' कर्ज घेताय? थांबा! कर्ज घेतल्यावर मनस्ताप टाळण्यासाठी आधी या गोष्टी तपासा… – InMarathi

कर्ज घेताय? थांबा! कर्ज घेतल्यावर मनस्ताप टाळण्यासाठी आधी या गोष्टी तपासा…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

कर्ज – आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात या शब्दाला फार महत्व आहे. ‘ज्या व्यक्तीवर कोणतेही कर्ज नाहीये’ त्या व्यक्तीकडे आज ‘श्रीमंत’ आणि ‘मनासारखं जगू शकणारा’ व्यक्ती म्हणून बघितलं जातं. बहुतांश नोकरदार वर्ग हा या कर्जाच्या विळख्यात एकदा तरी नक्की सापडतोच.

 

indian guy fed up inmarathi

 

कर्ज म्हणजे ‘कोणतीही वस्तू तिच्या नियोजित वेळेच्या आधी मिळवण्यासाठी केलेली तरतूद’ असं म्हणता येईल. भारतातील व्याज दर हा कोणत्याही कर्जाच्या मूळ किमतीमध्ये फारच मोठी भर घालत असतो असंही म्हणता येईल.

साधारणपणे ‘गृह कर्ज’ हे या प्रकारचं कर्ज आहे, जे की जवळपास प्रत्येकाला घर घेतांना घ्यावं लागतं. एकदा हे कर्ज सुरू झालं की, दर महिन्यात तयार होणारी ‘वित्तीय तूट’ भरून काढण्यासाठी दुसरे पर्याय उभे करावे लागतात. कारण, आपण एका दिवसात काही जगण्याचा खर्च कमी करू शकत नसतो.

 

home-loan-inmarathi

 

उपलब्ध पर्यायांपैकी ‘क्रेडिट कार्ड’ची एन्ट्री आपल्या आयुष्यात होते. काही दिवस खूप छान जातात. काही दिवसात किंवा वर्षात आपण क्रेडिट कार्डने दिलेल्या खर्चाच्या लिमिट पर्यंत पोहोचतो. मग सुरू होते ती ‘आर्थिक स्थिती’ नियंत्रणात आणण्यासाठी करावी लागणारी कसरत.

या ठिकाणी ‘पर्सनल लोन’ किंवा ‘वैयक्तिक कर्ज’ हे एक अतिथी म्हणून आपल्या वॉलेटमध्ये येऊन बसतं.

बहुतांश नोकरदार व्यक्तीचं अर्ध आयुष्य हे या फेऱ्यातून सुटण्यातच निघून जातं. तुमच्यावर असलेलं कर्ज हेच तुम्हाला दुसऱ्या दिवशी उठून काम करण्याची प्रेरणा देत असतं असं सुद्धा बोललं जातं.

कर्जाच्या प्रकारांपैकी ‘वैयक्तिक कर्ज’ हे सर्वात जास्त व्याज दर असलेलं कर्ज आहे. आजकाल ते फार सहज उपलब्ध सुद्धा होतं. पण, ते घेतांना प्रत्येक व्यक्तीने काही गोष्टींची विशेष काळजी घेणं आवश्यक असतं. या गोष्टी कोणत्या ते जाणून घेऊयात.

१. कर्जाची रक्कम:

आपल्या समोर असलेल्या आर्थिक गरजांची यादी करून त्यातील अत्यावश्यक खर्च कोणते? हे लक्षात घ्यायला हवे. हा अंदाज अगदी अचूक असणं अपेक्षित आहे.

कारण, एकदा का तुम्ही वैयक्तिक कर्ज जास्त किमतीचं घेतलं की मग तुम्हाला एक तर मोठा काळ त्या कर्जासोबत जगावं लागतं किंवा दर महिन्यात एक मोठी रक्कम बँकेला द्यावी लागते. त्यामुळे जितकी कमी ही रक्कम तितकी तुमची या कर्जातून लवकर सुटका हे लक्षात घ्यावं.

bank-inmarathi

 

प्रत्येक गरज ही बँकेच्या रकमेतूनच भागवण्याची इच्छा न करता काही गरजा या मित्र, नातेवाईकांकडून मदत घेऊन भागवल्यास आपण बँकेच्या कायदेशीर बंधनातून लवकर मुक्त होऊ शकतो.

२. व्याज दर:

प्रथमच कर्ज घेतांना काही लोकांना व्याज दर किती कमी असू शकतो याचा अंदाज नसतो. अशावेळी केवळ पहिल्या कर्ज देणाऱ्या बँकेकडून कर्ज न घेता उपलब्ध सर्व बँकेचे व्याजदरांची तुलना करूनच आपला निर्णय घ्यावा. कारण, व्याजदर हाच तुमच्या कर्जाची लांबी आणि दर महिन्याच्या हप्त्याचा तुमच्यावर येणारा ताण ठरवत असतो.

 

interest-rate-inmarathi

 

३. परतफेड:

कर्जाची परतफेड करतांना तुम्ही मूळ रक्कम आणि व्याजाची रक्कम यामधून नेमके कधी बाहेर पडणार आहात, हे बघणं अत्यंत आवश्यक आहे. हा कार्यकाळ जितका कमी तितकं तुमच्यासाठी चांगलं…

 

tension inmarathi

 

कितीही नाही म्हटलं तरी या सर्वाचा एक मानसिक ताण सुद्धा घेऊन आपण या काळात जगत असतो. जितका जास्त हप्ता किंवा परतफेड करायची पद्धत सोपी, तितकं आपण त्या कर्जातून बाहेर पडू शकत असतो. या दोन्ही गोष्टी आधीच तपासून घेणं प्रत्येक कर्जदार व्यक्तीकडून अपेक्षित आहे.

४. महिन्याचा हप्ता किंवा EMI:

पहिल्या तीन मुद्द्यांचं सार हे EMI मध्ये येतं. ही रक्कम जितकी नियंत्रणात असेल तितकं आपल्याला आर्थिक घडी बसवतांना ताण येत नाही.

आजकाल कित्येक प्रकारचे EMI कॅल्क्युलेटर हे मोबाईलमध्ये उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे तुम्हाला दर महिन्यात मिळणारी रक्कम आणि कर्जाच्याद्वारे निघून जाणारी रक्कम यांचा योग्य मेळ साधणं शिकायला पाहिजे.

 

loan-emi-inmarathi

 

ऑनलाईन पद्धतीने सुद्धा दिल्या जाणाऱ्या सध्याच्या कर्जाच्या जाहिरातीतच एक मीटर दिलेलं असतं. जे दाखवतं की, किती रक्कम, किती वर्षांसाठी घेतल्यास किती EMI भरावा लागेल हे व्यवस्थित तपासून विचार करायला थोडा वेळ घेऊनच आपला निर्णय घ्यावा.

५. मुदतपूर्व परतफेड:

पर्सनल लोन घेतल्यावर ते बँकेच्या पद्धतीनेच पूर्ण करावं अशी काही बँकांची इच्छा असते. आपल्याकडे पैसे आले आणि आपण कर्जातील उरलेली रक्कम परत केली इतकी ही पद्धत सोपी नाहीये.

होम लोनची राहिलेली रक्कम परत करतांना तुम्हाला कोणतंही अतिरिक्त व्याज द्यावं लागत नाही, पण पर्सनल लोनची मुदतपूर्व परतफेड करतांना प्रत्येक बँकेच्या धोरणानुसार काही रक्कम अतिरुक्त भरावी लागते.

 

personal-loan-repayment-inmarathi

 

ही सर्व माहिती आधीच काढून घेणं हे प्रत्येक कर्ज घेणाऱ्या व्यक्तीकडून अपेक्षित आहे.

६. कर्ज देणाऱ्या बँकेची परिस्थिती:

एक काळ होता जेव्हा खूप शाखा असणारी बँक म्हणजे यशस्वी किंवा मोठी बँक समजली जायची. पण, मध्यंतरी झालेल्या रुपी बँक, येस बँक, पीएनबी यांच्या उदाहरणातून शिकून आपण सुद्धा ही अर्ध्या रात्रीतून बंद पडणारी बँक किंवा कर्ज पुरवणारी संस्था तर नाहीये, हे आपण तपासून घ्यायला पाहिजे.

 

rupee-bank-inmarathi

हल्ली प्रत्येक बँकेबद्दल, लोनबद्दल रिव्यूहज सहज उपलब्ध होतात. ते वाचूनच आपल्याला कर्ज देऊ शकणाऱ्या बँकेची निवड करावी.

७. कर्जाची रक्कम बँक खात्यात जमा होण्याचा कालावधी:

कित्येक वेळेस आपल्याला कर्जाची गरज ही शेवटच्या क्षणी लक्षात येत असते. घराचा ताबा मिळणार आणि त्याआधी फर्निचर करणे ही एक अशीच गरज असते.

 

furniture-inmarathi

 

अशावेळेस आपले कागदपत्र घेऊन निवांत वेळ घेणारी संस्था अजिबात कामाची नसते. जितक्या कमी वेळेत कर्जाची रक्कम आपल्या बँक खात्यात जमा करेल अशी बँक बघावी आणि त्या बँकेकडेच कर्जासाठी आपला अर्ज द्यावा.

८. कर्ज देण्याची पद्धत:

कित्येक बँक या तुमची कर्जाची पात्रता बघण्यासाठी जरा जास्तच कागदपत्रांची मागणी करत असतात. एकीकडे आपण म्हणतो की सगळ्या गोष्टी पॅन कार्ड आणि आधार कार्ड सोबत जोडल्या आहेत, आणि दुसरीकडे काही बँक आपल्याला रोज नवीन कागद आणण्यास सांगत असतात.

 

documents-for-loan-inmarathi

 

जसं की, ओळखपत्र, सॅलरी स्लिप, इन्कम टॅक्स रिटर्न अशी बरीच मोठी यादी काही बँकांनी तयार केलेली असते. उपलब्ध पर्यायांपैकी ज्या बँकेची कर्ज देण्याची आणि मुदतपूर्व परतफेड करण्याची पद्धत सोपी अश्या बँकेतूनच कर्ज घ्यावे.

आपला सीबील (CIBIL) स्कोर जर चांगला असेल तर कोणतीही बँक ही आपल्याला कर्ज द्यायला तयार असते. कोणताही हफ्ता न चुकवल्याने हा स्कोर हा ठरत असतो.

हा स्कोर नेहमी ७५० पेक्षा जास्त असावा हे प्रत्येक व्यक्तीने तपासत रहावे. याव्यतिरिक्त, कर्ज देणारी बँक ही कर्ज देणारा खूप जास्त तर अतिरिक्त रक्कम घेत नाहीये हे प्रत्येकाने तपासून घेऊनच त्या बँकेकडून कर्ज घ्यावं.

कर्ज घेताना जितकी ती आपली गरज आपली असते तितकीच बँकेला सुद्धा कर्ज घेणाऱ्यांची गरज असते. आपण ‘ग्राहक’ असल्याची भावना आपल्याला मिळत आहे की नाही हे सुद्धा अधूनमधून तपासत रहावे आणि त्याप्रमाणे आपला हा अनुभव इतरांना सुद्धा सांगितला पाहिजे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?