' मोबाईल फेकणे हा आहे चक्क राष्ट्रीय खेळ! वाचा या विचित्र खेळाविषयी… – InMarathi

मोबाईल फेकणे हा आहे चक्क राष्ट्रीय खेळ! वाचा या विचित्र खेळाविषयी…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

“मोबाईल फेकणे”

“सगळ्यात आधी तो फोन फेक, त्या दळभद्री फोन ने तुमच्या पिढीचं वाटोळं केलंय” अशी बोंबाबोंब प्रत्येक भारतीय घरात रोज चाललेली असते.

फोन फेकून देण्याचे सल्ले आणि धमक्या तर आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधी मिळालेल्या असतीलच? आपण फोन मध्ये इतके गुंग होऊन जातो की आपल्याला परिस्थितीचं, समायचं, अजिबात भान उरत नाही.

बरं आपली पिढी जरा जास्तच मानसिक आरोग्याच्या समस्यांत गुरफटत चाललीये आणि अशा वेळी आयुष्याला वळण लावण्याचा मजेशीर आणि थोड्या प्रमाणात का होई ना, बरोबर आणि योग्य असा सल्ला आई वडिलांकडून देण्यात येतो कि “फेकून द्या तो फोन”.

 

mobile inmarathi

 

ज्याहि पालकांना, आपल्या पाल्यांनी खरंच फोन फेकून द्यावा असं वाटतंय खास करून त्यांच्यासाठी हा लेख.

एक देश आहे जिथे सगळ्याच पालकांची स्वप्न अगदी खरी होतील, शिवाय बक्षीसही मिळेल. होय!

नीट वाचलेत.. भाला फेक, जॅवलिन थ्रो सारखी, फोन फेकण्याची स्पर्धा फिनलंड येथे आयोजित केली जाते. आणि हि काही छोटी मोठी स्पर्धा नव्हे, तर फिनलंडचा राष्ट्रीय खेळ आहे.

२००० सालापासून फिनलंड मध्ये एक आगळा वेगळा खेळ खेळायला सुरुवात झाली. या खेळाचं उद्देश्य आणि त्याचा उदय हा जरा वेगळ्या परिस्थिती मुळे झाला.

Savonlinna येथील Fennolingua या ट्रान्सलेशन आणि इंटरप्रिटेशन कंपनिने आपल्या कर्मचाऱ्यांना कामाच्या ताणापासून होणाऱ्या त्रसापासून थोडा विरंगुळा मिळावा, प्रोत्साहन मिळावं, सकारात्मक बदल जाणवावा, म्हणून या खेळाची सुरुवात केली.

“आम्ही आमच्या स्वतःची ताण तणाव आणि सगळ्याच बंधानांतून मुक्ती करून घेतो आहोत” हे त्या स्पर्धेचं उद्दिष्ट होतं. हे फेकलेले फोन तिथेच पडून राहू नये व त्यातून रिसायकलिंगचा संदेश मिळावा म्हणून, काही रिकायकलिंग कंपन्यांनी या स्पर्धेधी पार्टनर्शीप केली होती.

ते सगळे फेकलेले फोन गोळा करून त्यांनी पून्हा रिसायकल केले आणि निसर्गाला कोणत्याही प्रकारची हानी पोहोचणार नाही, याची खबरदारी घेतली. आणि या स्पर्धेपासून, संपूर्ण फिनलंड मध्ये हा खेळ खेळला जाऊ लागला.

 

mobile throwing inmarathi

 

आणि त्याला इतकी लोकप्रियता प्राप्त झाली की फिनलंडने हा आपला “राष्ट्रीय खेळ” म्हणून जाहीर केला. आता दर वर्षी त्याच शहरात हा खेळ खेळला जातो.

विशेष असं की आता याचे विश्वचषक सुद्धा आयोजित केले जाते. कारण फिनलंड बरोबरच संपूर्ण युरोप ह्या खेळाच्या प्रेमात पडलंय. या खेळाचे हॉल ऑफ फेम सामने सुद्धा आयोजित केले जातात.

स्वित्झर्लंड, नॉर्वे, स्पेन अशा अनेक युरोपियन देशांतील विजेत्यांना फिनलंड मध्ये होणाऱ्या, विश्वचषकाच्या दौऱ्यावर पाठवले जाते.

एखादा पारंपारिक खेळ जसा असतो, त्यात जसे नियम , अटी आणि त्याला खेळायला जशी तयारी लागते, तशीच या खेळात सुद्धा गरजेची असते.

आपल्याला जरी ऐकण्यात गम्मत वाटत असेल तरी, युरोपिअन्स या खेळाला अजिबातच गंमत म्हणून घेत नाहीत. त्यांच्यासाठी हा खेळ, देशभक्तीशी जोडलेला आहे.

तर या खेळात सहभागी होण्यासाठी शारीरिक व मानसिक सक्षमता सिद्ध करावी लागते. जर दोन्ही पैकी एका पातळीवर जरी खेळाडू अयशस्वी झाला तर त्याची स्पर्धेसाठी निवड होत नाही.

याच बरोबर, स्पर्धेच्या वेळी, आखलेल्या ग्राउंड मधूनच फोन फेकले जातात. त्या रेषेच्या बाहेर गेल्यास, तो प्रयास म्हणजेच ती संधी व्यर्थ ठरवली जाते.

याच वरून हे समजतं कि त्या खेळात ग्राउंडवर एक अंपायर देखील असतो. खेळाडूंना आपले स्वतःचे आणण्याची पार्वनागी नाही. जाहीर केलेल्या नियमांत बसणारे फोनच वापरावे लागतात.

 

mobile throwing 2 inmarathi

 

अधिकाऱ्यांनी या स्पर्धेसाठी फोन्सचे भरपूर मॉडेल्स, व्हर्जन ठरवून दिलेले आहेत. खेळाडूच्या हातात बसणारा, शोभणारा, आणि त्याचं वजन पेलावणार फोन खेळाडूंना निवडायचा असतो.

पण स्पर्धेत सहभागी होण्यासाठी फोन चं वजन हे २२० ग्राम किंवा यापेक्षा अधिक असणं अनिवार्य असतं. एखादा रनर ज्याप्रमाणे आपल्याला शोभणारे बूट निवडतो त्याच प्रमाणे ह्या खेळाडूंना फोन निवडावा लागतो.

या खेळाच्या चार पद्धती आहेत :

१) ओरिजनल किंवा पारंपारीक पद्धत –

मूळ खेळ ज्या स्वरूपाचा होता ती पद्धत. यात सगळ्या ट्रिक आणि टेक्निक बघून गुण दिले जातात. तुमच्या गेम ची स्ट्रॅटेजी, तुमची देहबोली आणि फोन फेकल्या गेल्याचे अंतर तुमचे गुण ठरवते.

२) फ्री स्टाईल –

यात स्पर्धक वेगवेगळे एरोबिक, आणि नृत्य प्रकार करून आपला खेळ खेळतात. या पद्धतीत, कोणाचा परफॉर्मन्स सगळ्यात जास्त आकर्षक आणि ज्वलंत होता यावरून गुण दिले जातात.

३) समूह किंवा टीम पद्धत –

यात पद्धतीनुसार ३ स्पर्धकांचा एक समूह असतो. आणि सगळ्यांचे एकूण गुण कोणता संघ विजयी आहे हे ठरवतात.

एका एका खेळाडूला आपल्या खेळाचं एकट्यानेच प्रदर्शन करून, गुण मिळवावे लागतात. आणि मग तिन्ही स्पर्धकांच्या गुणांची टोटल केली जाते. ज्या संघाचे एकूण गुण जास्त, तो संघ विजयी होतो.

४) ज्युनिअर –

या पद्धतीत वय वर्ष १२ व या पेक्षा कमी वय असलेल्या स्पर्धकांचा समावेश असतो.

जर्मनी मध्ये अशीच स्पर्धा आयोजित करण्यात आली होती आणि त्या स्पर्धेतील विजेता Tom Philipp Reinhardt याने सगळ्यात लांब अंतरावर फोन फेकून, विश्वविक्रम आपल्या नावावर केला होता.

 

phone throwing inmarathi

 

136,75m चा थ्रो असलेल्या या त्याच्या विक्रमला अजून कोणीही भेदू शकलेलं नाही. या खेळात आपल्या दोन मान्यतेचे गट बघायला मिळतात.

एका गटाला असं वाटतं आहे की अवजड फोन फार दूरवर फेकले जाऊ शकतात, तर एका गटाला असं वाटतं की हलके फोन फार दूरवर फेकले जाऊ शकतात.

म्हणजेच इतर कोणत्याही खेळात जसे नियम, मान्यता, गटबाजी असते तशीच या खेळात सुद्धा आहे. सगळ्याच स्पर्धकांची ट्रेनिंग, त्यांचे टेक्निक, सगळं अगदी अभ्यासपूर्ण ओद्धतीने अवलंबलं जातं.

तर ज्याला कोणाला फोनच्या स्लो असण्याचा, नेटवर्कचा वैताग येऊन फोन फेकण्याची इच्छा होत असेल, किंवा ज्या पालकांना आपल्या मुलांना फोन फेकताना बघून आनंद लुटायचा असेल, आणि बक्षिसं हि जिंकायची असतील त्यांनी या स्पर्धेत सहभागी व्हायला काहीच हरकत नाही.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?