Site icon InMarathi

अबब! चक्क 1BHK किंमतीची आहे दारुची बाटली! जगातील महागड्या दारुंचे १० प्रकार!

alcohol inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

दारू ही अशी गोष्ट आहे ज्याच्या किंमतीकडे फार कमी जण बघतात. प्रत्येक वर्षीचा केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर झाला, की आपण बघतो, दारू आणि सिगरेटच्या दरात आणि टॅक्समध्ये वाढ झालेलीच असते. तरीही त्यामुळे ‘दारू पिणारे इतक्या टक्क्याने कमी झाले’ अशी बातमी ऐकीवात नाहीये. कारण एकच, “शौक बडी चीज है.”

मार्केटची परिस्थिती कशीही असो, मागच्या काही वर्षात “चला जरा बसू”चं प्रमाण खूप वाढलं आहे हे नक्की. आनंद असो किंवा दुःख, दारुशिवाय तो क्षण पूर्ण जगल्यासारखं काही लोकांना वाटतच नाही.

सरकारला जास्त महसूल मिळवून देणाऱ्या दारूचे दुकान कोरोनाकाळात सुद्धा उघडावे लागले यावरूनच त्यातून सरकारला दारूविक्रीतून किती फायदा असेल हे लक्षात येतं. जसं प्रत्येक वस्तूला विकत घेणारे ग्राहक हे उच्च, मध्यम आणि स्वस्त अशा तीन प्रकारात मोडतात, तसंच दारूचं सुद्धा आहे.

 

 

स्वस्त म्हणजे भारतात सुरुवात झालेली ‘देशी दारू’ ज्याचा एक ठराविक वर्ग ग्राहक आहे. मध्यम किमतीच्या दारूमध्ये खूप प्रकार आहेत. उच्च प्रतिच्या दारू महाग आहेत.  त्या कमी तयार होतात आणि जास्त वर्ष टिकतात. जगात सगळीकडेच या दारू खूप महाग किमतीत विकल्या जातात.

दरवर्षी वाइन तयार करणाऱ्या कंपनी या नवीन प्रकार तयार झाल्यावर लोकांना आमंत्रित करतात आणि त्यांच्याकडून अभिप्राय जाणून मग वाईनच्या विक्रीची किंमत ठरवत असतात.

जगातील दारूच्या सर्वात महाग १० प्रकारांचे नाव केवळ कुतूहलापोटी देत आहोत. यामध्ये काही किमती या अतिशयोक्ती वाटू शकतात, पण उपलब्ध माहितीतूनच हे समोर आले आहे .

ही माहिती देण्यामागे व्यसनाधीनतेचं समर्थन करण्याचा कोणताही हेतु नाहीये:

१. हायलँड पार्क स्कॉच:

 

५० वर्ष जुनी असलेल्या या दारूची किंमत ११ लाख इतकी आहे.

२. मकेलींन फाईन अँड रेअर:

१९२६ मध्ये तयार झालेल्या दारूची ७५००० यु. एस डॉलर्स इतकी म्हणजे ५५ लाख इतकी आहे. तेवढ्या किमतीत एखादं घर विकत घेतलं जाऊ शकतं.

३. डालमोर व्हिस्की:

 

 

६४ वर्ष जुन्या असलेल्या या व्हिस्कीची किंमत कोटींच्या घरात आहे. इथून पुढच्या सगळ्या दारूच्या किमती या अशाच रेंजमध्ये आहेत. ऐकावं ते नवल असंच म्हणावं लागेल.

४. डोमेन डे ला रोमान्स (DRC) – कँटीनेन्टल:

 

 

१९४५ मध्ये पहिल्यांदा तयार झालेल्या या वाईनच्या सुरुवातीला फक्त ६०० बॉटल्स तयार करण्यात आल्या. अमेरिकेतील सर्वात महाग आणि जुन्या वाईनच्या शेवटच्या दोन बॉटल्सची किंमत ही १.४ मिलीयन यूएस डॉलर्स (५ कोटी रुपये) इतकी होती असं सांगितलं जातं.

५. लिगसी बाय अंगोस्तुरा रम:

 

 

२०१२ मध्ये लाँच झालेली ही रम ही जगात सर्वात जास्त महाग आहे. त्रिनिदादच्या ५० व्या स्वातंत्र्यदिनी या दारूच्या ५०० मिलीच्या बॉटल्सची विक्री लिलाव पद्धतीने करण्यात आली.

३५,१०० यु एस डॉलर्स (२५ लाख रुपये) इतक्या चढ्या किमतीत विकल्या गेल्या होत्या. चांदीचं झाकण असलेली ही बॉटल लाकडी बॉक्स मध्ये सिल्क आणि वेलवेट लावून ठेवण्यात आली होती.

६. रेमी मार्टिन – ब्लॅक पर्ल लुईस:

 

 

२०१२ मध्ये या दारूची लिलाव पद्धतीने विक्री करण्यात आली. ४० ते १०० वर्ष जुन्या Eaux डे व्हिएच्या टेस्ट मध्ये तयार करण्यात आलेल्या या दारूला जवळपास ९ लाख रुपये इतकी किंमत विक्रेत्यांना मिळाली होती.  आकर्षक बॉटलमध्ये लोकांसमोर आणलेल्या या बॉटलची रचना खूप प्राचीन मानली जाते.

७. बॉवमोर १९५७ – स्कॉच व्हिस्की:

 

 

स्कॉच प्रेमींनी या स्कॉचच्या प्रति बॉटलसाठी १८५३०० यु एस डॉलर्स इतकी किंमत देऊ केली होती. केवळ १२ बॉटल्स तयार करून विक्रीची सुरुवात या कंपनीने केली होती. ४५ वर्षांच्या संशोधनानंतर तयार झालेल्या ही दारु २००० साली परत सुरू करण्यात आली.

८. हेनरी ४ – दुडॉगनन हेरिटेज:

 

 

१०० वर्ष जुनी असलेली ही दारू जगातील सर्वात महाग दारू आहे. २ मिलियन यु एस डॉलर्स (१४ करोड रुपये) इतक्या किमतीत विकली गेलेली ही दारू २४ कॅरेट सोन्याच्या बॉटलमध्ये पॅक केली जाते. एका बॉटल ६५०० हिऱ्यांनी जडवलेली असते.

९. द पॅसन अझ्टेक:

 

 

प्लॅटिनमने बॉटल असलेल्या या बॉटलची किंमत ऐकून कोणीही अवाक होईल. २०१० मध्ये ३.५ मिलियन यु एस डॉलर्स इतकी किंमतीत विकल्या गेलेल्या या बॉटल मध्ये ६४०० हिरे आहेत आणि ही बॉटल सोन्याचा वर्ख असलेली आहे.

१०. इसाबेला – ईस्ले व्हिस्की:

 

 

पांढऱ्या सोन्याने बनवलेली या दारूची बॉटल ही ८५०० हिऱ्यांपासून बनलेली आहे. हॉंगकॉंग मध्ये झालेल्या एका लिलावात सहा लिटर दारूचा लिलाव हा ६.२८ मिलियन यु एस डॉलर्स इतक्या किमतीत झाला होता.

कित्येक दारूच्या बॉटल्स या समुद्राच्या खाली आजही दडून आहेत हे एक सर्वेक्षणात समोर आलं होतं. इंग्लिश खाडी मध्ये काही मालवाहतूक करणारं एक जहाज बुडाल्याने हे झालं असावं असं सांगितलं जातं.

ही जवळपास १०० वर्षांपूर्वी घडलेली घटना आहे. जवळपास १०० मीटर खोलीपर्यंत गेल्यावर हा साठा सापडला होता. थंड वातावरणामुळे या बॉटल्स चांगल्या राहिल्या असाव्यात असं संशोधक लोक सांगतात.

सर्वात महाग वस्तू म्हटल्यावर एखाद्या कारचं किंवा घराचं नाव आपल्या समोर नेहमी येतं. या आवश्यक वस्तूंपेक्षाही एखादं व्यसन जास्त किमतीचं असू शकते हे जगातील आठवं आश्चर्य आहे असं आपण म्हणू शकतो.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version