' क्लासमेट्सचा अनोखा व्यवसाय लॉकडाऊनमध्ये नोकरी गमावलेल्यांसाठी ठरला आधार! – InMarathi

क्लासमेट्सचा अनोखा व्यवसाय लॉकडाऊनमध्ये नोकरी गमावलेल्यांसाठी ठरला आधार!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

माणसाची इच्छा आणि त्यातल्या त्यात खाण्याची इच्छा डोळ्यासमोर ठेवून डोअर स्टेप खाण्याचे पदार्थ उपलब्ध करून देण्याच्या कल्पनेतून स्वीगी, झोमॅटो सारखे सक्सेसफुल्ल स्टार्टअप आज दिमाखात उभे आहेत.

बोटाच्या इशाऱ्यावर हवी असलेली डिश काही तासात आपल्या समोर हजर असते.

आता एक इन जनरल घडणारी घटना बघूया. आपल्या ओळखीतके एखादे जेव्हा दुसऱ्या शहरात जातात, तेव्हा आपण त्यांना तिथले प्रसिद्ध पदार्थ आणायला सांगतो.

उदाहरणार्थ आग्र्याचा पेठा, पुण्याच्या चितळे बाकरवडी, गोव्याचे काजू, बंगळूरचा मैसूर पाक वगैरे वगैरे. हे पदार्थ आपल्या जवळपास जरी मिळत असले तरी आपण त्यांना ते आणायला सांगतो.

 

staple food inmarathi

 

का? तर त्या त्या ठिकाणच्या त्या त्या पदार्थांची बातच वेगळी असते.त्यातल्या त्यात ते पदार्थ तयार करणारे स्थानिक ब्रँड. आणि काही पदार्थ तर शोधून सापडत नाहीत.

आता विचार करा, तुम्ही दक्षिण भारतात चेन्नई, कोचीन सारख्या भागात सध्या वास्तव्याला आहात आणि तुम्हाला बाकरवडी खायची इच्छा झाली. तर हा पदार्थ त्या भागात मिळण्याची शक्यता किती?तर अवघी १-५%.

आणि इथे झोमॅटो स्वीगी हे ऑनलाईन फूड डिलिव्हरी अँप कुचकामी ठरतात.

जर आता हेच पदार्थ तुम्हाला हवं तेव्हा हवं त्या वेळी तुमच्या दारापर्यंत येणार असेल तर? होय!

आता अशी व्यवस्था झाली आहे की तुम्ही जिथले कुठले असाल आणि जिथे कुठे रहात असाल तुम्हाला हवं ते स्थानिक प्रसिद्ध पदार्थ तुमच्या पुढ्यात उपलब्ध करून दिले जाईल.

आणि ही व्यवस्था उभारली आहे अवघ्या २१ वर्षाच्या दोन तरुणांनी! मुस्कान संचेती आणि राघव झवर.

 

muskaan raghav inmarathi

 

आपला देश म्हणजे विविधतेत एकता आणि त्यामुळेच वेगळ्या भाषा आणि प्रांत असलेले अनेक जण देशाच्या वेगवेगळ्या भागात नोकरी धंद्या करिता सेटल होऊन जातात.

हवामान, पाणी जरी मानवलेलं असलं तरी अन्नपदार्थ मुळात अशी गोष्ट आहे जी लवकर मानवत नाही. त्यातल्या त्यात ते उपलब्ध होण्याचे प्रमाण सुद्धा कमी.

मार्केट मधक्या याच कमतरतेचा फायदा उचलत मुस्कान आणि राघव यांनी एक स्टार्ट अप सुरू केलं, – ‘द स्टेट प्लेट.!'(टीएसपी)

आपल्या या स्टार्ट अपच्या आयडिया बद्दल सांगताना मुस्कान सांगते, बंगळूर मध्ये राहत असताना राजस्थानी पापड घरातले संपले होते आणि मारवाडी कुटुंब म्हणजे पापडाशिवाय त्यांचं अन्न पोटात जात नाही.

खूप शोधल्या नंतर तिला ते सापडले. पण त्याची किंमत ही खूपच जास्त होती.आणि अशातच या स्टार्ट अप ची कल्पना तिला सुचली आणि ही आयडिया तिने राघव या तिच्या मित्राशी शेअर केली.

आता बघूया हे मुस्कान आणि राघव आहेत कोण? मुस्कान ही बंगळूर स्थित तरुणी तर राघव हा कोलकाता स्थित तरुण.

दोघेही दिल्लीच्या श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्स चे विद्यार्थी. शेवटच्या वर्षात प्लेसमेंट होऊन नोकरी पण पक्की झाली होती.

 

shreeram college inmarathi

 

नोकरी नंतर एमबीएचा प्लॅन आणि मग पुन्हा चांगला कॉर्पोरेट जॉब. पण अचानक आलेल्या कोरोनाने सगळं डिले करून टाकलं!

या आधी या दोघांनी अनेक बिझनेस आयडिया प्रत्यक्षात आणायचा प्रयत्न केला होता. त्या सगळ्यामध्ये ही आयडिया उत्तम असल्याची ते स्वतः मान्य करतात.

तर, या दोघांनी आपले मित्र आणि परिजनांच्या माध्यमातून एक सर्व्हे केला आणि त्यांना दिसून आलं की मागणी जरी जास्त असली तरी प्रोडक्ट मात्र वेगवेगळे आहे. त्यामुळे हे मार्केट एका ऑर्गनाईज स्ट्रक्चर मध्ये नाही आहे.

याच स्थितीचा अभ्यास करून मग केवळ ५०००/- च्या गुंतवणुकीवर यांनी आपल्या स्टार्ट अप चा श्रीगणेशा केला!

लॉक डाऊन मध्ये आपल्या बिझनेस स्किल डेव्हलप करण्यासाठी या दोघांनी केलेली सुरवात मार्केट मध्ये कस्टमरच्या समाधानावर येऊन थांबली.

मुस्कान आणि राघव यांनी आपली एक छोटीशी वेबसाईट तयार करून सुरवातीला बंगळूर पुरतं आपला बिझनेस एक पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरू केला.

आणि सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्म वरून आपल्या बिझनेस ची जाहिरात ते करू लागले.

आपल्या सुरवाती बद्दल राघव सांगतो, जेव्हा प्रोजेक्ट सुरू केला तेव्हा फूड आयटम ते मुस्कान च्या घरी ठेवू लागले. नंतर मुस्कान स्वतः ते आयटम डिलिव्हर करत असे.

प्रोडक्टच्या चवीची टेस्टिंग ते स्वतः करतात जेणेकरून ग्राहकांचा हिरमोड होऊ नये ही ‘गुड प्रॅक्टिस’ ते आजही करत आहेत.

 

state plate inmarathi

 

जशी त्यांच्याकडच्या मागणी असलेल्या प्रोडक्ट ची संख्या १०० पार झाली, तस त्यांनी आपला बिझनेस भारतभर ‘एक्सपांड’ करायचा निर्णय घेतला.

खाद्य पदार्थांचे मुख्य ब्रँड म्हणजे स्थानिक वेंडर्स आणि हाउसहोल्ड कुक. त्यांना आपल्या लिस्ट मध्ये आणणे ही खूप मोठी चॅलेंजिंग गोष्ट होती आणि लॉक डाऊन मुळे हे अजूनच खडतर झालं.

शेवटी यावर उपाय म्हणून लॉक डाऊन मुळे स्लो झालेल्या अशाच वेंडर्स आणि कुक यांच्याशी त्यांनी भेटीगाठी केल्या.

पार्टनरशिप मध्ये आता सुरवातीला जास्त प्रॉफिट होणार नाही हे त्यांना समजावून सांगण्यात हे दोघेही यशस्वी झाले आणि एका स्पेसिफिक किमतीवर प्रोडक्ट विकायचे त्यांनी ठरवले.

ज्यामध्ये ना जास्त नफा होणार नाही तोटा, एकूणच ‘विन विन’ (win win) मॉडेल!

मागणी वाढल्यानंतर मात्र मोठ्या ब्रँड कडून पदार्थ थेट मागवले जाऊ लागले किंवा त्यांच्या डीलर कडून. जस की आधी सांगितलं की पदार्थाची टेस्ट ते स्वतः करतात, जर त्या पदार्थांबद्दल निगेटिव्ह फीडबॅक आला की तो पदार्थ ते लिस्ट मधून काढून टाकतात.

डिलिव्हर होणारा प्रत्येक पदार्थ हा महिनाभर खाण्यासाठी उपयुक्त असतो. जरी डिलिव्हरीला उशीर झाला तरी ते त्याचा आनंद घेऊ शकतात.

बंगळूर स्थित गृहिणी असलेल्या इंदिरा सांगतात, मुस्कान आणि राघव हे दोघे पदार्थांच्या चवीवर आणि क्वालिटी वर कटाक्षाने लक्ष ठेवून असतात.

 

raghav muskaan inmarathi

 

इंदिरा पुढे सांगतात, त्यांनी आणि त्यांच्या काही मित्र मैत्रिणींनी होम फूड बिझनेस ची सुरवात केली होती. पुढे लॉक डाऊन मुळे तो कमी कमी होत गेला. नंतर ‘टीएसपी’ साठी आम्ही आमचे पदार्थ द्यायचे ठरवले.

सगळ्यात आधी ते दोघे त्यांचे पदार्थ चाखण्यासाठी स्वतः आले आणि नंतर त्यांनी पदार्थ वेब साईट वर लिस्टिंगला परमिशन दिली. त्या दोघांची कामाबद्दलची एकाग्रता आणि इच्छा शक्ती जबरदस्त आहे.

आज टीएसपी च्या साईटवरून १७ फूड आयटम हे विकले जातात. ज्यासाठी आता त्यांना खुल्या मार्केट आणि ग्राहकांची गरज नाही.

आज टीएसपी च्या मुख्य टीम मध्ये केवळ १० जण आहेत. पण हे दहा जण आज दिवसाला हजारो लोकांच्या जिभेसोबत मानसिक समाधान सुद्धा अनुभवत आहेत.

 

TSP inmarathi

 

शिवाय लॉक डाऊन मध्ये नोकरी गमावलेल्या अनेकांना त्यांनी रोजगाराचे साधन उपलब्ध करून दिले आहे.

वय ही फक्त संख्या आहे, माणूस आपल्या जिद्द आणि हुशारीच्या बळावर काहीही करू शकतो हे मुस्कान आणि राघव यांनी दाखवून दिले.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?