Site icon InMarathi

उंदरांचा त्रास झटक्यात कमी करण्याचे ९ घरगुती, पण जालीम उपाय!

undir inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

उंदीर मामा घरात शिरले की निघण्याचं काही नाव घेत नाहीत. त्यांची पिलावळ, नातवंड सगळ्या पिढ्या आपल्या घरात धुमाकूळ घालू लागतात. या उंदरांमुळे रेबीज, हंता व्हायरस, प्लेग, विविध प्रकारच्या ऊवा, जीव जंतू आणि रोगराई घरात येते.

 

 

उंदरांपासून आपल्या व्यतिरिक्त लहान बाळांना फार धोका असतो. आता हिवाळा आला आहे, अशा वेळी बाहेरील उंदीर, घुस हे प्राणी हमखास उबदार जागा शोधण्यासाठी आपल्या घरात उंदीर घुसखोरी करतात. आपण वेळीच सावध झालो नाही तर भरपूर नुकसान होण्याची दाट शक्यता असते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

तुमच्याही घरात उंदीर येऊ नयेत असं वाटतं असेल किंवा आले असतील, तर खाली दिलेले उपाय नक्की करा.

 

१) पेपरमिंटचे तेल –

 

पेपरमिंटच्या तेलाचा वास उंदरांना अत्यंत अप्रिय आहे. कापसाचे बोळे तयार करा आणि ते पेपरमिंटच्या तेलात बुडवून घ्या. घरात असलेली छिद्र, दिवाण, कोठ्यांच्या मागे, स्टोअर , कपाटाच्या मागे जिथे कुठे अडगळीची जागा असेल तिथे सगळीकडे हे बोळे ठेऊन द्या.

१-२ महिने हा उपाय करून बघा. सगळे उंदीर पळून जातील व पेपेरमिंटचा ताजतवाना करणारा सुगंध घरात दरवळेल.

 

२) इन्स्टंट बटाट्याची पावडर – बाजारात इन्स्टंट बटाट्याची पावडर मिळते. सूपच्या पावडरमध्ये ज्याप्रकारे भाज्या असतात तशीच  पावडर असते.

ही पावडर सगळ्याच घरातील कोपऱ्यांमध्ये टाका. उंदरांनी ती खायला हवी. यानंतर, त्यातील बटाट्याची कण त्यांच्या पोटात फुगतील आणि ते मरतील.

 

३) कांदे –

 

 

आपल्याला जसा कांद्याचा तिखटपणा आवडत नाही, त्याचप्रकारे उंदरांना देखील तो खटकतो. कांद्याच्या वासाने उंदीर त्या जागेवर फिरकत सुद्धा नाहीत.

कांदे अर्धे अर्धे कापून सगळ्या कोपर्यात ठेऊन द्या आणि मग पुढील काम कांद्याचा वासच करेल, पण तुमच्या घरात जर पाळीव प्राणी असतील तर त्यांना या  तुकड्यांपासून सुरक्षित ठेवले पाहिजे.

४) कोको पावडर आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिस –

 

 

कोको पावडर आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे मिश्रण करा. त्याचे छोटे छोटे गोळे करून सगळ्या फटींमध्ये आणि छिद्रांमध्ये हे गोळे ठेऊन द्या.

चॉकलेटच्या वासाने उंदीर हे मिश्रण नक्की खातील आणि वेड्यासारखे पाण्यासाठी घराबाहेर पळून जातील.

५) मिरची पावडर – वाळलेल्या मिरच्या जरा जाडसर वाटून ती पावडर सगळी कडे टाकून द्या. मिरचीच्या वासाने सगळे उंदीर पळून जातील. हा पारंपरिक उपाय अगदी कमी पैशात पण करता येऊ शकतो.

 

६) लसूण –

 

 

भरपूर लसूण वाटून घ्या. वाटलेल्या लसणाच्या पेस्टला थोड्या पाण्यात मिसळून हे पाणी घरात फवारा. घरच्या घरीच हे जालीम औषध तयार करून आपण उंदरांपासून सुटका मिळवू शकतो.

७) लवंग किंवा लवंग तेल –

 

 

एका पातळ कापडात अर्धा मूठ लवंग बांधून त्याच्या छोट्या छोट्या पुरचुंड्या तयार करुन घ्या व उंदराच्या बिळात किंवा उंदरांचा वावर असलेल्या जागांवर ठेऊन द्या. उंदरांना लवंगेचा वास अजिबातच आवडत नाही. ते लगेच पळून जातील.

८) अमोनिया – उंदरांना उग्र वासामुळे त्रास होतो. त्यामुळे छोट्या छोट्या वाट्यांमध्ये अमोनिया घेऊन बिळांजवळ ठेऊन द्या. याने सगळेच उंदीर कायमचे पळून जातील.

 

९) उंदीर पिंजरा –

 

 

उंदीर पकडण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचा पिंजरा बाजारात मिळतो. पिंजऱ्यात एखादा भजा, चतकोर पोळीचा भरपूर तेल किंवा तूप लावलेला तुकडा ठेऊन द्या. तेलाच्या वासाने उंदीर आत शिरेल, पण त्याला बाहेर निघता येणार नाही.

घरातील सगळे खाच खळगे, फटी, छिद्र शोधून ते बुजवून टाका. जेणेकरून हिवाळ्यात घरात घुसू पाहणारे उंदीर घरात घुसणार नाही.

इतके सगळे उपाय करूनही उंदरांचा त्रास बंद होत नसेल, तर लगेच घरात पेस्ट कंट्रोल करून घ्या.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version