Site icon InMarathi

लाल मुंग्या चावतात; पण काळ्या नाही! का? वाचा यामागचं खरं कारण…

ants featured

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

 

बागेत किंवा अंगणात खेळायला गेलं की कधी कधी चुकून गवतातल्या लाल मुंग्या पायांवर चढतात आणि कचकचुन चावा घेतात. बागेत, हौदाजवळ, फुल झाडांजवळ, ह्या लाल मुंग्या हमखास असतात.

आणि आपल्या सगळ्यांनाच त्या नक्कीच कधी न कधी चावल्या असतील. लाल मुंगी चावल्यावर प्रचंड दाह होतो, चावलेल्या ठिकाणी फोड येतो, ती जागा लाल बुंद होते.

पाणी लावल्याने, क्रीम लावल्याने पटकन ह्या वेदना काही कमी होत नाहीत. याच विरुद्ध काळी मुंगी. ती घरात अन्नाला लागून उच्छाद मांडते, अंगावर चढून गुदगुल्या करते, कानात जाते, पण चावत नाही.

ती चावत जरी असेल तरी आपल्याला तिची वेदना जाणवत नाही. म्हणून “काळी मुंगी देवाची आणि लाल मुंगी राक्षसाची” लहानपणी आपण हि घोषणा करून मोकळे व्हायचो.

 

 

पण फक्त लाल मुंगी का चावते आणि काळी मुंगी का चावत नाही यामागे काही तर कारण असेल? आज आपण तेच कारण जाणून घेणार आहोत.

जगात आत्तापर्यंत मुंग्यांच्या १४०० प्रजाती असल्याची नोंद आहे. पण याहून अधिक असतील हि संशोधकांना खात्री आहे.

लाल मुंगी प्रमाणे, काही मुंग्या चावतात, काहिचे विष इतके जालीम असते की प्राण्याला किंवा माणसाला लकव्याचा त्रास होतो. इतर मुंग्यांप्रमाणे काळ्या आणि लाल दोन्ही मुंग्यांमध्ये “फॉर्मिक ऍसिड” असते.

ती चावते तेव्हा जबडा आपल्या त्वचेत खुपसून, तिच्या उदराच्या खाली असलेल्या नांगीने ती आपले ऍसिड आपल्या त्वचेवर सोडते. आणि काळ्या मुंगीच्या तुलनेत, लाल मुंगीचे हे ऍसिड फार दाहक असते.

म्हणून काळी मुंगी चावली तारी आपल्याला वेदना होत नाहीत, व लाल मुंगी चावल्यावर तीव्र वेदना आणि आगी प्रमाणे दाह होतो. म्हणून लाल मुंग्यांना “फायर अँट्स” सुद्धा म्हटले जाते.

 

 

लाल मुंग्यांप्रमाणे हिरव्या व पांढऱ्या मुंग्या सुद्धा चावतात. आणि मुंगळे तर आपला जीवच काढतात. मुंगळा चावला कि त्याचा जबडा त्वचेत इतका आत गेलेला असतो, कि मुंगळ्याचे धड वेगळे होते पण त्याचे मुंडके आपल्या शरीरापासून विलग होत नाही.

अगदी मुंगळ्याच्या आकारा इतकी नसली तरी नॉर्मल मुंगीहून मोठी लाल मुंग्यांची प्रजाती सुद्धा असते. ह्या मुंग्यांच्या चावल्याच्या वेदना तर अधिक जास्त होतात.

आपल्या घरात लहान कुत्र्याची, मांजराची, कोंबडीची, बदकाची पिल्लं असतील तर ह्या मोठ्या लाल मुंग्यांपासून त्यांची जास्त काळजी आपल्याला घ्यायला लागते.

कारण ह्या मुंग्या सगळ्या मिळून त्या प्राण्यांवर आक्रमण करतात व आपले विष सोडून प्राण्याला मारून टाकतात. अमेरिकेत ह्याच लाल मुंग्यांमुळे बेडकं, पाली, चिमण्या व इतर छोटे पक्षी व प्राणी यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घाट झालेली आहे.

ज्यामुळे उंदरांची व पिकाला नुकसान पोचवणाऱ्या कीटकांची संख्या वाढलेली आहे. चिकन व्यावसायिकांना सुद्धा ह्या मुंग्यांच्या भरपूर त्रास होतो आहे.

एका मोठ्या हत्तीला सुद्धा मारून टाकण्याची ह्या लाल मुंग्यांमध्ये ताकद असते. पण लाल मुंग्यांचं एक वैशिष्ट्य आहे. ज्या ज्या ठिकाणी ह्या वास्तव्यास असतील तिथल्या कोणत्या ना कोणत्या इतर किटकाशी त्यांनी करार केलेला असतो.

काही लाल मुंग्या, फुलपाखराच्या अळीला, मारण्या ऐवजी तिचे रक्षण करतात आणि त्या बदल्यात अळी जे द्रव्य सोडते त्यावर आपले पोट भरतात. फक्त माणसांमध्ये नाही तर निसर्गातही व्यवहारी प्राणी आहेत.

 

 

आणि लाल मुंगी त्याचे उत्तम उदाहरण आहे. एकदा ठरवलेलं असलं की मुंग्यांच्या कॉलोनी पैकी एकही मुंगी त्या प्राण्याला चावत नाही. त्यासाठी आधी मुंग्यांबरोबर म्युच्युअल अंडरस्टँडिंग करून घ्यायला लागतं.

जसं मधमाशांची कार्यप्रणाली असते तशीच लाल मुंग्यांची सुद्धा असते. त्यांच्यात प्रजननासाठी तयार असलेली एक मोठ्या आकाराची मुंगी राणी असते, काही मेल ड्रोन असतात व इतर कामगार असतात.

ह्या मेल ड्रोन्सचे एकदा राणीशी मिलन झाले की त्यांना परत त्या कॉलोनी मध्ये कोणी येऊ देत नाही. तो बाहेर कुठे तरी निघून जातो व मरण पावतो.

हि राणी दिवसाला १६०० अंडी घालू शकते. ह्या राणीचे विष इतके घातक असते, कि कोणी मदतीला नसले तर राणी एकटीच शत्रूला पॅरालाइज्ड करून टाकते.

 

 

ह्या मुंग्यांमध्ये इतका एकोपा असतो की कोणतेहि वादळ आले, पूर आला, त्सुनामी आला तरी ह्या मुंग्या वाहून जात नाहीत.

वजनाने हलक्या असल्याने ह्या सगळ्या मुंग्या एकमेकांना धरून राहतात, व आपोआप पाण्यावर तरंगतात. त्यामुळे यांना राफ्ट अँट सुद्धा म्हटले जाते.

काळ्या मुंग्या ह्या कोणत्याच भानगडीत पडत नाहीत कारण त्या मुळातच लाल मुंग्यांपेक्षा कमी आक्रमक असतात. त्या पटकन चावत नाहीत.

जोपर्यंत त्यांना आपण दचकवत नाही किंवा त्यांना धोका जाणवत नाही तो पर्यंत त्या अजिबात चावा घेत नाहीत. आपल्या मार्गाने निघून जातात.

काही ठिकाणी, पौरुषत्व सिद्ध करण्यासाठी ह्या मुंग्यांनी व मुंगळ्यांनी भरलेले हात मोजे घालण्याची प्रथा आहे. तर काही ठिकाणी जखम शिवण्यास ह्या लाल मुंग्यांच्या आणि काळ्या मुंगळ्यांचा वापर केला जातो.

आपल्या पैकी काही जणांना मुंग्यांची एलर्जी असते. मुंगी चावली कि जीभ सुजणे, जड पडणे, घास बंद होते व सुजणे हे असले प्रकार होत असतील तर समजून जा कि तुम्हाला मुंग्यांची एलर्जी आहे.

 

 

अशा परिस्थितीत त्वरित आपल्या डॉक्टरांना भेट देणे गरजेचे असते.

वेदना कमी करण्याच्या काही टिप्स –

१) मुंगी चावलेल्या ठिकाणी अर्धा चमचा ब्लिच व अर्धा चमचा पाणी हे मिश्रण लावा. याने ते ऍसिड त्वरित शोषले जाईल व दाह थांबेल.

२) ऍलोव्हेरा जेल – चावलेल्या ठिकाणी कोरफडच्या झाडाचा चीक लावा. ते एक नैसर्गिक कुलिंग एजंट आहे. ज्यामुळे लगेचच अराम पडतो.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version