आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
पाळीच्या आधी आणि पाळी दरम्यान स्त्रियांना टोकाचे मूड स्विंगज् होतात. सकाळ प्रसन्न झाली तरी लगेच तासा दोन तासात चीड चीड व्हायला लागते, राग यायला लागतो राडावंसं वाटू लागतं. हे सगळं झालं की घरचे पाळीचा एवढा काय बाऊ करतेस? सगळ्यांनाच होतं, नॉर्मलंच तर असतं.
पण हेच नॉर्मल वाटणारे मूड स्विंगज् काही जणींसाठी नॉर्मल नसून एक आजार असतो हे आपल्याला ठाऊक आहे का? कदाचित नसेल, पण होय हा आजार आहे.
याला PMS म्हणजेच Premenstrual Syndrome म्हणतात. चला तर बघूया pms काय आहे ते.
PMS म्हणजेच Premenstrual Syndrome आपल्या शरीरातील पाळीच्या अगोदर होणाऱ्या बदलांमुळे आपल्या स्वभावावर होणाऱ्या परिणामाला म्हणतात. आपली menstrual cycle हि २८ दिवसांची असते.
यात पाळी येण्यापूर्वीच्या २ – ३ आठवड्यात स्त्रियांना भरपूर मूड स्विंग, अकारण चिडचिड, राग असे सगळे मानसिक बदल जाणवू लागतात. pms का होतो याचा नेमका शोध लागलेला नाही.
पण संशोधकांच्या म्हणण्यानुसार स्त्रीच्या शरीरातील हार्मोनल बदल या सगळ्याला कारणीभूत असतात. पाळी येण्याआधी इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टरॉन या हॉर्मोन्सची पातळी भरपूर असते.
या दोन हॉर्मोन्सच्या कमी होण्याचा परिणाम “सेरिटोनिन” ह्या हॉर्मोन वर होतो. ह्या हॉर्मोनचं मूळ काम आपल्या शरीरातील सगळ्या मानसिक प्रतिक्रिया, भूक व झोपेच्या वेळेच्या नियोजन हे असतं.
आणि ह्यातच बदल झाल्याने हि झोप, भूक, आणि मानसिक स्थिरतेवर परिणाम होऊ लागतो. ज्यामुळे हे सगळे मानसिक बदल घडत असतात. १० पैकी ४ – ५ स्त्रियांना pms चा त्रास असतो.
पण यात काळजी करण्यासारखं काहीच नाही. आपण हा त्रास काही उपाय करून नक्कीच आटोक्यात आणू शकतो. तर pms ला घालवण्याचे आणि मन शांत ठेवण्याचे काय उपाय आहेत ते पाहूया.
१) व्यायाम –
व्यायाम केल्याने शरीरातील इंडोर्फिन आणि डोपमीन ह्या हॉर्मोनची वाढ होते. ह्याच हॉर्मोन्स मुळे आपण आनंदी राहतो. त्यामुळे २० – ३० मिनिटांचा नियमित व्यायाम आपल्याला pms च्या त्रसापासून सोडवू शकतो.
व्यायाम हा डिप्रेशन साठी सुद्धा उपयुक्त असल्याने pms मध्ये होणाऱ्या डिप्रेशनच्या त्रसापासून आपली सुटका होऊ शकते. त्यामुळे ऍक्टिव्ह राहण्याचा प्रयत्न करा.
२) सकस आहार –
बाहेरचं जंक फूड खाणं टाळा. त्यात असलेल्या अतिरिक्त तेल, मैदा, मसाले यासागळ्यांमुळे आपल्या हार्मोनल लेवल मध्ये कमालीचे बदल घडतात.
त्यामुळे शक्यतोवर घरचे साधे जेवण जेवा. अतिरिक्त तेलकट आणि मसालेदार पदार्थ टाळा.
३) कॅल्शियम –
संशोधनातून असे समोर आले आहे कि हाडांबरोबर pms च्या उपचारांकरिता सुद्धा कॅल्शियमचा उपयोग केला जाऊ शकतो. त्यामुळे कॅल्शियम युक्त अन्नाचा आपल्या आहारात समावेश असूद्या.
दूध, दही, पनीर, हिरव्या पालेभाज्या, चीज, डाळी या सगळ्यातून आपल्याला कॅल्शियम मिळते. याशिवाय तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने कॅल्शियमच्या गोळ्या सुद्धा घेऊ शकता.
४) व्हिटॅमिन B6 –
व्हिटॅमिन B6 हे मूड स्विंगज् वर उपयुक्त ठरल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे हे व्हिटॅमिन असलेल्या पदार्थांचे सेवन करा.
हे व्हिटॅमिन आपल्याला मासोळी, चिकन, टर्की, फळं आणि डाळींतून मिळते. डॉक्टरांच्या सल्ल्याने व्हिटॅमिन B6 च्या गोळ्या सुद्धा घेता येऊ शकतात.
५) गर्भनिरोधक उपाय –
गर्भनिरोधक औषधांमध्ये हार्मोनल गुणच असतात. ह्या गोळ्या घेतल्याने आपली हार्मोनल लेव्हल मेंटेन केल्यासारखी राहते. त्यामुळे pms चे सिमटम्स कमी करण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने, तुमच्या प्रकृतीला सूट होणाऱ्या गर्भनिरोधक गोळ्या घेऊन pms चा त्रास कमी करू शकता.
पण ध्यानात असुद्या, हे कृत्रिम आणि तात्पुरते उपाय आहेत. गोळ्यांवर अवलंबून न राहता राहणीमानातील बदल जास्त फायद्याचे ठरतील.
६) झोप –
आपली झोपेची सायकल बिघडली कि शरीरातील हॉर्मोन्सची रचना सुद्धा बद्दलते. त्यामुळे सुदृढ राहण्यासाठी आहार आणि व्यायामाबरोबर झोप सुद्धा तितकिच महत्वाची.
पण हल्ली मोबाईल, दगदग, ऑफिसचा ताण या सागळ्यामुळे पुरेशी झोप होत नाही. आणि झोप न झाल्यानेच अर्ध्या अधिक आपल्या पुढे समस्या उद्भवतात.
त्यामुळे रात्री ९ – ११ च्या मध्ये झोपून सकाळी ६ – ७ वाजे पर्यंत उठण्याचा नियम लावून घ्या. शेवटी तब्बेत महत्वाची. pms घालवण्याची हि एक सगळ्यात महत्त्वाची आणि सोपी टीप आहे.
७) ताण –
pms, pcod या सारख्या हार्मोनल डिसऑर्डर मुळे होणाऱ्या रोग हे ताणामुळे जास्त प्रमाणात होताना आढळत आहेत. ताण हा निद्रानाशक ठरू शकतो. ताणामुळे सुद्धा आपल्या शरीरातील हॉर्मोन्सच्या रचनेत बदल होतो.
पण “ताण संपूर्णपणे कमी होतोच” हे जरा खरे वाटण्यासारखे नाही, कारण आजकाल ताण आणि माणूस हातात हात घालून जीवनाचा प्रवास करत असतात.
म्हणून ताण १००% तर घालवता येणार नाही पण तुम्ही ताणाला मॅनेज नक्कीच करू शकता. निसर्गाच्या सानिध्यात राहून, व्यायाम करून आपला आवडता छंद जोपासून, लहान मुलांबरोबर खेळून, गाणी ऐकून, ताण नियंत्रणात आणता येऊ शकतो.
८) निरीक्षण –
आपल्या मूड स्विंगज् चे निरीक्षण करणे सुरू करा. आपल्याला पाळीच्या किती दिवस आधी पासून हा त्रास होतो, किती प्रमाणात होतो, कोणत्या दिवशी राग येतो, कोणत्या दिवशी मन दुःखी होतं हे सगळे टिपणे सुरु करा.
या सगळ्यांना एक “पॅटर्न” आहे हे तुमच्या लक्षात येईल. अर्धी लढाई तुम्ही इथेच जिंकलेली असेल.
कारण जो पर्यंत कधी कधी काय त्रास होतो हेच कळणार नाही, तो पर्यंत त्यावर उपाय सुद्धा केले जाणार नाहीत. त्यामुळे स्वतःचेच निरीक्षण करा.
९) बोला, मन मोकळं करा –
पाळीच्या वेळी थोडाफार बदल होणे नॉर्मल आहे. पण तुम्हाला नेहमीच चिडचिड होत असेल, अकारण राग येत असेल, अगदी डिप्रेस्ड वाटत असेल, टोकाचे पाऊल उचलावेसे वाटत असेल तर आपल्या जवळच्या व्यक्तींशी बोला.
बोलून मन मोकळं करा ते तुम्हाला समजून घेऊन काहीच चुकीचे करू देणार नाहीत. डॉक्टरांचा सल्ला घेण्यात तुमची मदत करतील.
===
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
===
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.