लडाखच्या टेकडीवर बंद गाड्या उताराकडे नव्हे, चढाच्या दिशेने जातात, वाचा हे रहस्य!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
लडाख मधून नेहमीच काही न काही तरी वेगळं ऐकायला मिळत असतं. भारत आणि चीन मधील वातावरण हे काही काळासाठी शांत असतं आणि पुन्हा खोडकर चीन मुळे परिस्थिती ‘जैसे थे’ अशीच होते.
बाराही महिने वातावरणाशी झगडत असणाऱ्या आपल्या सैनिकांचं लडाख मध्ये सतत तैनात असणं हे हा एक चमत्कारच म्हणावं लागेल. सतत बदलत्या वातावरणाचा आपल्याला होणारा त्रास हा सैनिकांना होत नाही हेच त्यांच्यातील सामर्थ्य दाखवतं.
आजच्या एका बातमीनुसार चीनने पुन्हा एकदा त्यांच्या सैन्यात वाढ केल्याची बातमी ऐकण्यात आली. पुढे काय होणार? हे माहीत नसतांना इतक्या धैर्याने लडाख मध्ये तंबू ठोकून राहू शकणे हा सुद्धा एक चमत्कार म्हणावं लागेल.
धन्य ती भूमी आणि धन्य आपले सैनिक. लडाख मध्ये घडणाऱ्या अजून एका भौगोलिक चमत्काराबद्दल आम्ही या लेखात सांगणार आहोत.
कोणत्याही डोंगराळ रस्त्यावर गाडी पार्क करताना आपण एक लक्षात ठेवतो की, आपली गाडी ही गिअर मध्ये असावी जेणेकरून गाडी मागे जाऊन दरीत पडणार नाही.
गाडीला हॅन्डब्रेक असतो हे मान्य. पण, तरीही काही डोंगराळ रस्ते असे असतात जिथे तीव्र उतारामुळे गाडी एका ठिकाणी थांबेल अशी शाश्वती देता येत नाही.
पण, लडाख मध्ये एक अशी पर्वतरांग आहे जिथे गाडी थांबवल्यावर तिला जरी आपण ‘न्यूट्रल’ गियर मध्ये ठेवल्यावर आपली गाडी ही उताराच्या दिशेने न जाता समोरच्या चढ असलेल्या दिशेने जाते ते ही चक्क २० किलोमीटर प्रति तासाच्या गतीने.
होय, हे खरं आहे. हे कसं शक्य आहे? जाणून घेऊयात.
‘मॅग्नेटिक हिल’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या पर्वतामध्ये एक कमालीची गुरुत्वाकर्षण शक्ती आहे असं तज्ञ सांगतात. काही लोकांना हा भ्रम सुद्धा वाटतो. पण, तो भ्रम नाहीये.
वैज्ञानिकांनी केलेल्या अभ्यासानुसार गुरुद्वार पठार साहिबच्या जवळ असलेल्या या पर्वत रांगावर असलेल्या चुंबकीय शक्तीमुळे आसपासचा बराच मोठा परिसर हा गुरुत्वाकर्षणाच्या क्षेत्रात ओढला जातो.
हा अनुभव काही विमानांनी सुद्धा घेतला आहे. बंद करून ठेवलेली गाडी ही डोंगराच्या टोकाकडे खेचली जाते हा चमत्कार कित्येक लोकांनी अनुभवला आहे आणि कॅमेरात कैद सुद्धा केला आहे.
मॅग्नेटिक हिलच्या वरून जातांना विमानाला सौम्य झटके बसतात असं काही वैमानिकांनी सांगितलं आहे.
अनुभवी वैमानिक हे मॅग्नेटिक हिल दृष्टिपथात आल्यावर विमानाची गती वाढवतात आणि त्या पर्वताच्या टोकावर असलेल्या गुरुत्वाकर्षण शक्तीपासून विमानाला वाचवतात आणि कोणतीही दुर्घटना होणं टाळतात.
लेह शहरापासून ३० किलोमीटर अंतरावर असलेली ही जागा गुरुत्वाकर्षण शक्तीचा एक नमुना आहे. लेह – कारगिल हायवे च्या जवळ असलेली मॅग्नेटिक हिल ही कोणत्याही स्थिर गोष्टीला वरच्या दिशेला ओढताना दिसण्याची ही पहिलीच जागा आहे.
याच कारणामुळे या जागेला ‘मिस्ट्री हिल’ किंवा ‘ग्रॅव्हीटी हिल’ या नावाने सुद्धा ओळखलं जातं. समुद्र सपाटीपासून १४,००० फुट उंचीवर असलेल्या या डोंगराच्या पूर्वेकडील भागातून सिंधु नदी वाहते.
लडाख मधील काही स्थानिक लोकांचं असं मानणं आहे की, “या डोंगराचं टोक हे स्वर्गाकडे आहे. म्हणून ज्या लोकांनी पुण्य केलं आहे ते त्या टोकाकडे आकर्षित होतात. “
काही वर्षांपूर्वी या घटनेला नजरेचा दोष असं जाहीर करण्यात आलं होतं. म्हणजे असं की, गाडी बंद केल्यावर ती उताराच्या दिशेनेच जातात. पण, आपल्या नजरेच्या भ्रमामुळे उलट दिसतं.
पण, तसं नाहीये हे वारंवार सिद्ध झालं आहे. निसर्गाच्या नियमाच्या विरुद्ध असलेल्या या घटनेचं नेमकं कारण गुरुत्वाकर्षण शक्ती आहे हेच योग्य कारण आहे.
‘मॅग्नेटिक हिल’ च्या या पॉईंट वर एक पिवळ्या रंगाचा बोर्ड लावण्यात आला आहे. ज्यामध्ये “इथे गाडी न्यूट्रल मध्ये पार्क करा आणि गंमत बघा” हे सांगण्यात आलं आहे. ‘कार डोंगर चढते’ ही गोष्ट लोकांना विचार करायला लावणारी आहे.
मॅग्नेटिक हिलला भेट देण्याचा सर्वोत्तम कालावधी हा जुलै ते ऑक्टोबर हा आहे. या दरम्यान रोड वर वाळू वगैरे सुद्धा आलेली नसेल. रोड स्वच्छ असतात आणि त्यामुळे रोड ने प्रवास करणं इतकं अवघड नसेल.
शहरापासून ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या या जागेत काही तुरळक पर्यटक सोडले तर फारसं कोणी नसतं. काही सैनिक इथे नेहमी तैनात असतात.
तुम्ही जर इथे पहिल्यांदा जाणार असाल तर आधी लेह मधील तुमच्या हॉटेल मध्ये जाणे आणि तिथून खाण्यासाठी भरपूर सोबत घेऊनच मॅग्नेटिक हिलला जावं असं सगळे पर्यटक सांगतात. कारण, या भागाच्या जवळपास कोणतंही हॉटेल नाहीये.
मॅग्नेटिक हिल ही जगातील अशी एकमेव जागा आहे का? तर नाही.
अमेरिकेतील आर्मेनिया हा पर्वत ज्याला की माउंट अरगत या नावाने ओळखलं जातं. या डोंगरावर सुद्धा पार्क केलेली गाडी ही खालच्या दिशेने न जाता वरच्या दिशेने जाताना आढळते.
मॅग्नेटिक हिल ही अद्भुत जागा एकदा तरी प्रत्यक्ष बघण्याची इच्छा व्यक्त करूयात. वर्ल्ड टुर वगैरेचा विचार करण्यापेक्षा भारतातील या सुंदर जागांना भेट देण्याचा या वर्षी संकल्प करूयात.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.