Site icon InMarathi

छोट्या हॉटेलमध्ये बनवण्यात आलेल्या या चविष्ट पदार्थाच्या जन्माची कथा, वाचा!

butter-chicken-Inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

मांसाहारी लोकांना भुरळ घालणाऱ्या या पदार्थाचा जन्म झालाय पाकिस्तानच्या ढाब्यावर!

प्रत्येक राज्याची एक खासियत असते, एखादं ठिकाण असतं, ते राज्य त्या कारणानं जगभरातील लोकांना आकर्षित करत असतं. एखादा पदार्थ असतो ज्याची चव, खासियत खवैय्यांना भुरळ घालत असते. शाकाहारी.. मांसाहारी हा ज्याच्या त्याच्या आवडीचा भाग!!

खूपदा आपण पाहतो, शाकाहारी लोक मांसाहारी खवैय्यांना नांवे ठेवतात तर मांसाहारी लोक शाकाहारी लोकांना चिडवतात.

 

 

कितीतरी शाकाहारी पदार्थ इतके चविष्ट असतात की, मांसाहारी पदार्थांची चव पण विसरता येईल. तर कधी कधी काही मांसाहारी पदार्थ इतके चवदार आणि चटकदार असतात की शाकाहारी पदार्थ आठवणारही नाहीत.

काही काही पदार्थ आपल्या उत्तम चवीमुळे जगप्रसिद्ध झाले आहेत. त्यात पण नवे प्रयोग करत आधुनिक बल्लवाचार्य लोकांनी अजूनच उत्तम चवीचं नवं दालनच खवैय्यांना उपलब्ध करून दिलं आहे.

काही चवी पारंपरिक असतात..काही सुधारणा करत आलेल्या. काही पदार्थ पहाता क्षणी भुरळ पाडतात. काही चव लागली की मग. काही पदार्थ अपघाताने तयार झालेले तर काही जाणीवपूर्वक काळजीपूर्वक तयार केलेले.

अशा अनेक जगप्रसिद्ध पदार्थांपैकी एक आहे बटर चिकन! ज्यांनी हे खाल्ले आहे त्यांच्या तोंडाला पाणी सुटले असेल नांव वाचून! पण जे खात नाहीत त्यांना फक्त वाचून सोडून द्यावं वाटेल.

कारण जो पदार्थ चाखलाच नाही त्याची स्तुती काय..निंदा काय.. त्यांना सारखीच.पण ज्यांनी ही डिश चाखली आहे त्यांच्या डोळ्यात लगेच आहाऽऽ चा फील येतो.

 

 

तुम्हाला माहिती आहे का? हे बटर चिकन मूळचा भारतात तयार केला गेलेला पदार्थ आहे. या रंगतदार रेसिपीची रंगतदार कहाणी आज तुम्हा सर्वांसाठी!!!

पेशावर.. फाळणीनंतर पाकिस्तानात गेलेलं गांव. या पंजाबमध्ये असणाऱ्या गावात मुखेदा ढाबा हा ढाबा होता. या ढाब्यावर कुंदनलाल गुजराल नांवाचा माणूस काम करत होता.

पुढं काही कारणानी हा ढाबा विकावा लागला. मालकानं हा ढाबा दुसऱ्या कुणालाही न विकता आपला कामगार कुंदनलाल गुजराल याला विकला. कुंदनलालनी त्याचं नांव बलललं.

मुखेदा ढाबा आता मोतीमहल नांवाने ओळखला जाऊ लागला. या ढाब्याची खासियत म्हणजे तंदुरी चिकन..हे चिकन बनवताना थोडे चिकनचे तुकडे उरत. मग ते उरलेले तुकडे, न वापरलेलं चिकन कधी कधी टाकून द्यावे लागत.

 

 

पण ते तुकडे पण वापरुन कुंदनलाल वेगळे काही प्रयोग करत. ते चिकन वाया जाऊ नये म्हणून टोमॅटो, फ्रेश क्रीम, बटर, दाट ग्रेव्ही, वाटलेलं वाटण यांचा वापर करुन ते काही ना काही करुन बघत. आणि यातूनच जन्माला आली बटर चिकन डिश!

नंतर भारत स्वतंत्र झाला आणि फाळणीनंतर कुंदनलाल गुजराल भारतात आले. दिल्ली येथे दरियागंज भागात त्यांनी आपलं हाॅटेल थाटलं. नांव तेच होतं मोतीमहल.

तेव्हा गुजराल यांना जराही कल्पना नव्हती की आपली बटर चिकन ही डिश आपली खासियत बनून आपल्याला जगभरात प्रसिद्ध करेल.

 

 

आज या गोष्टीला सत्तर वर्षं झाली पण आजही तीच चव घेऊन कुंदनलाल गुजराल यांच्या नातवंडानी आपला हा बटर चिकनचा झेंडा जगभर पोचवला आहे.

बटर चिकनचा मोहात पाडणारा स्वाद, आंबटगोड चव, आणि मऊ लुसलुशीत दिसणारं त्याचं रुपडं पाहून कोणत्याही मांसाहारी माणसाला सुख झाले हो साजणी हीच भावना होते.

आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून त्यात समतोल आहार राखण्यासाठी असलेली मेथीची किंचित कडवट चव, लसुण पेस्ट यांनी अॅसिडीटीची तीव्रता कमी करायला येते.

तर बटर आणि क्रीम यांच्यामुळे वाढणारा मेद कमी करण्यासाठी पण मेथी आणि लसूण कामी येतात. अन्नसुरक्षा तज्ज्ञ म्हणतात, बटर चिकन फार झणझणीत किंवा फार फिक्कं, गोडसर केलं तर त्याची चव बिघडते.

 

 

पण टोमॅटो वापरुन त्यात किंचित आंबटपणा, बटर आणि क्रीममुळं येणारा दाटपणा यांनी त्याची चव छान लागते आणि बटर चिकन खाताना बटर नान सोबतच सर्व्ह करावं म्हणजे त्याची लज्जत अजून वाढते.

पण सजावटीचा मुद्दा येतो तेव्हा फ्यूजन हा अगदी नवा ट्रेण्ड येतो. वेगवेगळ्या पदार्थांच्या एकत्रीकरणाने फ्यूजन फूड तयार होते. त्याची वेगळी चव, वेगळा लुक यामुळे हे पारंपरिक पदार्थ अजून वेगळे आणि चविष्ट होतात.

वेगवेगळ्या रेस्टॉरंट्स मध्ये हे फ्यूजन केलेलं बटर चिकन पहायला मिळतं. पिझ्झा टॅकोज, बिर्याणी रोल अशा वेगळ्याच रुपात बटर चिकन सर्व्ह करताना दिसतात.

 

 

गेली कितीतरी दशकं बऱ्याच पदार्थांचा शेफ लोकांनी वेगवेगळ्या प्रयोगांनी कायापालट केला आहे.पण यामुळे त्याची मूळची जी चव आहे..मूळ रुप आहे ते बदलून जाते. आणि जे खरेखुरे खवय्ये लोक आहेत त्यांना हे रुप फारसे न पचणारे, न पटणारे, न आवडणारे असू शकते.

कारण हे फ्यूजन फूड म्हणजे मूळच्या चवीला धक्का असतो. मूळ चव स्वाद यांवर हे फ्यूजन भारी पडून त्याची चव बदलण्याचा क्वचित प्रसंगी बिघडण्याचा पण संभव असतो.

आणि शेवटी असं आहे.. जे खरंखुरं रुप, खराखुरा स्वाद, तो विशिष्ट सुगंध यांनी मनावर अधिराज्य गाजवले असेल तर फ्यूजन केलेलं बटर चिकन कसं आवडावं बरं या चवीचं खाणं खाणाऱ्या लोकांना! सजावटीच्या नादात कधी कधी उत्तम चव बिघडू नये म्हणजे मिळवली!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version