Site icon InMarathi

होंडा, हिरो या कंपन्यांनी बाईक्सवर तब्बल १०-१२ हजारांची सुट देण्यामागचं गौडबंगाल!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

काल तुम्ही सर्वच न्यूज वाहिन्यांवर एक बातमी बघितली असेल ती म्हणजे “स्कूटर-बाईक्सच्या किंमतीमध्ये तब्बल १०-१२ हजारांची घसघशीत घट!

http://paisa.khabarindiatv.com

एरव्ही हि बातमी तुम्हाला बाहेरून कुठून कळली असती तर तुम्ही ती हसण्यावारी नेली असती पण न्यूज वाहिन्यांवर दाखवतायत म्हणजे ती खरीच होती. हि बातमी ऐकून ग्राहकांनी शोरूम्समध्ये अक्षरश: धाव घेतली. मुख्य म्हणजे केवळ ३१ मार्च पर्यंतच हि ऑफर असल्याने बुकिंगसाठी लोकांच्या झुंडी उडाल्याचे दिसून आले.

चला जाणून घेऊया ६०-७० हजारांच्या गाड्यांवर १०-१२ हजारांची सूट या कंपन्या का देत आहेत? एवढा मोठा तोटा सहन करण्यापर्यंतची अशी कोणती वेळ यांच्यावर आली आहे? या प्रकरणामागचं नेमकं गौडबंगाल काय आहे?

http://supremecourtofindia.nic.in/

या कंपन्यांनी एवढी घसघशीत सूट देण्याला कारणीभूत आहे सुप्रीम कोर्टाचा एक निर्णय! सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार,

BS-III इंजिन मॉडेल्स च्या वाहनांमुळे होणाऱ्या प्रदुषणामुळे समाजाचे आरोग्य धोक्यात येत आहे त्यामुळे या मॉडेल्सच्या विक्री आणि नोंदणी वर १ एप्रिल पासून बंदी घालण्यात आली आहे.

सुप्रीम कोर्टाच्या या दणक्यामुळे तब्बल ८ लाख गाड्या प्रभावित झाल्या असून, त्याचं आता करावं काय हा मोठा प्रश्न कंपन्यांपुढे निर्माण झाला होता. त्यात सुट म्हणून सुप्रीम कोर्टाने कंपन्यांना २ दिवस दिले आहेत. या दोन दिवसात कंपन्या शक्य तितक्या वाहनांची विक्री आणि नोंदणी करू शकतात.

http://totalnewsexpress.com

आता मूळ किंमतीला तर ग्राहक काही वाहने खरेदीसाठी येणार नाहीत, त्यामुळे कधीही न दिलेला डिस्काउंट देऊन ग्राहकांना आकर्षित करण्याचा सपाटा कंपन्यांनी लावला आहे.

हिरो मोटोकोर्प कंपनीने आपल्या सर्वच बाइक्स आणि स्कूटर्सवर १२,५०० पेक्षा जास्त सूट देऊन जणू सर्वच स्टोक विकायचा विचार केलेला दिसतोय. तर दुसरीकडे होंडा ने देखील १०००० पर्यंतची सूट देऊन आपणही मागे नसल्याचे दाखवून दिले आहे.

अर्थात या चढाओढीमुळे जरी कंपन्यांना तोटा सहन करावा लागणार असला तरी स्टोक भंगारात जाण्यापेक्षा तोट्यात जाऊन विकलेला बरा असाच विचार कंपन्यांनी केलेला दिसतो.

http://auto.ndtv.com

जर तुम्हालाही बाईक किंवा स्कूटर घ्यायची असेल तर जास्त विचार करू नका, आज शेवटचा दिवस आहे, पटकन शोरूम्समध्ये पळा किंवा ऑनलाईन जाऊन गाडी बुक करा.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version