Site icon InMarathi

ज्या लसीमुळे कोरोनाचं संकट दूर होणार, ती लस शरीरात नेमकी काय जादू करते? वाचा

vaccine inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

“लस येणार आहे…” या विश्वासावर आपण सगळे कोरोनाकाळात बंधन पाळत जगत आहोत. ब्रिटनमधून सुरू झालेली कोरोनाची ‘दुसरी लाट’ हे धोका अजून टळलेला नाहीये याचं सूचक आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर या गोष्टीची घेतलेली दखल ब्रिटनसोबत सर्व मोठ्या देशांनी थांबवलेली विमानसेवा यावरून लक्षात येईल.

एकीकडे जगभरात कोरोना लसीचं वाटप कसं व्हावं ? याचं प्रशिक्षण सुरू असतांना ही ‘दुसरी लाट’ सर्वांच्या चिंतेचं कारण ठरत आहे. ‘आपलं आरोग्य, आपली जबाबदारी’ हे आता सर्वांनीच मानलं आहे. एक लस आणि तो डोस आपलं आरोग्य कसं चांगलं ठेवू शकते ? हा प्रश्न सर्वांना पडणं सहाजिकच आहे.

‘लस आपल्या शरीरात नेमका काय बदल करणार?’ या प्रश्नाचं उत्तर काही दिवसांपूर्वी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) जाहीर केलं आहे.

 

 

अमेरिकेने संबंध तोडल्यावर, काही चुकलेल्या अनुमानांमुळे जगभरातून इतक्या टीकेचा सामना करूनही या संस्थेने वर्षभर जे काम केलं आहे त्याला दाद द्यायला पाहिजे. लस आणि त्याच्या अंतर्गत प्रवासाबद्दल WHO ने दिलेली माहिती जाणून घेऊयात.

रोगप्रतिकारक शक्ती ही आपल्या प्रत्येकामध्ये असते. शरीरात प्रवेश केलेल्या किंवा करू पाहणाऱ्या कोणत्याही ‘पॅथॉजेन’ म्हणजेच व्हायरसचा प्रतिकार शरीराने करणं ही प्राथमिक अपेक्षा आहे.

आपण काही दिवसांपासून ‘अँटिजेन टेस्ट’ हे नाव ऐकलं असेल. अँटिजेन हा पॅथॉजनचा एक भाग असतो. कित्येक अँटिजेन एकत्र येऊन पॅथॉजन तयार होतो. या अँटिजेनला मारण्यासाठी आपल्या शरीरात अँटीबॉडी तयार होणं आवश्यक आहे.

अँटिबॉडी या एखाद्या सैनिकाप्रमाणे अँटिजेनचा प्रतिकार करत असतात. अँटिजेनचा शरीरावर हल्ला झाल्यावर अँटीबॉडी किती लवकर प्रतिकार करतात यावर तुमचा कोरोनातून बाहेर पडण्याचा वेळ आणि शक्यता ठरत असते.

कोरोनाची लस म्हणजे या अँटीजनचा डोस असं सोप्या शब्दात म्हणता येईल. रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अत्यावश्यक अँटीजन हे लस मधून प्रत्येक व्यक्तीला मिळणार आहे. एक तर ही लस अँटीजनने बनलेली असेल किंवा ते तयार करणाऱ्या घटकांनी बनलेली असेल. लस ही प्रत्यक्षात कोरोनाला मारणारी नसेल तर ते साध्य करण्यासाठी आपल्या शरीराला मदत करणारी असेल.

 

 

कोरोना लस तयार करणाऱ्या प्रत्येक कंपनीने किती डोस घेणं आवश्यक आहे हे सांगितलं आहे. ज्या लस दोन वेळेस घ्यायच्या आहेत त्यांच्यामध्ये काही आठवडे किंवा महिन्याचं अंतर असणं अपेक्षित आहे. जास्त काळासाठी जगणाऱ्या अँटिबॉडीची निर्मिती शरीरात होण्यासाठी हे अंतर आवश्यक आहे असं संबंधित तज्ञांनी सांगितलं आहे.

मेमरी सेल्सची निर्मिती होण्यास सुद्धा लस मदत करणार आहे जेणेकरून पुन्हा व्हायरसचा हल्ला झाला तर आपल्या शरीराला त्याची जाणीव लगेच होईल.

लस कोणी घ्यावी?

 

हे ही वाचा – दवाखान्याचा खर्च कमी करतात जेनेरिक औषधं! जाणून घ्या त्यांची ‘खरी’ किंमत!

कोरोना लस आली म्हणजे ती प्रत्येकाने घ्यावी असं नाहीये. ज्या लोकांची रोग प्रतिकारक शक्ती ही इतर कोणता रोग असल्याने कमी झाली आहे, ज्यांना सतत कोणत्या तरी गोष्टीची ऍलर्जी आहे त्यांना काही लस घेता येणार नाही.

‘हर्ड इम्युनिटी’ हा एक प्रकार आहे ज्यामध्ये जितक्या जास्त लोकांनी लस घेतली तितका त्याचा फायदा इतरांना सुद्धा होणार आहे. याचं कारण हे, की जे लोक लस घेऊ शकते नाहीत त्यांच्यापर्यंत व्हायरस पोहोचणार नाही. त्यामुळे, एका घरातील चार पैकी तीन व्यक्तींनी लस घेतली असेल आणि चौथी व्यक्ती लस घेऊ शकत नसेल तर घाबरायचं काही कारण नाहीये.

लस घेतल्याने फक्त तुमचंच नाही, तर तुमच्या संपर्कात येणाऱ्या लोकांचं सुद्धा संरक्षण होणार आहे. त्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांनी लस घ्यावी असं आवाहन वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने केलं आहे.

 

 

कोरोना हा आत्तापर्यंत आलेल्या साथीच्या रोगांमध्ये सर्वात जास्त नुकसान करणारा आहे. या आधी टिटेनस, पोलिओ, मेनिन्जाईटीस सारख्या रोगांनी सुद्धा WHO ला आपलं पूर्ण लक्ष त्या रोगाकडे देण्यास भाग पाडले होते आणि आपल्या डॉक्टर्स, वैज्ञानिक मंडळींनी या रोगांवर मात करण्यात यश मिळवलं होतं.

१९०० मध्ये दाखल झालेल्या पोलिओने जगभरात उच्छाद मांडला होता आणि त्यावर पहिली लस ही १९५० मध्ये शोधण्यात आली होती. १९८० पर्यंत सतत केलेल्या प्रयत्नांमुळे पोलिओचा प्रसार थांबवण्यात यश आलं होतं. २१ व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत पोलिओचा समूळ नाश झाला आहे ही समाधानकारक बाब आहे.

 

 

कोरोना लसीच्या तीन प्रकारांवर सध्या संशोधन सुरू आहे. ज्यामध्ये mRNA ही लस ही आपल्या शरीराला प्रोटीन तयार करण्याची सूचना देते. ‘प्रोटीन सबयुनिट’ ही लस मेमरी सेल्स तयार होण्यास मदत करते.

तिसरा प्रकार आगे ‘व्हेक्टर लस’ ज्यामध्ये शरीरात जिवाणू सोडला जातो आणि तो शरीराला T-lymphocytes आणि B-lymphocytes ची निर्मिती करण्यास मदत करेल आणि भविष्यात सुद्धा आपला कोरोना पासून बचाव करेल.

कोरोना आणि आपल्या या लढाईत विजय आपलाच होणार हे नक्की आहे. आता फक्त वाट आहे हे प्रत्यक्षात घडण्याची आणि पुन्हा एकदा ‘मास्क’ शिवाय जगण्याची परवानगी मिळण्याची… तो दिवस लवकरच येईल अशी आशा करूया.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Exit mobile version