Site icon InMarathi

मौल्यवान सोन्याच्या रक्षणासाठी रात्रभर हादडणारी धमाल सराफा गल्ली!

sarafa bazaar featured 2 inmarathi

Ritesh Arora | picasaweb.google.com

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

“हिंदुस्तान का दिल बसता है खाने में!” एक एका कोसावर जिथे बोलीभाषा आणि चवी बदलतात अशा भारताचं एक राज्य, भारताचं “फूड कॅपिटल” म्हणण्याजोगं आहे.

मध्य प्रदेश – जिथे कान्हा अभयारण्यापासून, संगमरवरचे पहाड, खजुराओची अप्रतिम कलाकृती, उज्जैनचं महाकाल मंदिर, सांचीचं स्तूप, मंडूचं जहाज महल, अहिल्याबाई होळकरांचा राजवाडा, ह्या अशा दैदिप्यमान ऐतिहासिक आणि नैसर्गिक वारस्याबरोबरच आधुनिकीकरणाची छाप सुद्धा मध्यप्रदेशावर पडलेली आपल्याला दिसून येते.

प्रेमळ माणसं, सगळ्यात स्वच्छ, प्रगत, आणि भारताचं भविष्यातील बँगलोर नंतरचं IT हब असलेलं शहर – इंदोर. या दोन्ही तर्हांचं सगळ्याच अर्थाने समागम असलेलं राज्य म्हणजे मध्यप्रदेश.

 

 

याशिवाय मध्यप्रदेश आपल्या खवय्यांसाठी पण ओळखलं जातं. गोड, तिखट सगळ्यांचाच अगदी स्पर्धा लावून मनमुरादआनंद लुटणारे, सच्चे खवय्ये मध्यप्रदेशातच सापडतात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

अगदी वेगवेगळ्या प्रकारच्या पानापासून, कुल्फी, मालपुआ, इमर्ती, खंडव्याची मावा जलेबी, रसमलाई, पोहे, चटपटीत गराडू, आणि सगळ्यात महत्त्वाचं टुरिस्ट आकर्षण असलेला, इंदोरची खाऊ गल्ली म्हणजेच सराफा बाजार!

जेव्हा सगळं जग झोपतं तेव्हा सराफ्यातले पदार्थ आपली सुगंधी जादू पसरवायला सुरुवात करतात. खमंग, चटपटीत, गोड सुगंध आपल्याला झोपेतून सुद्धा जागं करण्याची शक्ती त्यांच्यात असते.

 

 

ज्यांना बाहेरचं, तेलकट, तुपकट, तिखट, चटपटीत असं खायला अजिबात आवडत नाही, तेसुद्धा इथे आल्यावर आपल्या जिभेवर ताबा ठेऊ शकत नाही.

अगदी देश विदेशांतून इथल्या मेजवानीचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटक – नाही माफ करा – विदेशी खवय्ये सुद्धा इथे हजेरी लावतात.

ह्या प्रसिद्ध सराफा बाजाराचा इतिहास काही असा आहे, लोकांच्या म्हणण्यानुसार हा पूर्वी फक्त सराफा बाजार होता. सराफा म्हणजे जिथे सोन्या चांदीच्या दागिन्यांची, भांड्यांची, घडवण्याची दुकानं असतात.

तर पूर्वी हा फक्त एक सराफा होता, पण १०० वर्षांपूर्वी इथे बदल करण्यात आला. रात्रीच्या वेळी आपल्या दुकानांच्या रक्षणासाठी, इथल्या व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानासमोरची जागा इतर व्यावसायिकांना व्यवसायासाठी देण्याचं ठरवलं.

इंदोर तर खवय्यांचं शहर, म्हणून खाण्याचे ठेलेवाले इथे आपल्या गाड्या लावू लागले. याने दोन्ही कामं होत होती. दुकानांकडे लक्ष ठेवलं जायचं आणि ठेलेवाल्यांचा व्यवसाय सुद्धा. ही युक्ती फक्त इंदोरच्याच व्यापाऱ्यांनी नाही, तर जुनं दिल्ली, जुनं अहमदाबाद इथल्या व्यावसायिकांनी पण आजमावली.

पण इंदोरच्या अन्नपदार्थांत असलेल्या वैविध्यामुळे आणि तिथल्या लोकांच्या उत्साह आणि कल्पकतेमुळे हा बाजार जास्त प्रसिद्ध झाला.

 

हा बाजार रात्री ८ ला सुरु होतो आणि संपूर्ण रात्रभर लोकांना, अगदी त्यांच्या अंतरात्म्याला आपल्या वेगवेगळ्या पदार्थांनी तृप्त करून टाकतो. आपल्या फोनमध्ये इतके कॉन्टॅक्ट नसतील जितक्या प्रकारचे इकडे पदार्थ मिळतात.

लोकांची कल्पनाशक्ती आणि मेहनत यांचा मेळ म्हणजे सराफा. या सराफ्यात तुम्हाला खाण्याची सुरुवात करायची असेल तर सगळ्यात बेस्ट पदार्थ आहे, जोशी दही वडा सेंटरचा “उडता हुआ दहीबडा”.

दहीवडा बनवताना त्या भरलेल्या द्रोणाला ज्या कमालीने हवेत फेकून झेललं जातं ते पाहून आपण अगदी चकित राहतो. यानंतर सराफ्याची ओळख आणि लोकप्रिय पदार्थ – खोबरं पॅटिस.

 

 

आपण बटाट्याचंच पॅटिस बघितलेलं आहे, त्यामुळे आपल्यासाठी हा एक पूर्ण नवीन अनुभव ठरतो.

याशिवाय इथल्या काही प्रसिद्ध पदार्थांपैकी भुट्ट्याचा/ कणसाचा किस आणि आपल्या तळहातापेक्षाही मोठी असलेली जिलबी, ज्याला ह्या बाजारात “जलेबा” म्हटलं जातं.

ह्याशिवाय अनेक प्रकारचे पराठे, वैविध्यपूर्ण असलेला मालपुआ, घट्ट आणि चविष्ट रबडी, खीर, शुद्ध खव्याचे मोठाले गोड रसरशीत गुलाबजाम, किती तरी प्रकारची कुल्फी, पावभाजी, हॉट डॉग्स, पिज्जा, बर्गर, इमर्ती, खाव्याची जिलबी, सामोसा, कचोरी, पापडी चाट, स्पेशल डोसा, मोमो, वेगवेगळे जुस, दुधापासून बनलेले आणखीन भरपूर प्रकार, बापरे!

एवढं सगळं एकाच बाजारात. एक रात्र इथे घालवली तरीही पूर्ण सराफा बघून होणार नाही इतका मोठा हा बाजार आहे. इथल्या सगळ्या पदार्थांची चव घ्यायची असेल तर ३ – ४ रात्रीचा वेळ हवाच. हा बाजार, म्हणजे खवय्यांची “काशीच”!

 

आणि इथले लोक इथे काही फक्त साधंसुधं, चव घेण्यापुरतं खात नाहीत काही. त्यांची स्पर्धा लागते. इथल्या लोकांचं ब्रीद वाक्यच हे म्हणायला हवं “आपको यहाँ पेट भरने तक नही, पेट फटने तक खाना हैं!”

इथे ८० – १०० वर्ष जुनी असलेली दुकानं पण बघायला मिळतात. इथले व्यापारी इतके हुशार आणि पक्के व्यापारी आहेत, की चकाचक दुकान, फॅन्सी फूड ट्रक, ह्या सगळ्यात पैसे न गुंतवता आपल्या क्वालिटी आणि चविकडेच लक्ष केंद्रित करून आहेत.

म्हणून तुम्ही एकदा येऊन गेल्यावर काही वर्षांनी परत आलात तरी तुम्हाला ती चव तशीच खमंग मिळेल. त्यात काहीच बदल होणार नाही.

ह्या बाजारात फिरणं काही सोपं नाही. इथे आल्यावर काय खावं काय नाही अशी आपली अवस्था झाल्याशिवाय राहवत नाही. कारण आपल्याला इतकी मोठी खाऊ गल्ली बघण्याची सवय नसते, आणि इथे आल्यावर गोंधळ हमखास होतो.

म्हणून इंदोरच्या सराफा बाजारात येण्याआधी होमवर्क करणं गरजेचं आहे. हा लेख वाचून, आपला थोडा का होई ना अभ्यास झालाच असेल. आणि सराफ्यात जाऊन काय खावं पूर्व तयारी कशी असावी याचीही कल्पना आलीच असेल.

 

 

सराफ्याला भेट द्यायचीच अशी तीव्र इच्छा जागवण्यासाठी युट्युब वर, सुप्रसिद्ध शेफ “रणवीर ब्रार” यांचा इंदोर दौऱ्याचा विडिओ नक्की बघा. आणि कोव्हिडचे संकट गेल्यावर आपल्या मनासह जिभेचे आणि पोटाचे चोचले पूर्ण करायला सराफ्याला नक्की भेट द्या.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version