' हे ८ उपाय वेळच्या वेळी करून कायमचा दूर होईल ब्लॅकहेड्सचा त्रास! – InMarathi

हे ८ उपाय वेळच्या वेळी करून कायमचा दूर होईल ब्लॅकहेड्सचा त्रास!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आपल्या त्वचेवर घाण, सीबम ऑईल आणि मृतत्वचा या सर्व गोष्टी प्रत्येक दिवशी जमा होत असतात यामुळे; त्वचेवरील छिद्रात घाण, मृतपेशी किंवा सीबम ऑइल जमा होऊन ही छिद्र बंद होतात ज्यामुळे ब्लॅक हेड्स व्हाइट हेड्स सारख्या समस्या उद्भवतात.

ब्लॅक हेड्स हे थोडेसे फुगीर, लहान आकाराच्या दाण्यासारखे असतात. ब्लॅक हेड्सची समस्या खूप सामान्य असून, जवळजवळ सगळ्यांनाच या समस्येला तोंड द्यावे लागते. मेडिकल भाषेत ब्लॅकहेड्सना ओपन कॉमेडॉन्स म्हणतात.

चेहऱ्यावरही ब्लॅकहेड्स हे मुख्यत्वे नाकावर, नाकांच्या कोन्याजवळ, गालावर, माथ्यावर आणि हनुवटीच्या भागात तयार होतात परंतु; हे शरीराच्या दुसऱ्या अवयवांवरही दिसून येतात.

 

black heads inmarathi

 

ब्लॅकहेड्स मुळापासून नष्ट करणे तसे थोडे कठीणच आहे परंतु अशक्य म्हणता येणार नाही. सर्वप्रथम चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स संपवायचे असतील तर तुमच्या त्वचेला नीट मोईश्चर मिळते आहे याची काळजी घेतली पाहिजे.

बाजारामध्ये चेहऱ्याला मोईश्चर पुरवण्यासाठी बरीच मॉइश्चरायझिंग क्रीम उपलब्ध आहे.

याखेरीज सॅलिसिलिक ऍसिड हा ब्लेकेड संपवण्यासाठी उत्तम पर्याय आहे आणि बाजारातील बऱ्याच सौंदर्यजन्य पदार्थमध्ये याचा समावेश करण्यात येतो. रीटीनॉइड स्किन क्रीम चा वापर करून सुद्धा ब्लॅक हेड्स दूर करता येतात.

मुबलक प्रमाणात पाणी पिणे हासुद्धा त्वचा निरोगी ठेवण्यासाठी आणि ब्लॅक हेड्सची समस्या टाळण्यासाठी उत्तम पर्याय आहे.

 

कॉस्मेटिक स्क्रबचा वापर :

 

cosmetic scrub inmarathi

 

ब्लॅक हेड्स च्या समस्येपासून दूर राहण्यासाठी चेहऱ्याला एक्सफोलिएशनची गरज असते. एक्सफोलिएशन या प्रक्रियेत चेहर्‍यावरील मृत त्वचा तसेच ब्लॅक हेड्स दूर होतात.

ते दूर करण्यासाठी कॉस्मेटिक स्क्रबर्सचा वापर केला जातो ज्यामुळे ब्लॅक हेड हळूहळू कमी होऊ लागतात. ब्लॅक हेड्स दूर करण्यासाठी किमान आठवड्यातून एकदा एक्सफोलिएशन करणे गरजेचे असते.

 

फेशियल :

 

facial inmarathi

 

ब्लॅक हेड्स दूर करण्यासाठी फेशियल सुद्धा चांगला पर्याय आहे. फेशियल केल्यामुळे चेहऱ्यावरील घाण, मृतत्वचा, तेल दूर होऊन चेहरा उजळतो.

योग्य प्रसाधनांचा वापर :

जर तुमच्या चेहऱ्यावर सतत ब्लॅक हेड्स तयार होत असतील तर तुम्हाला बाजारातून योग्य सौंदर्य प्रसाधनांची खरेदी केली पाहिजे.

चेहरा स्वच्छ ठेवणे :

 

washing face inmarathi

 

तुम्ही जेव्हा कधीही घराबाहेर पडता तेव्हा चेहऱ्यावर तेल साचून चेहऱ्यावर घाण जमा होते जर; तुम्ही जर तुमचा चेहरा नीट स्वच्छ केला नाही तर यामुळे त्यावर घाण जमा होऊन चेहऱ्यावर असलेले लहान लहान छिद्र बंद होतात.

मेक-अप मुळेसुद्धा चेहऱ्यावरील छिद्र बंद होतात. त्यामुळे मेकअप काढताना चेहरा स्वच्छ धुतला पाहिजे. दररोज किमान दोन वेळा तरी चेहरा धुणे गरजेचे आहे.

झोपण्याची उशी आणि चादर स्वच्छ ठेवणे :

जेव्हा आपण बेडवर झोपतो तेव्हा आपल्या त्वचेचा बेडवरील चादर आणि गादीला स्पर्श होतो.

जर बेडवरील चादर, गादी आणि तुमची झोपण्याची उशी स्वच्छ नसतील तर त्यावरील बॅक्टेरिया आपल्या चेहऱ्याच्या संपर्कात येतात आणि आपल्याला ब्लॅकहेड्स सारखे प्रॉब्लेम्स उद्भवू शकतात म्हणून; बेडवरील उशी, गादी आणि चादर स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे.

 

ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी घरगुती उपाय :

योग्य पद्धतींचा वापर करून ब्लॅक हेड्स कमी अथवा समूळ नष्ट करता येतात. खाली आम्ही ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी काही नैसर्गिक उपाय सुचवत आहोत

लिंबाचा आणि मधापासून तयार केलेला मास्क :

 

lemon honey inmarathi

 

लिंबामुळे रक्त संचलन प्रक्रिया वाढते आणि चेहऱ्यावरील छिद्र उघडली जातात आणि दुसऱ्या बाजूला मधामध्ये अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात ज्यामुळे चेहऱ्यावरील बॅक्टेरिया दूर होतात ज्यामुळे ब्लॅक्केड निर्माण होण्याची शक्यता असते.

लिंबू आणि मध यापासून तयार केलेला फेस मास्क बनवण्यासाठी एक चमचा लिंबाचा रस आणि अर्धा चमचा मध एका वाटीमध्ये घेऊन त्याचे नीट मिश्रण करून घ्यावे.

हे मिश्रण ब्लॅकहेड्स असलेल्या ठिकाणी लावावे. पंधरा मिनिटांसाठी हे मिश्रण तसेच राहू द्यावे. जेव्हा ते कोरडे होईल तेव्हा कोमट पाण्याने चेहरा धुऊन घ्यावा.

आठवड्यातून किमान तीन ते चार वेळा तुम्ही हा मास्क चेहऱ्यावर लावला तर तुम्हाला त्याचे परिणाम दिसू लागतील.

 

बेकिंग सोडा आणि लेमन मास्क :

 

baking soda lemon inmarathi

 

बेकिंग सोडा सुद्धा एक्सफोलिएशन च्या प्रक्रियेत मदत करतो. यामुळे चेहर्‍यावरील मृत त्वचा दूर होते. जे ब्लॅक हेड्‍स तयार होण्याचे कारण आहे.

लिंबामुळे चेहऱ्यावरील छिद्र काही प्रमाणात उघडली जातात ज्यामुळे त्यात जमा झालेली घाण बाहेर काढण्यास मदत होते चेहऱ्यावरील या छिद्रामध्ये घाण साठणे हेच ब्लॅक हेड्‍स तयार होण्याचे मुख्य कारण आहे.

त्यामुळे ब्लॅकहेडस दूर करण्यासाठी आपण या मास्कचा वापर सुद्धा करू शकतो.

हा मास्क बनवण्यासाठी एक चमचा बेकिंग सोडा आणि अर्धा चमचा लिंबाचा रस यांचे मिश्रण करून घ्यावे. हे मिश्रण नाकावर अथवा ज्या ठिकाणी ब्लॅकहेड्स तयार झाले असतील तिथे लावावे.

चेहऱ्यावरील मिश्रण कोरडे झाल्यानंतर चेहरा कोमट पाण्याने धुऊन घ्यावा.

 

अंड्यातील बलकाचा मास्क :

 

egg white mask inmarathi

 

अंड्यातील पांढरा बलक हा फक्त पौष्टिक आहारच नाही तर चेहऱ्यावरील त्वचेसाठी सुद्धा फायदेशीर आहे. ते चिकट असल्यामुळे चेहऱ्यावर चिकटून राहते आणि त्यामधील घटक चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स दूर करण्यास मदत करतात.

हा मास्क बनवण्यासाठी एका भांड्यात अंड्याचा पांढरा बलक काढून घ्यावा आणि त्यामध्ये दोन चमचे लिंबाचा रस टाकावा. याचे व्यवस्थित मिश्रण तयार करून ब्लॅकहेड्स आलेल्या ठिकाणी ते लावावे.

हे मिश्रण पंधरा ते वीस मिनिटांसाठी तसेच राहू द्यावे. त्यानंतर स्वच्छ पाण्याने ब्लॅक हेड्सने प्रभावित झालेला चेहऱ्याचा भाग धुऊन घ्यावा.

हा मास्क लावल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावरील ब्लॅक हेड कमी होण्यास नक्कीच मदत होईल. हा मास्क लावल्यानंतर तुम्ही चेहरा स्वच्छ धुतला आहे की नाही हे तपासून घेणे गरजेचे आहे नाहीतर तुमच्या चेहऱ्याला अंड्याचा गंध येऊ शकतो.

 

ओटमील स्क्रब :

 

oatmeal scrub inmarathi

 

एक उत्तम स्क्रबर असल्यामुळे ओटमिलमुळे चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स दूर होतात आणि चेहऱ्यावर एक नैसर्गिक उजळपणा येतो.

ओटमील स्क्रबर बनवण्यासाठी एका वाटीमध्ये दोन चमचे ओटमील, तीन चमचे दही आणि एक चमचा लिंबाचा रस यांचे मिश्रण करून घ्यावे. या मिश्रणाची बारीक पेस्ट बनवणे गरजेचे आहे.

पेस्ट तयार झाल्यावर ब्लॅकहेडस आलेल्या ठिकाणी लावावी आणि दहा ते पंधरा मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावलेले हे मिश्रण तसेच राहू द्यावे आणि त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुऊन घ्यावा.

वर दिलेले नैसर्गिक उपाय तुमचे ब्लॅक हेडस पळवून लावण्यास नक्कीच फायदेशीर ठरतील. पण या उपायांचा वापर करूनही तुमच्या चेहऱ्यावरील ब्लॅक हेडस जात नसतील तर तुम्ही डर्मीटलोजिस्टचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?