आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
सौंदर्यांची उपासना…कसा वाटतोय हा शब्द? भारदस्त..अलंकारिक..कुणाला नको वाटतं सुंदर दिसणं? कुणाला वाटतं गबाळं रहावं. आजकाल एकंदरीत सगळेचजण प्रेझेंटेबल रहावं यासाठी प्रयत्न करताना दिसतात.
विविध ट्रिटमेंट घेऊन वेगवेगळ्या प्रकारचे फेशिअल, फेस क्लीन किती काय काय करतात. प्रत्येकालाच आपण गोरं असावं. आपले ओठ गुलाबी असावेत असं वाटतं.
इतिहासात क्लिओपात्रा गुलाबाच्या पाकळ्यांचा रस काढून त्यानं अंघोळ करायची अशी दंतकथा आहे. गुलाबी गाल, लालचुटुक ओठ हे जन्मजात असावं लागतं.
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
ते सगळ्यांनाच मिळतं असं नाही. मग त्यासाठी गुलाबाच्या पाकळ्या चुरडून लावा. पान खाऊन ओठ रंगवा असे नैसर्गिक उपाय केले जातात. आजकाल सर्रासपणे वापरला जाणारा प्रसाधन प्रकार म्हणजे लिपस्टिक लावणे. त्यामध्ये पूर्वी लाल आणि गुलाबी रंगच जास्तकरून असत.
पण आता इतक्या विविध रंगांच्या शेडस् उपलब्ध आहेत की मॅट फिनीश, लिक्विड लिपस्टिक, लिप बामच्या स्वरुपात असणारी लिपस्टिक अशा कितीतरी तऱ्हा आहेत.
ड्रेसिंग टेबल वर पाहीलं तर अशा विविध शेड्सची रांग दिसेल. जवळच्या जवळ जायचं म्हटलं तरी आजकाल मुली स्त्रिया किमान हलकीशी लिपस्टिक लावून बाहेर पडतात.
रेवलाॅन, नायका, लॅक्मे, आणि इतरही आंतरराष्ट्रीय ब्रँडच्या लिपस्टिक आजकाल सहज उपलब्ध होतात. बहुतेक वेळा मोठे कार्यक्रम लग्न, मुंज, डोहाळे जेवण, बारसं, रिसेप्शन अशा कार्यक्रमांना जाताना महिला वर्गाचा उत्साह आणि मेक अप करायची हौस यांना नुसता बहर येतो.
लिपस्टिक, आय लायनर, यांनी तर फार ठळक जागा व्यापलेली असते. खूपजणी तर आॅफीसला जाताना, काॅलेजला जाताना लिपस्टिक लावल्याशिवाय बाहेर पडत नाहीत.
पण ही लिपस्टिक लावण्यापूर्वी कधी विचार केला आहे का.. सततचं लिपस्टिक लावणं कसं नुकसान करु शकतं? नाही माहीत? मग तर नक्की वाचा..
लिपस्टिक तयार कशी करतात?
लिपस्टिक तयार करताना मेण, पॅराफिन, वसा, तेल, एमोलियंटस यांच्या मिश्रणाने बनवली जाते. मधमाशीच्या पोळ्यातील मेण हे अत्यंत उत्तम मेण मानलं जातं. पण सगळ्याच कंपन्या ते वापरतात असं नाही.
काही लोकल ब्रँड असलेल्या कंपन्या माती, लेड आॅक्साईड यांचाही वापर करतात. मेणामुळे जी स्टिक असते ती व्यवस्थित बांधली जाते आणि लिपस्टिकच्या रोलमध्ये घट्ट उभी करता येते.
–
- मुलींनो, “मेकअप” करा, पण प्रमाणात नाही तर होईल सत्यानाश!
- सुंदर दिसण्यासाठी १२ अभिनेत्रींनी केलेला ‘उपाय’; कधी जमला तर कधी फसला!
–
त्याशिवाय त्यात रंगही वापरले जातात. हे रंग बनवताना खूप ठिकाणी मँगेनिज, लेड म्हणजे शिसं आणि कॅडमियम यांचा वापर केला जातो.
रोजच्या वापरामुळे काय होतात दुष्परिणाम?
बघा.. छान दिसावं म्हणून लोक काय काय करतात? चांगले कपडे.. त्यावर मॅच होतील अशा अॅक्सेसरीज, नेलपेंट, लिपस्टिक यांचा रोज रतीब घातला तर काय होतं?
तुम्ही कदाचित प्रेझेंटेबल म्हणून नक्की ओळखले जाल. पण तुमच्या शरीरावर याचे काय वाईट परिणाम होतात हे आज लगेच नाही पण काही दिवसांनी समजेल.
१. शुष्कपणा –
लिपस्टिक तयार करताना जे धातू लेड म्हणजे शिसं, कॅडमियम यांचा त्वचेशी खूप जवळचा संपर्क येतो. ओठ, डोळे त्वचा हे नाजूक अवयव आहेत. रोज लिपस्टिक लावल्यामुळे शिसं सातत्यानं आपल्या पोटात जातं.
ओठांना या धातूंमुळे काळपटपणा येतो. त्यामध्ये असलेली आर्द्रता कमी होते व ओठ कोरडे पडतात.
त्यांना आलेली शुष्कता ओठांना चिरा पडणं, त्वचा उकलायला लागणं आणि हा कोरडेपणा वाढला तर ओठ फुटणं, रक्त येणं इथवर परिणाम करते.
२. अॅलर्जी –
अॅलर्जी होणं म्हणजे शरिरात अपायकारक पदार्थ गेले की वेगवेगळ्या प्रकारचे त्रास होणं. शिसं कॅडमियम हे जर रोज पोटात गेलं तर अॅलर्जी उद्भवते.
जसं शरिरावर रॅशेस म्हणजे पुरळ उठणं, त्वचेवर सूज येणं, चट्टे पडणं वगैरे.
३. डोळ्यांची जळजळ –
खूपदा असं बघण्यात आलं आहे की बऱ्याच स्त्रिया लिपस्टिक आय शॅडो म्हणून पण वापरतात. वास्तविक आय शॅडो ही पावडर स्वरुपात असते. ती थोड्या वेळाने कमी कमी होत नाहीशी होते.
पण त्या तुलनेत लिपस्टिक ओलसर असल्याने दीर्घकाळ टिकते.
ओठांच्या रंगाला मॅच होणारे आय शॅडोज असावेत म्हणून काहीजणी थेट लिपस्टिक वापरून मोकळ्या होतात पण त्यातील केमिकल्स थेट डोळ्यांच्या संपर्कात आल्यामुळे हा त्रास होऊ शकतो.
४. पोटाच्या समस्या –
लिपस्टिक तयार करताना जे धातू किंवा केमिकल वापरले जातात त्यांचं प्रमाण अत्यल्प असतं. पण नित्यनेमाने तुम्ही लिपस्टिक वापरली तर ओठांवरुन जीभेवर आणि जीभेवरुन पोटात पोहोचायला किती वेळ लागेल?
यात असणारं शिसं थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे हळूहळू पोटात आपला परिणाम दाखवतं. लिव्हर, किडनी यावर स्लो पाॅयझनिंग होऊन त्याचा त्रास होऊ शकतो.
पोटदुखी किंवा इतर समस्या निर्माण होतात. म्हणून लिपस्टिक वापरताना विचार करा.
५. मेंदूवर परिणाम –
सतत कण कण पोटात जाणारं शिसं कॅडमियम यामुळे डोकेदुखी, विस्मरण हे त्रास उद्भवतात. कॅल्शियम वर पण याचा परिणाम होतो इतकंच नव्हे तर मज्जातंतू, मज्जारज्जू यांनाही बाधित करण्यात ही केमिकल्स कारणीभूत ठरतात.
६. गर्भावर परिणाम –
गर्भवती स्त्रीच्या पोटात जाणारं शिसं बाळालाही हानीकारक ठरू शकतं. त्याने गर्भपाताची शक्यता वाढते.
पोटात गेलेलं शिसं रक्तातील शिशाची मात्रा वाढवणं. ते थेट बाळापर्यंत पोहोचतं. आणि बाळात जन्मतः काही दोष, विकृती निर्माण होऊ शकते.
७. हार्मोन्सचे असंतुलन –
लिपस्टिक तयार करताना वापरली जाणारी केमिकल्स स्त्रियांच्या शरिरातील हार्मोन्स वर हल्ला करुन त्याची पातळी कमी जास्त करतात. त्यामुळे बऱ्याच समस्या निर्माण होतात. जसं की मूल न होणं किंवा गर्भपात होणं वगैरे.
उपाय –
१. लिपस्टिक हर्बल असावी. जी तयार करताना केमिकल विरहित असेल.
२. एक्सपायरी डेट नीट तपासून घ्या.
३. लिपस्टिक लावण्यापूर्वी कन्सीलरचा एक थर देऊन मग लिपस्टिक लावा. ज्यामुळे ओठ आणि लिपस्टिक यात एक थर राहतो आणि ओठाशी थेट संपर्क येत नाही.
थोडक्यात सांगायचं तर सौंदर्य जोपासताना काळजीपूर्वक प्रसाधनांचा वापर करा.
===
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.