Site icon InMarathi

एकेकाळी फक्त वस्तू नव्हे, तर चक्क मुलं पार्सल करून पाठवली जायची

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

“होम डिलिव्हरी मिळेल का?” हा प्रश्न आपण कोणतीही वस्तू ऑर्डर करत असतांना आवर्जून तपासून घेत असतो. कोणतीही वस्तू किंवा सेवा मिळवण्यासाठी आपल्या जागेवरून हलण्याची गरज नाहीये हे आता आपल्याला पटलेलं आहे.

काही वर्षांपूर्वी आपल्याला निदान टॅक्सी, रिक्षा, हेअरकट या सेवा मिळवण्यासाठी घराबाहेर पडावं लागायचं, पण आज या सेवा आपण घरी बसून मिळवू शकतो. इतकी आपली प्रगती झाली आहे.

परदेशात असलेल्या भारतीय मुलांचे आईवडील त्यांना हा प्रश्न नेहमी विचारत असतात, की “तिथे हे मिळतं का? तिथे ते मिळतं का?” त्यावेळी मुलं व्हिडिओ कॉल वर फक्त स्माईल करून सांगतात, की “आई-बाबा, इथे सगळंच मिळतं. तुम्ही काहीच काळजी करू नका.”

 

 

आजकाल सगळीकडे सगळंच मिळतं. जर काही मिळत नसेल तर कोणाची प्रत्यक्ष भेट. ऑनलाईन आपण बोलू शकतो, स्पर्श अनुभवू शकत नाही. २०२० मध्ये तर आपण हे खूप अनुभवलं. लहान मुलं आपल्या आजी-आजोबांना भेटू शकले नाहीत, ना शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना भेटू शकले.

“असं वर्ष पुन्हा येऊ नये” म्हणून आपण त्या वर्षाच्या बाहेर पडलो आहोत, पण त्या जखमा तशाच राहणार आहेत हे नक्की. कोणत्याही परिस्थितीतून पर्याय कसा काढायचा? हे आपण आता शिकलो आहोत.

आज अमेरिकेतील एका अशाच जोडप्याबद्दल सांगत आहोत, ज्यांनी परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी एक कधीही न अवलंबलेला मार्ग वापरला आणि एक ट्रेंड प्रस्थापित केला. जो की कित्येक वर्ष पुढे सुरू होता.

१९१३ मध्ये घडलेली ही सत्यघटना आहे. अमेरिकेत सरकारी पोस्ट, पार्सल ऑफिसचं काम नुकतंच सुरू झालं होतं. कित्येक कंपन्यांनी आपल्या मालाची वाहतुक करण्यासाठी पोस्टाच्या पार्सल सेवेचा वापर करायला सुरुवात केली.

 

 

एकेदिवशी, पार्सल ऑफिसमध्ये जेसी आणि मथीडा हे एक जोडपं आलं आणि ते म्हणाले, “आम्हाला आमच्या या मुलाला त्याच्या आजीकडे पार्सल करायचं आहे. त्याचं वजन ११ किलो आहे. हा पत्ता आहे. किती चार्जेस भरावे लागतील?”

एका दमात बोललेली ही चार (कधीही न ऐकलेली) वाक्य ऐकून पार्सल ऑफिस मधील सगळे कर्मचारी उभे राहून या जोडीकडे आश्चर्याने बघू लागले. त्या जोडीने आधी बोललेल्या वाक्याला दुजोरा दिला आणि सांगितलं, की “आम्ही असं ऐकलं की, तुम्ही मोठे पार्सल सुद्धा घेता. आम्ही आमच्या मुलाचा ५० डॉलर्सचा इन्श्युरन्स सुद्धा काढला आहे. ही त्याची पावती.”

आश्चर्याचा दुसरा धक्का बसलेल्या पोस्ट ऑफिस मधील कर्मचाऱ्याने बुकिंगचं बिल तयार केलं. १५ सेंट इतकी फीस त्या जोडीला भरायला सांगितली.

जेसीने ती फीस भरली आणि काही माईल्स दूर असलेल्या आपल्या आईकडे मुलाला पाठवण्यासाठी त्याने आपल्या मुलाला ऑफिसला सुपूर्त केलं. मुलगा सुद्धा न रडता पोस्ट ऑफिसच्या काकांडे जाऊन बसला. यात कोणतीही अतिशयोक्ती नाहीये. अमेरिकेत असं घडू शकतं.

 

 

काही तासांतच एक पोस्ट मॅन त्या मुलाला अगदी काळजीपूर्वक त्याच्या आजीच्या घरी घेऊन गेला आणि त्या मुलाला त्याच्या आजीच्या घरी सुपूर्त केलं. आजपर्यंत ४ पाउंडच्या वर वजन असलेल्या विटा, अंडी, स्नॅक्ससारखे पदार्थ लोकांपर्यंत पार्सल पोहोचवणाऱ्या पोस्टमॅनची सजीव व्यक्तीला एका ठिकाणाहून दुसरीकडे नेऊन पोहोचवण्याची पहिलीच वेळ होती.

हे पार्सल न पोहोचवण्याचा पोस्टाचा कोणता नियम नव्हता, पण अशी सेवा या आधी कोणी मागितली सुद्धा नव्हती.

१९१३ ते १९१५ या काळात ७ अशी पार्सल अमेरिकन पोस्ट ऑफिस मध्ये घेण्यात आली आणि सुखरूप पद्धतीने त्यांच्या अपेक्षित ठिकाणी सुस्थितीत पोहोचवण्यात आली.

ओहिओ या शहरात सुरू झालेली ही प्रथा काही वर्षांनी “रेल्वे मेल” या पद्धतीत मोडू लागले. लोकांना सुद्धा पॅसेंजर ट्रेनच्या तिकीटापेक्षा स्वस्त असलेली ही सेवा जास्त सोयीची वाटायला लागली होती.

अमेरिकन पोस्टने या पद्धतीचा वाढता अवलंब बघून नवीन नियमावली जाहीर केली, ज्यामध्ये घरातील इतर कोणत्याही व्यक्तीकडे मुलाला सुपूर्त करू नये असे नियम लावण्यात आले.

 

 

पार्सल म्हणून घेऊन जाणाऱ्या बाळांच्या तब्येतीची काळजी घेणं हे नेहमीच प्राधान्य असलं पाहिजे असं पोस्ट स्टाफला समजावून सांगण्यात आलं. बाळांना घेऊन जातांना त्यांच्यामुळे इतर कोणाच्याही पत्र, पार्सलला त्रास होऊ नये ही जबाबदारी पोस्टमॅनची असेल हे जाहीर करण्यात आलं.

अमेरिकन मीडियाने या घटनेची आणि बदलत्या नियमांची दखल घेतली आणि जबाबदारीने काम करणाऱ्या पोस्ट खात्याचं खूप कौतुक केलं.

जेसी आणि लथीडा यांनी सुरू केलेली ही प्रथा पुढे अजून एका परिवाराने सुद्धा सुरु ठेवली. फेब्रुवारी १९१४ मध्ये त्यांनी त्यांच्या मुलीला ७३ माईल्स लांब राहणाऱ्या आजीकडे पार्सलने पाठवलं.

सहा वर्ष वय असलेल्या त्यांच्या मुलीने या प्रवासात कोणताही त्रास दिला नाही. या प्रवासासाठी त्यांना ५३ सेंट इतकी फी भरावी लागली होती. पोस्टाच्या या सेवेचे लोकांनी खूप आभार मानले.

 

 

१९२० मध्ये पोस्ट मास्टर जनरल अल्बर्ट एस बुरलेसन यांनी अनुभवांती एक नवीन नियम काढला, की “इथून पुढे फक्त वस्तूंसाठी ही सेवा उपलब्ध राहील आणि सजीव व्यक्तींना ही सेवा इथून पुढे काही कारणास्तव दिली जाणार नाही.”

एका वर्षासाठी या नियमाची कडक अंमलबजावणी करण्यात आली, पण काहींनी त्यातून पळवाट काढायला सुरुवात केली. एका वर्षातच फ्लोरिडा ते व्हर्जिनिया एका ६ वर्षीय मुलीने ‘पार्सल’ म्हणून प्रवास केला आणि आपल्या आजीपर्यंत ती पोहोचली.

१९२१ मध्ये सुद्धा एका परिवाराने आपल्या घरातील ७ वर्षीय मुलीला ४० माईल्स लांब अंतरावर पाठवलं. या प्रकरणाची पोलीस सुप्रीटेंडेंट जॉन क्लार्क आणि रेल मेल सर्विसने चौकशी केली आणि काही दंड भरून त्यांना सोडण्यात आलं.

१०० वर्षांपूर्वी घडून गेलेल्या या घटनांबद्दल आज वाचूनही आश्चर्याचा धक्का बसतो. सेवा देणारे देतीलही, पण पालकांनी इतका मोठा धोका पत्करणे हे काही योग्य वाटत नाही. खूप जास्त प्रॅक्टिकल लोकच असा काही प्रयत्न करू शकतात हे नक्की!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version