Site icon InMarathi

असा संबंध आहे ‘चिकन 65’ मधील 65 क्रमांकाचा “डिशच्या” नावाशी!

chicken 65 inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

हॉटेल मध्ये जेवायला गेल्यावर ‘स्टार्टर’ हा आपल्या सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय असतो. अर्धा तास वेटिंग मध्ये बसल्यावर जेव्हा आपल्याला हॉटेल मध्ये जागा मिळते आणि थोड्या वेळात वाफाळलेलं सिझलर समोर येतं, तेव्हा वाट बघताना आलेला कंटाळा लगेच निघून जातो.

खवय्ये लोकांची काही वेळेस अशी इच्छा होते, की आज फक्त स्टार्टरच पोटभर खावेत. मग ते स्टार्टर मधील पर्याय बघतात आणि आपली भूक भागवतात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

मंचुरियन, पकोडे या नावांमध्ये मग आपल्याला चिकन 65, पनीर 65 सारखी नावं दिसतात. काही वेळेस आपल्याला प्रश्न पडतो की ६५ का? ५५ का नाही? काय असेल या ६५ नंबरचं कारण? कुतूहल म्हणून जाणून घेऊया.

 

 

चिकन 65 या डिशची सुरुवात चेन्नई मधील हॉटेल बुहारी इथून झाल्याची नोंद आहे. कमीत कमी वेळात तयार होणारं आणि चवीला खमंग असल्याने अल्पावधीतच ही डिश खवय्यांच्या पसंतीस पडली. तिखट वापरल्याने चिकन 65 ला लाल रंग आणि चव येते.

कालांतराने प्रांतानुसार या डिश मध्ये बरेच बदल होत गेले. चिकन 65 हे ‘बोनलेस’ किंवा ‘बोन इन’ या दोन्ही प्रकारांनी बनवता येते. कांदा आणि लिंबू सोबत असल्यास ही डिश अजून चवदार लागते. शाकाहारी लोक याच प्रकारात पनीर 65 किंवा गोबी 65 सारख्या स्नॅक्सला प्राधान्य देत असतात. पण ६५ का ? हा प्रश्न असेलच.

चेन्नईच्या बुहारी हॉटेल च्या ए.एम.बुहारी यांनी चिकन 65 ला नाव देताना 65 हा क्रमांक वापरण्याचं हे कारण होतं, की ही डिश १९६५ मधील भारतीय सैनिकांसाठी सर्वात सोपी डिश होती. ही डिश १९६५ पासून सुरू झाल्याने हे लॉजिक बरोबर वाटतं. त्या वर्षी भारत आणि पाकिस्तान मध्ये युद्ध झालं होतं आणि ए. एम. बुहारी यांनी आपल्या सैनिकांसाठी प्रायोगिक तत्वावर हा पदार्थ केला.

 

 

एक अजून असा समज आहे की, चिकन 65 मध्ये एकूण पासष्ट मिरचीचे तुकडे टाकले जायचे, म्हणून या डिशला चिकन 65 हे नाव देण्यात आलं, पण हे प्रत्यक्षात शक्य वाटत नाही.

काही लोकांनी अजून एक समज पसरवला आहे, की चिकन 65 तयार करण्यासाठी चिकन हे कमीत कमी ६५ दिवसांचं असायला पाहिजे. याही पुढे जाऊन काही लोकांनी ही सुद्धा अफवा पसरवली होती, की एका चिकन 65 च्या डिश मध्ये चिकनचे ६५ पीस असतात. म्हणून या डिश ला ‘चिकन 65’ हे नाव देण्यात आलं आहे.

अजून एका व्यक्तीच्या म्हणण्यानुसार, भारतीय सैनिकांना देण्यात येणाऱ्या अन्नपदार्थात ही डिश ६५ व्या क्रमांकावर होती. म्हणून या डिश ला ‘चिकन 65’ हे नाव पडलं होतं.

 

बुहारी हॉटेलच्या सांगण्यानुसार १९६५ मध्ये शोध लागल्यानेच या स्नॅक्सला ‘चिकन 65’ हे नाव देण्यात आलं होतं आणि जगभरात तेच मान्य झालं. हॉटेलच्या संस्थापकांनी पदार्थाची लोकप्रियता बघून चिकनचे अजून काही प्रकार १९७८, १९८२ आणि १९९० मध्ये शोधून काढले होते, पण चिकनचे इतर कोणतेही प्रकार ‘चिकन 65’ इतके लोकप्रिय होऊ शकले नाहीत.

ए. एम. बुहारी यांना ‘चिकन 65’ चं पेटंट करण्यासाठी कित्येक लोकांनी सल्ला दिला होता, पण त्यांनी तो सल्ला मानला नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की, “अन्न ही कोणा एकाची प्रॉपर्टी असू शकत नाही आणि त्यांचं असं व्यापारीकरण होऊ नये.”

आपल्या अवतीभोवती असणाऱ्या गोष्टींमागे अशा रंजक कथा असतात, गरज असते ती जाणून घेण्याची!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version