Site icon InMarathi

नैसर्गिक सौंदर्य असतानाही महिला मेकअप का करतात? बघा यामागचं मानसशास्त्र!

makeup inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

“स्त्रियांना मेकअपचं इतकं वेड का असतं? आणि त्यावर अतोनात पैसे त्या का खर्च करतात?” जगातील समस्त पुरुषांना पडलेला हा एक भाबडा प्रश्न आहे आणि हा प्रश्न पडणं एकदम योग्य सुद्धा आहे.

मेकअप आणि स्त्रीची मैत्री ही पुरुषांसाठी अगदी न उलगडणाऱ्या कोड्यासारखी आहे. पुरुष या बद्दल फक्त अंदाज बांधू शकतात, पण काही वेळा ते चुकतात सुद्धा.

मेकअप करण्यामागे फक्त दुसऱ्यांना इम्प्रेस करणं किंवा पुरुषांना इम्प्रेस करणं, हाच एकमेव हेतू असतो असा काही लोकांचा गैरसमज आहे. म्हणूनच, असल्या समज गैरसमाजांपासून आपली सुटका करणारा आजचा लेख.

स्त्रिया मेकअप का करतात यामागची काही महत्त्वाची कारणं आपण जाणून घेणार आहोत. चला तर सुरु करूया –

१) आत्मविश्वास वाढवण्यासाठी –

 

 

एका संशोधनावरून असं सिद्ध झालंय, की १० पैकी ८ स्त्रिया आपला आत्मविश्वास बळकट करण्यासाठी मेकअप करतात. आपण यामागची मानसिकता समजून घ्यायला हवी.

समाजात नेहमीच, स्त्री कडे ती अगदी परफेक्ट असावी, सौंदर्याचा पुतळा असावी हीच अपेक्षा केली जाते. अगदी लग्नासाठी मुलगी शोधताना असो वा सिनेमात दाखवली गेलेली नटी असो, ती सुंदरच दिसायला हवी असा आपला समज असतो, मग तिच्या सौंदर्याची अपेक्षा करणारा तो नवरा मुलगा किंवा सिनेमातील नट कसाही का दिसेना.

समाजाकडून असलेल्या या अपेक्षांपायी नैसर्गिक रूपाला काहीच किंमत उरली नाही. ज्यामुळे स्त्रियांमध्ये कोण जास्त सुंदर दिसतंय याची चढाओढ सुरु झाली आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी त्यांनी, मेकअपचा आधार घेणं सुरु केलं.

२) मरगळ घालवण्यासाठी –

 

 

मेकअपमुळे स्वतःची संपूर्ण पर्सनॅलिटी सुद्धा बदलता येऊ शकते, ज्यामुळे महिलांना स्वतःच्या रुपात बदल करण्याचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. केस वाढवणे, कापणे, मेकअप करून स्वतःला पूर्णपणे नवीन आणि फ्रेश लूक देणे यामुळे त्यांना प्रसन्न वाटतं.

स्त्रीयांना मुळातच नीट नेटकं राहायला आवडतं, आपल्या स्टाईलमध्ये वेगवेगळे प्रयोग करून बघायला आवडतात. याच ओढीपायी रोज रोज तोच लूक ठेऊन त्यांना कंटाळा येतो.

मेकअप करून लुक्स बदलून स्वतःलाच फ्रेश वाटावं आणि आयुष्यातली मरगळ थोडी का होई ना कमी व्हावी म्हणून मेकअप त्यांच्या मदतीला नेहमी तत्पर असतो.

३) चिरतरुण दिसण्यासाठी –

मेकअप म्हणजे जादूची छडी, जिच्यामुळे आपण स्वतःचं वय सुद्धा लपवू शकतो आणि छान दिसण्यात स्त्रियांपेक्षा जास्त रस कोणालाच नसतो. त्यामुळे म्हातारपणात येणाऱ्या सुरकुत्या, चेहऱ्यावरचे डाग, डोळ्यांखालची काळी वर्तुळं हे सगळं लपवण्यासाठी सुद्धा स्त्रिया मेकअप करतात.

४) मेकअप – एक कला –

 

 

ज्याप्रमाणे एखादा चित्रकार त्याच्या कॅनव्हासवर ब्रशने रेघा ओढून सुंदर कलाकृती तयार करतो तसेच मेकअपचे असते. मेकअप हा प्रत्येकच मुलीला किंवा कोणालाही करता येतो असे नाही हं!

मेकअप करण्यासाठी, आयशॅडोचे रंग व्यवस्थित मिक्स करण्यासाठी, चेहऱ्यावर फाउंडेशन अति बटबटीत दिसणार नाही यासाठी भरपूर प्रॅक्टिसची गरज असते.

मेकअप करणे कोणाही ऐऱ्यागैऱ्याचे काम नव्हे, ती एक कला आहे आणि हा मेकअप करून काही स्त्रियांना आनंद मिळतो, एक कला जोपासल्यासारखी वाटते.

५) वय दाखवण्यासाठी –

 

 

आता तुम्ही म्हणाल हे काय? स्त्रियांना तर नेहमी वयापेक्षा लहान दिसायला आवडतं, पण तसं नाहीये. काही स्त्रियांचा चेहरा हा लहान मुलींसारखा दिसत असतो. वयाच्या मानाने त्या बऱ्याच लहान दिसतात, त्यामुळे आपलं योग्य वय दर्शवण्यासाठी सुद्धा महिला मेकअपचा उपयोग करतात.

६) सौंदर्य खुलवण्यासाठी –

 

 

सुंदर दिसणं कोणाला आवडत नाही? स्वतःला छान वाटावं म्हणून किंवा सेल्फ केयर म्हणून सुद्धा मेकअपचा उपयोग केल्या जातो.

आयलाईनर लावून मस्कारा लावून डोळे खुलावणे, बोलके करणे, गालांना लाली लावून चेहरा मोहक आणि हसरा बनवणे, नाकाला किंवा चीक बोन्सना हायलायटर लावून असलेल्या सौंदर्यात भर घालणे, ते खुलवणे हे सगळं मेकअप मुळे शक्य आहे.

७) त्वचा नितळ दिसण्यासाठी –

 

 

कोणालाही पुटकुळ्या, पुरळ आणि पिंपल्सने भरलेला, डाग असलेला चेहरा बघायला नकोसं वाटतं, ते सगळं किती ही नैसर्गिक असलं तरी.

कधी कधी जुन्या जखमांचे व्रण सुद्धा चेहऱ्यावर असतात, जे अतिशय वाईट आणि कधी कधी भयावह वाटतात. कारण माणसाची प्रवृत्तीच अशी आहे. चांगल्या आणि सुंदर गोष्टीच मनाला भावतात. म्हणून हा मेकअपचा अट्टाहास.

८) प्रेझेंटेबल असण्यासाठी –

 

 

 

महिलांना नेहमी टिपटॉप राहायला आवडतं हे आधीच्या मुद्द्यात सुद्धा सांगितलंय. तुम्ही किती चपळ आहात, तुमची पर्सनॅलिटी कशी आहे याचा  तुमच्या राहणीमानावरून आणि तुमच्या लूक वरून सुद्धा अंदाज लावला जातो.

याशिवाय मेकअपच्या पद्धतीवरून तुमचा स्वभाव कसा आहे याचा सुद्धा अंदाज लावला जातो. आपण परफेक्ट असणं हे सगळ्याच स्त्रियांना आवडतं. त्यामुळे कारण काहीही असो प्रेझेंटेबल दिसलं पाहिजे म्हणून सुद्धा स्त्रिया मेकअप करतात.

ही इतकी विविध कारणं आहेत त्यामुळे स्त्रियांना मेकअप फार आवडतो. यापैकी तुम्हाला किती माहित होती?

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version