तात्या टोपेंनी सांगितल्याने ती इंग्रजांसामोर नाचली, पैशांसाठी नव्हे तर..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
अजीजन बाई – हे नाव फार कमी जणांनी ऐकलं असेल. १८५७ च्या क्रांती मध्ये महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या कानपुरच्या या वीर महिलेचा इतिहासाचा विसर पडला आहे असं म्हणावं लागेल.
भारतीय इतिहास इतका गौरवशाली आणि मोठा आहे की प्रत्येक व्यक्तीबद्दल माहीत असणे हे सुद्धा शक्य नाहीये. काही वर्षांपासून इतिहासात योगदान देणाऱ्या व्यक्तींबद्दल बायोपिक तयार होत असल्याने तरी आपल्या ज्ञानात बरीच भर पडली आहे असं म्हणावं लागेल.
अजीजन बाई हे एक असंच व्यक्तिमत्व आहे ज्यांनी कानपूरच्या स्वातंत्र्यात अनन्य साधारण योगदान दिलं आहे.
नानासाहेब आणि तात्या टोपे यांच्या नेतृत्वात कानपुरच्या स्वातंत्र्याचा लढा सुरू होता. या दोघांनी मिळून इंग्रजांना त्या भागातून पूर्णपणे बाहेर काढलं होतं.
कानपुर इंग्रजांच्या तावडीतून सोडवल्यानंतर एक विजयी मिरवणूक काढण्यात आली होती. अजीजन बाई या त्या मिरवणुकीच्या केंद्रस्थानी होत्या. काय कारण असेल ?
कानपुर च्या मूलगंज मोहल्ला या भागात राहणाऱ्या अजीजन बाई या एक नृत्यांगना होत्या. इंग्रज शिपायांचं नृत्याद्वारे मनोरंजन करायच्या.
इंग्रजांकडे त्या काम करत होत्या; पण, मनाने त्या भारतीय होत्या आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सुद्धा आपला सहभाग नोंदवण्यासाठी उत्सुक होत्या.
नानासाहेब पेशवे आणि तात्या टोपे यांच्यामुळे प्रभावित होऊनच अजीजन बाई यांनी स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली होती.
इतिहासात अशी नोंद आहे की, अजीजन बाई या अश्या पहिल्या नृत्यांगना होत्या ज्यांनी घोडेस्वारी आणि हत्यार चालवण्याचं प्रशिक्षण घेतलं होतं. इतकंच नाही तर इतर वैश्यांना सुद्धा त्यांनी तलवारबाजीचं प्रशिक्षण दिलं होतं.
इंग्रजांच्या एका वरिष्ठ पोलीस अधिकारी मेजर जनरल विलर यांना पकडण्याचा प्लॅन नानासाहेब यांनी आखला होता. हे कार्य यशस्वी करण्यासाठी अजीजन बाई या नियोजित ठिकाणी मदत करण्यासाठी एक दिवस आधीच पोहोचल्या होत्या.
अजीजन बाई यांच्या नेतृत्वाखाली ‘मस्तानी मंडळी’ ही ४०० सैन्याची तुकडी तयार करण्यात आली होती. या सैन्याच्या तुकडीतील महिलांचं काम हे क्रांतिकारी लोकांना हत्यार, दारुगोळा, खाद्यसमुग्री पुरवणे हे होतं.
उद्देश हाच की, क्रांतीची ज्योत कधीच शांत होऊ नये आणि इंग्रजांनी लवकरात लवकर भारताबाहेर काढावे.
तात्यासाहेब यांनी अजीजन बाई यांना होळीच्या दोन दिवस आधी बघितलं जेव्हा ते काही इंग्रज अधिकाऱ्यांवर नजर ठेवून होते. हे अधिकारी अजीजन बाई यांचं गाणं बघायला त्या भागात आले होते.
दोन दिवसांनी होळीच्या उत्सवासाठी येण्याचं तात्या यांनी अजीजन बाई यांना निमंत्रण दिलं आणि ते त्यांनी मान्य केलं. होळीच्या संध्याकाळी बिथुर येथे नृत्य सादर केलं.
मानधन देण्यासाठी तात्या टोपे पुढे जात असताना अजीजन बाई यांनी मानधन न देता देशसेवेची संधी देण्याची विनंती केली.
अजीजन बाई यांना कित्येक इंग्रज अधिकाऱ्यांचं वेळापत्रक माहीत असायचं.
नानासाहेब आणि तात्या टोपे यांनी अजीजन बाई यांना इंग्रज अधिकाऱ्यांवर नजर ठेवायची आणि माहिती पुरवण्याची कामगिरी सोपवली होती.
अजीजन बाई यांनी ही जबाबदारी पार पाडली आणि इंग्रज अधिकाऱ्यांच्या येण्या-जाण्याची वेळ, रस्ता, क्रांतिकारी लोकांना मारण्याचे मनसुबे अशी महत्वपूर्ण माहिती त्यांनी तात्या टोपे यांना दिली.
मूलगंज भागात अजीजन बाई यांनी काही ब्रिटिश ऑफिसर्सला बोलावलं होतं क्रांतिकारी हे तिथे आधीच लपून बसले होते. होळीच्या दिवशी क्रांतिकारी लोकांनी मूलगंजच्या रस्त्यावर इंग्रजांच्या रक्ताने होळी खेळली होती.
कमी वेळात आवश्यक ती माहिती क्रांतिकारी लोकांपर्यंत पोहोचवणाऱ्या अजीजन बाई या काही दिवसात ‘बिजली’ या टोपण नावाने ओळखल्या जाऊ लागल्या.
कानपुर वर आपल्या सैन्याने मिळवलेला हा विजय फार काळ टिकला नाही. इंग्रजांनी सैन्य कित्येक पटीने वाढवलं आणि पुन्हा कानपुर वर हल्ला केला होता.
कित्येक लोकांची रवानगी जेल मध्ये झाली आणि या दरम्यान अजीजन बाई यांना सुद्धा अटक करण्यात आली होती. अजीजन बाई यांच्या सौन्दर्याने मोहित झालेल्या मेजर हॅवलोक यांनी अजीजन बाई समोर दोन पर्याय ठेवले होते :
१. अजीजन बाई यांनी त्यांच्या फितुरी बद्दल क्षमा मागावी, मग त्यांना सोडण्यात येईल.
२. माझ्याशी लग्न कर. अन्यथा, तुला मृत्युदंड देण्यात येईल.
हे दोन्ही पर्याय ऐकून अजीजन बाई ने हॅवलोक यांना फक्त एक स्माईल दिली. या हास्याचं वर्णन स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी या शब्दात केलं आहे :
“अजीजन बाईंच्या हास्यात एक वेगळीच ताकत होती. थकलेल्या सैन्याचा थकवा दूर करण्याची क्षमता त्या हास्यात होती. तर दुसरीकडे हॅवलोकला काहीच न बोलता एक चपराक देण्याची ताकत त्या हास्यात होती.”
अजीजन बाई यांनी अर्थातच दुसरा पर्याय निवडला. हॅवलोक ने अजीजन बाई यांची गोळी घालून हत्या केली गेली.
आपल्या देशासाठी हसत हसत प्राण देणाऱ्या क्रांतिकारी इतकंच अजीजन बाई यांचं कार्य हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या आयुष्याची सुद्धा पर्वा न करणाऱ्या अजीजन बाई या त्यांच्या कर्तृत्वाने क्रांतिकारी कार्याला फार मोलाची मदत झाली होती.
अजीजन बाई यांचं बलिदान व्यर्थ गेलं नाही. त्यांच्या कार्याची माहिती पूर्ण भारतात एखाद्या वणव्या सारखी पसरली आणि कित्येक लोकांनी आपला स्वातंत्र्य लढ्यात सहभाग नोंदवला होतो.
१० मे १८५७ हा या क्रांतिकारी आंदोलनाचा सर्वात महत्वाचा दिवस मानला जातो. अजीजन बाई यांना याच दिवशी जेल मध्ये टाकण्यात आलं होतं.
मेरठ हे शहर हे हा सगळा थरार अनुभवत होते. एका तमासगीरला गुप्तहेर म्हणून नेमणाऱ्या तात्या टोपे यांच्या कार्याला आणि अजीजन बाई यांना त्यांच्या देशसेवेच्या भावनेला विनम्र अभिवादन.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.