोक काम करत आहेत.

वाईन बनवण्यासाठी वेळ यासाठी लागतो कारण पांढरी, लाल यासारख्या वाईनच्या प्रकारानुसार वाईन तयार करण्याची पद्धत बदलते. २०१९ हे वर्ष सुला वाईन्सच्या विक्री वाढण्याचं विक्रमी वर्ष होतं. या वर्षात कंपनीने १० लाखांपेक्षा जास्त वाईन्सच्या सेटची विक्री केली होती.

वाईन जितकी जुनी तितकी चांगली हा एक सरसकट समज असतो, पण तो पांढऱ्या वाईनसाठी योग्य नाहीये. पांढरी वाईन ही तयार होण्यापासून दोन वर्षांच्या आत संपवावी लागते. याव्यतिरिक्त, लाल वाईन ही दहा वर्षांपर्यंत स्टोअर करून ठेवली जाऊ शकते.

“सुला रस आणि ‘कॅबरनेट’ हे दोन वाईन्सचे प्रकार दहा वर्षांपेक्षा जास्त टिकवली जाते” असं राजीव सामंत यांनी २० वर्षपूर्तीच्या मुलाखतीत सांगितलं होतं. ‘सुला वाईन्स’ आज अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि इटली सारख्या ३० देशांमध्ये वाईनची निर्यात करत असते.

 

sula wine inmarathi4

 

‘सुला’ हे नाव राजीव सामंत यांच्या आईच्या ‘सुलभा’ या नावावरून ठेवण्यात आलं होतं ज्याचा अर्थ संपन्न असा होतो. सुला वाईनसाठी काम करणारे शेतकरी हे सध्या महाराष्ट्र आणि कर्नाटक मध्ये काम करतात.

सुला वाईनयार्ड मध्ये काम करणाऱ्या कित्येक कामगारांचं आयुष्य हे मागील काही वर्षात खूप बदललं आहे. वाईन उत्पादनात असलेली आणि भारतीय लोगो वापरणारी ही एकमेव कंपनी आहे.

राजीव सामंत यांची भारताबद्दलची आत्मीयता अजून एका गोष्टीतून दिसते ती म्हणजे, ते स्वतः भारतातील वाईन इंडस्ट्रीबद्दलचे प्रश्न केंद्र आणि राज्य सरकार समोर नेहमीच मांडत असतात.

‘सुला वाईनयार्ड’ला वाईन निर्मिती आणि निर्यातीत उत्तरोत्तर असंच यश मिळत रहावं आणि सध्या भारतात पहिल्या क्रमांकावर असलेली कंपनी एक दिवस जगात प्रथम क्रमांकावर असावी यासाठी शुभेच्छा!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?