Site icon InMarathi

सरत्या वर्षाने कोरोना, मास्क, सॅनिटायझरसोबतच ‘या’ गोष्टीही दिल्या!

corona featured 2 inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

किती भयानक गेले २०२० साल! माणसे जवळ आली अन तितकीच दूर गेली. किती लोकांना कोरोना सारख्या साथीच्या रोगाने पछाडले. लहान मुले, तरुण, म्हातारी कोतारी या रोगाचे शिकार झाले.

कामधंदे बंद झाले. भूकमारीने कामगार, मजूर घरेदारे सोडून निघून गेली. लहान मुलांचा तोंडचा घास सुटला. रस्ते निर्मनुष्य झाले. मुंगीलाही वाट नसणाऱ्या रस्त्यावर माणसेच दिसेनाशी झाली.

दुकाने, बाजार, बँका, शाळा, महाविद्यालये, कार्यालये सगळीकडे शुकशुकाट झाला.

अत्यावश्यक सेवा, किराणा दुकाने, दवाखाने हे फक्त चालू होते. सर्वांना एक नवा दागिना मिळाला तो म्हणजे मास्क!अन् हाताला सैनिटायझर, हँडवाँश. माणसे एरवी घरात हातपाय न धुता जात होती पण आता स्वच्छ होऊनच घरात प्रवेश मिळू लागला.

 

 

‘सोशल डिस्टसिंग’ माणसे पाळू लागली. रेल्वे बंद, विमानसेवा बंद, बसेस बंद, प्रवास बंद झाला. माणसे जिथल्या तिथे अडकून पडली, कोणी मुलांबाळांपासून दूर तर कोणी आईवडिलांपासून!

सोशल वर्कर, डॉक्टर, नर्स, सिस्टर्स यांना श्वास घ्यायला फुरसत मिळेना. ऐन उन्हाळ्याचे दिवस व अंगावर कोरोना बायो सूट्स. ते अस्वस्थ होत, न प्यायला पाणी, न नैसर्गिक विधीला वेळ! कामामुळे, मानव सेवेमुळे त्यांना अन्नपाणीही आठवेना.

सीमेवर जवान अन् देशात हे सेवक शीर तळहातावर घेऊन लढत होते. बेकारीची तलवार लोकांवर येऊन पडली.कामधंदे बंद झाले. घरात चूल पेटेनाशी झाली, उधार उसनवार बंद झाली, कारखाने, उद्योग, सर्व व्यवहार ठप्प, थंड पडला.

मजूरांचे तांडेच्या तांडे आपल्या गावी परतू लागले पण बस,गाड्या बंद त्यामुळे मजल दर मजल करीत ते कसेबसे घरी पोचले तर घरी प्रवेश नव्हता.

 

 

काय त्या लोकांचे हाल झाले असतील! जातीयवाद, धर्मवाद यावरील चर्चा थंडावल्या अन कोरोना २०२० कसे नैराश्याने वर्ष आहे या गोष्टीला ऊत आला. पण खरं आहे हे?

एव्हढं वाईट होतं हे साल! हो नक्कीच, पण २०२० सालाने खूप गोष्टी शिकवल्या.

कोणताही खेळाडू, अभिनेता हे हिरो नाहीत तर कोविड योद्धे म्हणून काम करणारे डॉक्टर, नर्सेस, ब्रदर्स हे समाजाचे हिरो ठरले. मंदिर, मस्जिद, गुरुद्वारा, चर्च ही प्रार्थनास्थळे बंद झाली.

दर्शनासाठी रांगा बंद पण देव माणसात असतो हे तर या वर्षाने शिकवले. मंदिरातील देवाने डॉक्टर, नर्सेस, समाजसेवकांची रुपे घेतली. मानवसेवा हे व्रत स्विकारून गरीब श्रीमंतांची सेवा केली.

घरादाराचा त्याग करून सहा महिन्यांनी घरी परतले होते हे आपण वाचलंय. स्त्रिया, पुरूष, आजी, आबा, मुलेबाळे एकत्र राहू लागली. टुगेदरनेस म्हणजे काय हे सर्वांना समजू लागले.

भारतात लग्न समारंभात होणारी पैशाची आणि अन्नाची नासधूस कमी झाली. लग्न करताना घातलेले निर्बंध पाहून बऱ्याच लोकांनी कमी खर्चात साधेपणाने लग्न केल्याच्या घटना आपण ऐकल्या असतीलच!

काम सर्वांचे असते ही गोष्ट पुरूषांना समजली. कित्येक पुरुष स्वयंपाकघरात लक्ष घालू लागले. पत्नीला मदतीचा हात देऊ लागले. घराची जबाबदारी दोघांची असते ही गोष्ट सर्वांना लक्षात आली.

जंकफूड, हाँटेलिंगला आळा बसला. घरी नवनवीन पदार्थ बनू लागले. घरच्या अन्नाची चव, ताकद, स्वच्छता ह्या गोष्टी कळू लागल्या. वर्क फाम होम या बरोबर सुरु होतेच.

 

 

शाळा घरातून चालू झाल्या,डब्याचा त्रास संपला,शिक्षकांचा त्रास समजू लागला.या बरोबर खूप तांत्रिक गोष्टी शिकायला मिळू लागल्

कामवाली बाई बंद झाली, स्वावलंबनाचे धडे गिरवायला मिळाले. आज कपडे मी धुणार, आज भांडी मी घासणार अशी कामाची वाटणी होऊ लागली. सहकार्याचे धडे मिळू लागले.

दारु, गुटखा, तंबाखूची दुकाने बंद झाल्यामुळे व्यसनी लोकांची व्यसने आटोक्यात येण्याची चिन्हे दिसू लागली. बिडी, सिगारेट बंद झाली. रस्त्यावर घातल्या जाणाऱ्या पिचकाऱ्यांच्या रांगोळ्या बंद झाल्या.

निसर्ग स्वच्छ सुंदर झाला. खुलून दिसू लागला. गंगेचा तळ दिसेल इतकी गंगा नितळ, निर्मळ झाली. जलचर, वनचर प्राणी सुखावले. स्वतंत्र विहार करु लागले.

बरं, इतकंच दिलं का या वर्षाने?

या वर्षी अजून एक वेगळी गोष्ट झाली. अमेरिकन सरकारने समलैंगिक विवाहाला मान्यता दिली. यापूर्वी हे संबंध जगात हीन समजले जात होते. पण या संबंधांना कायदेशीर मान्यता याच वर्षी मिळाली.

गाड्या, मोटारी बंद झाल्यामुळे वातावरणात होणारे प्रदूषण कमी झाले. त्याचा परिणाम म्हणून हवेत असणाऱ्या कार्बन डाय ऑक्साईडचे प्रमाण कमी झाले. ओझोनचा थर कमी झाला होता तो वाढला.

 

 

त्याशिवाय, लोकांमध्ये असणाऱ्या छुप्या गुणांची नवी ओळख नव्याने झाली. कितीतरी लोक उत्तम स्वयंपाक करु शकतात…उत्तम कलाकार आहेत हे याच वेळी समजले.

घरात असलेला वेळ सत्कारणी लावण्यासाठी विविध कला सादर करायची कल्पना अंमलात आणली. बाजारपेठे अभावी पडून राहीलेल्या उन्हाळी फळांचे पल्प बनवणे, विविध पदार्थ टिकाऊ पद्धतीने बनवणे हे पण लोक शिकले.

मानसिक आरोग्य हे सर्वात जास्त महत्त्वाचे आहे ही जाणीव पण याच वर्षाने दिली. कितीतरी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी घरातून काम करण्याची मुभा दिली.

 

 

इतकंच नव्हे तर फ्रान्स, केनिया या देशांनी प्राण्यांच्या वापरावर बंदी आणली. सर्कशीवर बंदी आणली. केनियामध्ये हत्तींची संख्या १४० ने वाढली तर सिंहाची संख्येत २५% वाढ झाली.

लोक एकमेकांना मदत करायला सरसावून आले. बेंगळुरू मध्ये एका कामवाल्या बाईंना घरमालकाने स्वतःच्या व्यवसाय उभारणीसाठी मदत केली.

भले, कोविडने जगाच्या कारभारात प्रचंड उलथापालथ केली…उद्योगधंदे विचित्र वळणावर आणले, पण माणसाला माणूस म्हणून पुन्हा एकदा जमिनीवर आणून ठेवलं.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version