Site icon InMarathi

‘बाहुबली’ ची जीवापाड मेहनत – तुम्हाला नक्कीच विचारात पाडेल!

prabhas-training-marathipizza00

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

आपल्यापैकी बऱ्याच जणांना व्यायाम म्हटला कि अंगात कुंभकर्ण संचारतो. कोण इतक्या सकाळी उठून जिमला जाऊन ट्रेडमिल वर घाम गाळेल किंवा वजन उचलण्याचे कष्ट करेल! पण कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही आणि व्यायाम केल्याशिवाय प्रभास सारखी बॉडी बनत नाही.

सद्यस्थितीमध्ये प्रभास हा मुलींचा हार्ट थ्रोब आहे कारण त्याचे कुल लुक्स आणि त्याची बॉडी ! पण हे सगळं त्याला सहजासहजी मिळालेलं नाही. त्या साठी प्रभास ने जीव तोडून मेहनत केली आहे. सगळं विसरून फक्त आहार, व्यायाम आणि ठरवलेलं टार्गेट मिळवणे ह्याकडे त्याने लक्ष केंद्रित केले होते. त्याच्या बाहुबली ह्या सिनेमाने कलेक्शन चे अनेक नवीन रेकॉर्ड बनवले. ह्याला कारण बाहुबली चे स्पेशल इफेक्ट्स आणि प्रभास!

http://www.mensxp.com

बाहुबली ने तब्बल ६५० कोटींचा गल्ला जमवला आणि तो ‘पिके’ आणि ‘दंगल’ नंतर इतके कलेक्शन करणारा तिसरा सिनेमा ठरला. बाहुबलीचा दुसरा भाग ‘बाहुबली द कन्क्ल्युजन’ ह्या सिनेमाची सगळेच लोक आतुरतेने वाट बघत आहेत. कटप्पा ने बाहुबलीला का मारले ह्या प्रश्नाचे उत्तर आता लवकरच म्हणजे २८ एप्रिल २०१७ ला मिळेल.  ह्या सिनेमाचे दुसरे आकर्षण म्हणजे प्रभासने केलेल्या दोन भूमीका –‘शिवा’ आणि ‘बाहुबली’. सध्या इंटरनेट वर प्रभासच्या ह्या दोन लुक्सचीच चर्चा आहे. त्याने किती मेहनत घेऊन दोन्ही भूमिकांसाठी वेगवेगळी बॉडी बनवली? त्या साठी कसा व्यायाम केला? काय डाएट घेतले? याचीच सर्वत्र चर्चा आहे.

‘शिवा’ च्या भूमिकेसाठी त्याने वजन घटवले तर बाहुबलीच्या भूमिकेसाठी त्याला २० किलोंपेक्षा जास्त वजन वाढवावे लागले. तेही आपण जिम च्या भाषेत म्हणतो ते फॅट्स नव्हे तर लीन मसल्स त्याने वाढवले. हे त्याने कसे केले? त्याने औषधे , इंजक्शने घेतली कि फक्त डाएट आणि व्यायामाच्या जोरावर त्याने हे साध्य करून दाखवले? याबद्दल बऱ्याच लोकांना ह्याची उत्सुकता आहे. आज आम्ही तुमच्यासाठी प्रभासचे हे सिक्रेट उघड करणार आहोत.

www.youtube.com

प्रभासला ह्या सिनेमासाठी लक्ष्मण रेड्डी जे हैद्राबादचे प्रसिद्ध बॉडीबिल्डर आहेत त्यांनी ट्रेन केले. रेड्डी हे लास वेगास येथे २०१० साली झालेल्या मिस्टर वर्ल्ड स्पर्धेतले विजेते होते.

twitter.com

प्रभासच्या मेहनतीबद्दल सांगताना ते म्हणतात कि

शूटिंगमुळे प्रभासचा दिनक्रम अतिशय व्यस्त होता. पण तरीही प्रभासने कधीही कुठलीही सबब देऊन व्यायाम टाळला नाही. त्याच्या व्यस्ततेमुळे त्यांना कधी कधी मध्यरात्री सुद्धा व्यायाम करावा लागायचा. पण त्याने कधीही कंटाळा केला नाही. शिवाच्या रोल साठी त्याला बारीक दिसणे आवश्यक होते. त्यासाठी त्याला ८५ किलो वजन हवे होते. तर बाहुबली च्या भूमिकेसाठी त्याला वजन १०० किलो पेक्षा जास्त हवे होते कारण त्या भूमिकेसाठी त्याला थोडे बल्की दिसणे आवश्यक होते.

www.bollywoodhungama.com

शिवाच्या भूमिकेसाठी त्याला त्याच्या आहारातून कार्बोहायड्रेटस पूर्णपणे कमी करावे लागले. त्याने त्याच्या आहारात एग व्हाईट, मासे, चिकन आणि बदाम सारखे पूर्ण लीन प्रोटीन घेतले. पण त्याला कंटाळा येऊ नये म्हणून २० दिवसातून फक्त एकदा त्याच्या आवडती चिकन बिर्याणी खाण्याची त्याला परवानगी होती.

www.pinterest.com

बाहुबलीच्या भूमिकेसाठी त्याने आहारात परत कार्बोहायड्रेटस घेणे सुरु केले. कार्ब्स साठी त्याने आहारात ओट्स, ब्राऊन राईस, फळे आणि पास्ता घेणे सुरु केले. ह्याशिवाय ४० ते ४५ एग व्हाईटस , ५०० ग्राम चिकन किंवा मासे आणि प्रोटीन शेक्स घेतले.

www.youtube.com

बाहुबलीच्या भुमिके साठी त्याने अमेरिकेमध्ये जाऊन WWE च्या रेसलर्सची भेट घेतली आणि त्यांच्या जबरदस्त मस्क्युलर बॉडीचे सिक्रेट्स जाणून घेतले. त्यांच्या व्यायामाची उपकरणे त्यांना इतकी आवडली कि त्याने ती व्यायामासाठी स्वतःच्या घरी मागवून घेतली. ह्या साठी त्याला जवळपास एक कोटीचा खर्च आला. त्याने त्या उपकरणांवर मन लावून व्यायाम केला . शिवाय deadlifts, squats आणि bench press सारखे व्यायाम सुद्धा केले. ज्याचा त्याला भरपूर उपयोग झाला.

ह्यावरून आपण हे शिकू शकतो कि तुम्हाला जर परफेक्ट बॉडी हवी असेल तर आहार आणि व्यायामाशिवाय पर्याय नाही. जरी आपल्याकडे प्रभास सारखे उत्तम ट्रेनर नसले, त्याच्या सारखी इम्पोर्टेड उपकरणे नसली तरीही लोकल जिम मध्ये जाऊन भारतीय उपकरणांवर व्यायाम केला तरीही तुम्ही उत्तम बॉडी बनवू शकता. उत्तम बॉडी साठी फॉरेन मधलाच ट्रेनर हवा असे काही आवश्यक नाही. प्रभासला ज्यांनी उत्तम ट्रेनिंग दिले ते रेड्डी भारतीयच आहेत. भारतीय ट्रेनर फॉरेनच्या ट्रेनर पेक्षा कुठेही कमी नाहीत.

http://businessofcinema.com

फक्त व्यायामच नव्हे तर बॉडी बनवण्यासाठी योग्य आहार, कम्पाउंड मुव्हमेंटस सुद्धा आवश्यक आहेत. प्रत्येकाचे शरीर वेगळे असते त्यामुळे प्रत्येकासाठी वेगळा आहार आणि वेगवेगळ्या व्यायामाचे कॉम्बिनेशन करावे लागते तेव्हाच तुम्हाला हवे असलेले रिझल्ट्स मिळतात. ह्याशिवाय योग्य प्रमाणात झोप घेणे सुद्धा आवश्यक आहे. तुम्ही हे फॉलो केले तर प्रभास सारखी बॉडी बनवणे अशक्य नाही.

(हे देखील वाचा: Gym ला जात असाल तर या गोष्टी बिलकुल करू नका!)

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version