' मोदींचा आवडता “मित्रो” – हळूहळू काळाच्या पडद्या आड जातोय – InMarathi

मोदींचा आवडता “मित्रो” – हळूहळू काळाच्या पडद्या आड जातोय

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

आपले पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी हे त्यांच्या भाषणांसाठी प्रसिद्ध आहेत. पण त्याही पेक्षा त्यांचे विशिष्ट शब्द चांगलेच फेमस झाले आहेत. जेव्हा नोटाबंदीच्या भाषणाच्या वेळेला ‘मित्रो’ म्हणून त्यांनी भाषण सुरु केले त्यानंतर भल्या भल्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. तेव्हापासून पंतप्रधान जेव्हा जेव्हा ‘मित्रो’ म्हणून बोलण्यास सुरुवात करतात तेव्हा सगळे लोक कानात प्राण आणून बसतात! नोट बंदी नंतर ह्या “मित्रो” वरून सोशल मीडियावर अनेक विनोद देखील केले गेलेत.

mitron joke 01 marathipizza
मोदींचं “न्यूक्लिअस मॉडेल”

 

mitron joke 02 marathipizza
मोदी आणि मार्क ची मित्रो-पूर्ण चर्चा!

थोडक्यात, “मित्रो” हा शब्द विनोदाचा विषय होत होता.

ह्या पार्श्वभूमीवर – मुद्दा असा आहे की, आपल्या पंतप्रधानांचा आवडता शब्द ‘मित्रो’, ते आपल्या एका भाषणात किती वेळा वापरतात?

गेल्या ३१ डिसेंबरला नवी दिल्ली, मुंबई आणि बेंगलोर इथल्या एका ‘सोशल’ नावाच्या बार मध्ये त्यांनी एक ऑफर ठेवली होती. नोटाबंदी नंतरच्या ५० दिवसानंतर च्या भाषणात त्या दिवशी पंतप्रधान ज्या ज्या वेळी ‘मित्रो’ हा शब्द वापरतील त्या त्या वेळी बिअर चा एक pint ते फक्त ३१ रुपयांना देणार…!

 

mitron social offer marathipizza

 

ही ऑफर ऐकून लोकांनी त्या बार मध्ये भरपूर गर्दी केली होती पण हा हन्त हन्त! त्या सगळ्यांची घोर निराशा झाली…

कारण त्या भाषणात पंतप्रधानांनी एकदाही ‘मित्रो’ हा शब्द वापरला नाही…!

गंमत ही – ह्या “मित्रो” न वापरण्याबद्दल सुद्धा विनोद झाले…!

mitron joke 04 marathipizza

 

खरं तर ‘मित्रो’ हा शब्द वापरण हि पंतप्रधानांची स्टाईल आहे, पण विरोधक त्या शब्दाचा पंतप्रधानांचा उपरोधिक उल्लेख करताना वापरतात तर टीकाकार उपहास करतात. पण – खरंतर मोदींच्या भाषणातील इतर संबोधनं बघितली तर “मित्रो” वापरण्याचं प्रमाण खूप कमी आहे हे लक्षात येतं. एवढंच नाही, ह्या विनोदांमुळे की काय, आतातर त्यांनी हा शब्द वापरण्याचं प्रमाण अधिकच कमी केलंय!

हिंदुस्तान टाईम्स ने एक सर्व्हे केला ज्यात त्यांना आढळले कि पंतप्रधान ‘मित्रो’ ह्या शब्दाचा जास्त उपयोग करतात हा लोकांचा गैरसमज आहे. त्यांनी मोदींच्या प्रत्येक भाषणाचा अभ्यास केला. पीएमओ च्या वेबसाईट वर पंतप्रधानांच्या प्रत्येक भाषणाची लिखित स्वरुपात प्रत असते. त्यात त्यांनी कुठल्या शब्दांचा नेहेमी वापर केला आहे ह्यावरून लक्षात येते कि ते त्यांच्या भाषणात कुठला शब्द किती वेळा वापरतात.

त्यांच्या पंतप्रधान असण्याच्या कार्यकाळात आजवर मोदींनी एकूण ४४० भाषणे दिली आहेत. ह्यात त्यांची निवडणुकांमधील भाषणे किंवा इतर वेळी केलेली छोटी मोठी भाषणे येत नाहीत. तर ह्या ४४० पैकी बरीचशी भाषणे त्यांनी हिंदीतूनच केली. ‘मित्रो’ ह्या शब्दाशी लोक मोदींना जोडतात पण गम्मत म्हणजे ह्या ४४० भाषणांमध्ये पंतप्रधानांनी फक्त ४० भाषणांमध्ये ६१ वेळा ‘मित्रो’ हा शब्द वापरला आहे. तर ‘भाईयो और बेहेनो’ हा शब्द त्यांनी सगळ्यात जास्त वेळा म्हणजेच ७५० वेळा वापरला आहे. तर ‘देशवासियो’ हा शब्द त्यांनी २७१ वेळा वापरला आहे. ह्याशिवाय ‘महानुभाव’ १२१ वेळा, ‘साथियो’ ८१ वेळा तर ‘दोस्तो’ ४९ वेळा वापरला आहे. म्हणजेच त्यांनी ‘मित्रो’ हा शब्द फार कमी वेळा वापरला आहे.

mitron and other words used by pm modi 01 marathipizza
मोदींचे परवलीचे शब्द आणि त्यांच्या वापराचं प्रमाण. स्रोत – hindustantimes.com

‘मित्रो’ ह्या शब्दाचे चाहते असलेल्यांची निराशा होणार आहे कारण हल्ली पंतप्रधानांनी त्यांच्या भाषणात ‘मित्रो’ हा शब्द वापरणे कमी केले आहे. २०१५ ला त्यांनी हा शब्द २६ भाषणांत वापरला तर २०१६ ला फक्त ७ भाषणांमध्ये ते ‘मित्रो’ असं म्हणाले आहेत.

आता ‘मित्रो’ सोडून बहुदा ‘दोस्तो’ शब्द फेमस होईल असं वाटतंय – कारण पंतप्रधानांनी ‘दोस्तो’ त्यांच्या २१ भाषणांत वापरलाय. २०१६ मध्ये ८ भाषणांत ते ‘दोस्तो’ असं म्हणाले. कदाचित आता ‘मित्रो’ चा ट्रेंड संपून ‘दोस्तों’ चा ट्रेंड सुरु होईल अशी चिन्ह आहेत.

 

mitro featured marathipizza

 

पंतप्रधानांच्या भाषणावर सट्टा लावणाऱ्या किंवा ऑफर वर लक्ष ठेवून असणाऱ्या लोकांनी हा सर्व्हे आधीच केला असता तर कदाचित त्यांचं नुकसान झालं नसतं. असो – आता त्यांना आकडेवारी कळाली आहे –

आता कदाचित ट्रेंड बदलेल! 😉

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?