' गावच्या जत्रेतील खोपटं ते अब्जावधींची उलाढाल. एका महिलेची प्रेरणादायी गोष्ट! – InMarathi

गावच्या जत्रेतील खोपटं ते अब्जावधींची उलाढाल. एका महिलेची प्रेरणादायी गोष्ट!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

मध्यंतरी बर्गर किंग या प्रसिद्ध बर्गर ब्रँड चा आयपीओ बाजारात आला. लोकांनी बर्गर किंग चा बर्गर किती खाल्ला माहीत नाही.पण त्याचा आयपीओ घ्यायला मात्र झुंबड उडाली.

१०० च्या आसपास असलेला बर्गर किंग काल पर्यंत १८० च्या घरात होता.

यावरून बर्गर किंगचा असलेला परफॉर्मन्स दिसून येतो आणि पब्लिकची त्याला असलेली पसंती.

 

burger king inmarathi

 

आता याच बर्गर किंगला बर्गर साठी बन सप्लाय करणाऱ्या क्रेमिका फूड स्पेशालिस्ट कंपनीचा तब्बल ५५० करोड चा आयपीओ बाजारात यायच्या प्रोसेस मध्ये आहे.

आता तुम्ही म्हणाल की यात काय विशेष?

विशेष हे आहे की ही क्रेमिका कंपनी ही बर्गर किंग सारखी परदेशी कंपनी नसून देशी कंपनी आहे.

आणि या क्रेमिका कंपनीच्या मालकीण रजनी बेक्टर्स यांनी आपल्या या कंपनीची सुरवात घरातून बिस्किटे तयार करून विकण्यापासून केला होता.

तर आज याच क्रेमिका कंपनीच्या मालकीण रजनी बेक्टर्स यांना आपण आज भेटणार आहोत. मानवी आयुष्य म्हणजे चढ उतार आला. आर्थिक, सामाजिक, मानसिक आणि वगैरे वगैरे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

त्यात जेव्हा प्रॉब्लेम फेस करायची वेळ येते तेव्हा भले भले त्याच्यासमोर गुडघे टेकवतात. तर त्याच्या एकदम विरुद्ध वागणारे पण असतात जे या प्रॉब्लेम ला आपल्या मजबुतीचे माध्यम बनवतात.

त्यापैकीच एक आहेत रजनी बेक्टर्स. रजनी यांना सुरवातीलाच फाळणीचे चटके सहन करावे लागले होते. कराची मध्ये जन्मलेल्या रजनी फाळणी नंतर आपलं सगळं मागे सोडून भारतात स्थायिक झाले.

 

rajani bector inmarathi

 

भारतात आल्या नंतर रेफ्युजी कॅम्प मधून त्यांचा परिवार दिल्लीला स्थायिक झाले.

१९५७ मध्ये वयाच्या केवळ १७ व्या वर्षी त्यांचा विवाह लुधियाना स्थित एका उद्योगपतीच्या घरी झाला. त्यापूर्वी त्यांनी आपलं पदवी पर्यंतच शिक्षण पूर्ण केले होते.

आपल्या पाक कृतीच्या आवडीपोटी त्यांनी पंजाब ऍग्रीकल्चर युनिव्हर्सिटी मधून बेकिंगचा कोर्स पूर्ण केला.

शिक्षणानंतर घरातच त्या बिस्किटे, आईस्क्रीम आणि केक सारखे पदार्थ बनवू लागल्या. आणि घरी येणाऱ्या आपल्या पाहुण्यांना त्या पाहुनचारात ते देत असत.

अल्पवधीतच त्यांचे हे केक आणि आईस्क्रीम त्यांच्या भागात प्रसिद्ध झाले आणि आपल्या कलेला उत्पन्नाचे साधन बनवण्यासाठी रजनी त्यांचे पदार्थ जत्रेत स्टॉल लावून विकु लागल्या.

विशेष म्हणजे त्यांचे केक आणि आईस्क्रीम इथे सुद्धा लोकप्रिय झाले आणि आलेली ही वेळ साधून रजनी यांनी दिल्ली मधून ३०० रुपयांचे गरजेची साधने विकत आणली आणि घरीच छोटी फॅक्टरी बसवली.

आणि त्यांच्या किचन मधुनच त्यांचा बिझनेस सुरू झाला!

रजनी यांनी आपल्या या छोटेखानी व्यवसायाची सुरवात प्रोफेशनल पद्धतीने केला नव्हता. त्या कमीत कमी किमतीमध्ये जास्तीत जास्त चांगली क्वालिटी द्यायचा प्रयत्न करत असे.

त्यामुळे बहुतेक वेळा त्यांना नुकसान झेलावे लागत होते. पत्नीची सुरू असलेली धडपड पाहता रजनी यांच्या पतींनी त्यांच्या या बिझनेसला एक मूर्त स्वरूप दिले.

rajani bector 2 inmarathi

 

१९७८ मध्ये रजनी यांनी २०,००० रुपयांची गुंतवणूक करून घरातच असलेल्या गॅरेज मध्ये हव्या असलेल्या मशिनरी आणि साधने लावून आपल्या बिझनेसचा पाया घातला.

आणि बघता बघता केक आणि आईस्क्रीम साठी प्रसिद्ध असलेल्या रजनी यांच्या या गॅरेज फॅक्टरी ला ऑर्डर वर ऑर्डर मिळत गेल्या.

रजनी यांचे प्रोडक्ट हे त्यांच्या ‘क्रीम’ मुळे प्रसिद्ध होते.म्हणून कंपनीचे नाव ठरले ‘क्रेमिका’. आईस्क्रीम च्या अपार यशानंतर रजनी यांनी आपल्या लुधियाना स्थित खानदानी प्रॉपर्टी मध्ये नवीन फॅक्टरी लावायचे काम हाती घेतले.

आणि इथे तयार होणारे प्रोडक्ट होते ब्रेड आणि बिस्किटे! पुन्हा दिल्लीवरून मशिनरी मागवून त्यांनी आपली नवीन फॅक्टरी इथे सेटअप केली.

ऑपरेशन ब्लु स्टार नंतर नव्वदच्या दशकात पंजाब मधली स्थिती चिघळली होती. दहशतवाद वाढला होता.

 

operation blue star

 

याच काळात रजनी यांच्या पतींचा बिझनेस खालावला. असलेल्या बिझनेसचा बिस्तरा गुंडाळून त्यांच्या पतींनी क्रिमिका जॉईन केली.

याच काळात क्रिमिकाची वार्षिक उलाढाल ही ५ करोडच्या पार गेली.

नंतर रजनी यांच्या तिन्ही मुलांनी आपलं शिक्षण पूर्ण झाल्या नंतर क्रिमिका जॉईन करून आपलं त्यात योगदान दिले.

१९९५ पर्यंत क्रिमिकानी आपला टर्नओव्हर २० करोड एवढा वाढवला. उदार आर्थिक धोरण स्वीकारल्या नंतर इतर इंडस्ट्री सोबत खाद्यपदार्थांची इंडस्ट्री सुद्धा भारतात येऊ लागले.

१९९५ साली मॅकडोनल्ड भारतात आली आणि क्रिमिका सोबत रजनी यांचे भाग्य उजळले, जगजाहीर आहे मॅकडोनल्डने गुजरात मधल्या बटाटा पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचे दिवस रातोरात बदलले होते.

मॅकडोनाल्डला आपल्या प्रोडक्ट साठी लोकल सप्लायर हवे होते. क्रिमिका सोबत त्यांनी ब्रेड आणि टोमॅटो सॉस साठी करार केला.

 

cremica inmarathi

 

आज देशभरात मॅकडोनाल्डच्या विकल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये ब्रेड, बन आणि सॉस हे क्रिमिकाचे आहेत!

सॉस, बन, ब्रेड यासारखे क्रिमिका एकूण १८ प्रोडक्ट तयार करते आणि तब्बल १५ ब्रँडना ते याची विक्री आणि सप्लाय करतात.

क्रिमिकाचे मॅकडोनाल्ड सोबत इतर प्रमुख ग्राहक म्हणजे जेट एयरवेज, भारतीय रेल्वे, बिग बाजार, सुपर बाजार, विशाल मेगामार्ट, रिलायन्स, पिझ्झा हट, सीसीडी,पॉप जोन्स या कंपन्या आहेत.

२००५ साली रजनी बेक्टर यांना तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या हस्ते आऊटस्टँडिंग बिझनेस अवॉर्ड दिला गेला. आजच्या घडीला क्रिमिकाचे पंजाब सोबत महाराष्ट्रात खोपोली आणि नोएडा मध्ये प्लांट आहेत.

कंपनीचा एकूण टर्न ओव्हर हा ७०० करोडच्या पार आहे आणि क्रिमिका मध्ये आज तब्बल ४००० कर्मचारी कार्यरत आहेत.

रजनी बेक्टर यांची क्रिमिका त्याच्या ५५० करोड च्या आयपीओ मुळे चर्चेत आली आहे. याआधी २०१८ मध्ये त्यांनी आयपीओचा विचार केला होता. पण काही कारणास्तव त्यांना तो विचार सोडून द्यावा लागला होता.

 

bector inmarathi

 

आयपीओच्या माध्यमातून येणाऱ्या पैशातून कंपनी त्यांच्या पंजाब स्थित राजपूरा येथील मॅन्युफॅक्चरिंग प्लांटचा विस्तार करणार आहे. क्रिमिका चा आयपीओ पुढच्या वर्षी जानेवारी किंवा फेब्रुवारी मध्ये येऊ शकतो.

तर, फाळणीची झळ मागे सोडून घरातून सुरू केलेल्या एका छोट्या व्यवसायाला मोठे स्वरूप देण्यापासून त्याचा आयपीओ बाजारात आणण्यापर्यंत क्रिमिका आणि रजनी बेक्टर यांचा प्रवास नव उद्योजकांना प्रेरणादायी आहे हे नक्की!

फाळणीची झळ सोसत सुरू केलेल्या बिझनेसचा IPO पर्यंतचा प्रवास!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?