' व्यवस्थित झोप झाली, तरी दिवसभर दमल्यासारखं वाटतंय? या ७ टिप्स आजमावून बघाच – InMarathi

व्यवस्थित झोप झाली, तरी दिवसभर दमल्यासारखं वाटतंय? या ७ टिप्स आजमावून बघाच

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

अनेक वेळेस व्यवस्थित झोप झाल्यानंतर देखील दिवसा आपल्याला दमल्यासारखे जाणवतं. अशावेळी आपण आजारी आहोत का? असा विचार अनेक वेळा मनात डोकावून जातो.

पण खरं म्हणजे आपल्यापैकी अनेकांना असं काहीतरी नक्कीच जाणवत असतं त्यामुळे निश्चिंत राहा. तुम्हाला कुठल्याही वैद्यकीय मदतीची गरज नाही!

या लेखात दिलेल्या काही टिप्सचे पालन केले तर तुम्हाला थकल्यासारखं वाटणार नाही.

आज-काल आपली जीवनशैली प्रचंड बदलली आहे आणि याच बदललेल्या जीवनशैलीमुळे अनेक अनावश्यक गोष्टी आपल्याला जाणवू लागतात.

 

enough sleep inmarathi

 

मानवी शरीराला साधारणपणे आठ तास झोप आवश्यक असते या झोपेच्या कालावधीमध्ये फरक पडला की त्याचे परिणाम आपल्या शरीरावरती दिसायला सुरुवात होते!

त्यामुळेच कधीकधी व्यवस्थित झोप झाल्यावर देखील आपल्याला दिवसभर दमल्यासारखे वाटत असतं. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी काही गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे!

१. नियमित पाण्याचे सेवन :

 

drink water inmarathi

 

अनेक वेळेस आपण कुठल्यातरी महत्त्वाच्या कामात असतो, ते काम दोन-तीन तास चालते आणि आपण पाणी प्यायचं विसरून जातो.

आपल्या शरीरातील पाण्याचे प्रमाण जर कमी झाले तर त्यामुळे देखील आपल्याला दमल्यासारखे वाटू शकते. याशिवाय आपले शरीर नेहमीपेक्षा कमी काम करते.

त्यामुळे उत्साह टिकवण्यासाठी नियमित वेळेत मुबलक प्रमाणात पाण्याचे सेवन करावे.

हे ही वाचा – झोप येत नाहीये? या आणि इतर ७ त्रासांवर आयुर्वेदातला हा “खास” उपाय करून बघा!

२. कॉफीचे प्रमाणात सेवन करा :

 

coffee inmarathi

 

कॉफी किंवा कॅफिनयुक्त द्रव्याचे प्रमाणात सेवन करावे.

जर आपण दिवसातून एक-दोन कप कॉफीचे सेवन करत असू तर त्यामुळे आपला उत्साह टिकून राहतो परंतु हे प्रमाण त्यापेक्षा जास्त वाढले तर त्यामुळे आपल्याला थकवा येऊ शकतो त्यामुळे कॉफीचे सेवन प्रमाणात करावे.

३. नाश्ता करा :

 

pohe inmarathi

 

आपल्या दिनचर्येतील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे नाश्ता, रोज सकाळी नाश्ता करायला हवा त्यामुळे तुम्हाला दिवसभर थकवा जाणवणार नाही.

यासोबतच तुमच्या जेवणाच्या वेळा देखील अत्यंत तंतोतंत पाळा कारण आपली नेहमीची जेवणाची वेळ चुकली की त्यामुळे देखील तुम्हाला बाकी दिवसभर थकवा जाणवू शकतो त्यामुळे तुमच्या नेहमीच्या जेवणाच्या वेळेत जेवण करा.

४. जेवणाचे प्रमाण :

 

limited food inmarathi

 

कधीही प्रमाणापेक्षा जास्त जेवण करू नका कारण यामुळे तुमची कार्यक्षमता कमी होते. यासोबतच दोन किंवा तीन वेळेस भरपूर खाण्यापेक्षा सहा वेळेस थोडं थोडं खा यामुळे तुमची कार्यक्षमता कमी होणार नाही.

हे ही वाचा – पाणी पिण्याबद्दलची ही नियमावली माहीत नसेल तर स्वस्थ आरोग्य अशक्यच!

५. सिगरेट ओढू नका :

 

no smoking inmarathi

 

आपल्यापैकी अनेक जणांना सिगरेट ओढायची सवय असेल. जर तुम्हाला दिवसभर थकवा वाटत असेल तर तुम्ही पहिल्यांदा सिगरेटचं प्रमाण कमी करायला हवं कारण सिगरेट सोबतच अनेक घातक पदार्थ आपण शरीरामध्ये घेत असतो.

या पदार्थांमुळे आपली कार्यक्षमता कमी होते एवढेच नाही तर आपल्या शरीराला गंभीर आजारांनी देखील या सवयीमुळे ग्रासला जाऊ शकतं.

६. शारीरिक हालचाली वाढवा :

 

indian girl workout inmarathi

 

आपण अनेक वेळ टीव्ही बघत किंवा लॅपटॉप समोर काम करत एकाच ठिकाणी बसून असतो यामुळे देखील आपल्याला दिवसभर थकवा येऊ शकतो.

या गोष्टी टाळण्यासाठी प्रत्येक तासाला उठून एक चक्कर मारून यायला हवी, यामुळे तुमची शारीरिक हालचाल होईल आणि तुम्हाला थकवा जाणवणार नाही.या मधल्या काळात तुम्ही लहानसा व्यायाम देखील करू शकता.

७. तुम्हाला आनंद मिळेल अशा गोष्टी करा :

 

tv inmarathi

 

अनेक वेळी खळखळून हसणं हे अनेक रोगांवर ती उत्तर असू शकतं. त्यामुळे जर तुम्हाला थकल्यासारखं वाटत असेल तर तुम्हाला आवडेल असा कुठलंतरी कॉमेडी चित्रपट बघा!

तुमच्या आवडीचं कुठलतरी पुस्तक वाचा किंवा तुमच्या एखाद्या जवळच्या मित्राला फोन करा. या टिप्सचा वापर करून तुम्ही तुमचा उत्साह दिवसभर अगदी व्यवस्थितपणे टिकवू शकता.

===

हे ही वाचा – तंदुरुस्त शरीर ते मनाची शांतता, लवकर उठण्याचे आहेत ‘सर्वांगीण’ फायदे…

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?