सावधान : पुन्हा पुन्हा गरम करून खाल्ले जाणारे हे पदार्थ आहेत आरोग्यासाठी घातक
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
असं म्हणतात “अन्न हे पूर्णब्रम्ह”आणि ह्या अन्नाचा अपमान करणं म्हणजे अन्नपूर्णेचा अपमान करणं असं समजलं जातं. अर्थात जगायला अन्न हे अत्यंत आवश्यक असतं, कित्त्येक लोकांना ते मिळत नाही म्हणून त्याची किंमत करणं हे अगदी योग्यच आहे, त्यात दुमत नाही.
या मान्यतेमुळे आपण कित्येकदा जास्त झालेला एकच पदार्थ शिजवून २-३ दिवस तेच खात बसतो. काहीही केल्या तो संपतच नाही असेही प्रकार बरेच ठिकाणी घडतात. आपल्याकडेच काय पूर्ण जगातच रात्रीचं उरलेलं शिळं अन्न सकाळी न्याहारीत खाल्ल्या जातं.
दुसऱ्या दिवशी एखादी महत्वाची मिटिंग असेल किंवा प्रवासाला जायचं असेल, तर लोक सकाळी घाई गडबड नको म्हणून आदल्या रात्रीच स्वयंपाक करून ठेवला जातो. हे सगळंच एखादवेळी ठीक आहे. रोज रोज हे व्हायला लागलं तर आपल्या आरोग्यासाठी ते हानिकारक ठरू शकतं.
काही अन्नपदार्थ असेही असतात, जे वारंवार गरम केल्याने आपल्या आरोग्यासाठी ते अत्यंत हानिकारक ठरू शकतात. पोटदुखी, अपचन अशा अनेक समस्यांसाठी कारणीभूत ठरू शकतात. हे होण्यामागचे कारण असे, की पहिल्यांदा गरम केल्यावर त्यांच्यात काही रासायनिक बदल घडतात आणि गार होऊन पुन्हा गरम केल्याने आधीच झालेल्या बदलांमध्ये नवीन प्रक्रिया घडू लागतात.
या प्रक्रियांद्वारे तयार झालेल्या अन्नाला आपलं शरीर पचवू शकत नाही. आपल्या शरीरात असलेल्या विविध अॅसिडिक द्रव्यांमुळे खाल्ल्या गेलेल्या अन्नपदार्थांत अजून प्रक्रिया घडते आणि विपरीत परिणाम होतात. हे कोणते अन्न पदार्थ आहेत ते जाणून घेऊया.
१) पालक, गाजर, कांद्याची पात –
बहुतांश पालेभाज्यांमध्ये नायट्रेट जास्त प्रमाणात असते. त्यातल्या त्यात पालक ही अशी भाजी आहे ज्यात सगळ्यात जास्त प्रमाणात नायट्रेट आढळते. शिवाय पालकात लोह भरपूर प्रमाणात असते. या नायट्रेट आणि लोहयुक्त पदार्थांना जर पुन्हा गरम केले, तर शरीरावर विपरीत परिणाम करणारे घटक निर्माण होतात. यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता वाढते.
बऱ्याच घरात पालकाचं वरण किंवा भाजी उरली तर ती २-३ दिवस फ्रीज मध्ये पडून असते व तिचे पराठे केले जातात. जे अत्यंत चुकीचं आहे. १ दिवसापेक्षा जास्त शिळी असलेली पालक, गाजर आणि कांद्याच्या पातीची भाजी पुन्हा गरम करू नका.
२) भात –
ऐकून आश्चर्य वाटलं ना? रात्रीचा उरलेला भात तर सकाळी फोडणी देऊन खायला सगळ्यांनाच आवडतं. पण या सवयीचे आपल्याला दुष्परिणाम भोगावे लागू शकतात.
तांदळात Bacillus Cereus नावाचे अत्यंत संवेदनशील बॅक्टरीया असतात. जास्त वेळा शिजवल्याने किंवा गरम केल्याने उष्णतेच्या संपर्कात येऊन ते मरण पावतात व तिथे अनेक स्पोअर तयार होतात म्हणजेच बुरशी यायला सुरुवात होते. यामुळे बद्धकोष्ठता, अपचन, ऍसिडिटी, आणि फूड पॉइझनिंग होते.
आपल्याला दिसत नसली तरी २ वेळा गरम होऊन गार झाल्याने ती बुरशी झपाट्याने वाढते. त्यामुळे शक्यतो गरमच भात खा.
३) अंडी –
अंड्यात प्रोटीन भरपूर असते म्हणून बहुतांश लोकांची अंडी आवडीची असतात. कोणत्याही प्रोटीनयुक्त अन्नात नायट्रोजन सुद्धा अधिक प्रमाणात असते आणि अंड्यात सुद्धा ते आढळते.
एकदा उकडून घेतलेली अंडी किंवा त्यांच्यापासून बनवलेला कोणताही पदार्थ जर दुसऱ्यांदा किंवा दोनपेक्षा जास्त वेळी गरम केला, तर ऑक्सिडेशनची प्रक्रिया घडते. त्यामुळे गरम असतानाच त्वरित अंड्यांचे सेवन करावे किंवा गार झाल्यास गारच खावे. पुन्हा गरम करू नये.
४) चिकन –
चिकन सुद्धा प्रोटीनचा उत्तम स्रोत आहे, पण एकदा तयार केलेली चिकन करी फ्रीज मध्ये ठेवली असेल आणि दुसऱ्या दिवशी खाल्ली जाणार असेल तर ती एकदाच गरम करा.
तसं तर फ्रीज मधून काढल्यावर एकदा ही गरम करणे चूकच कारण, फ्रीजच्या गॅस आणि गाराव्यामुळे चिकनच्या प्रोटीन तत्वात बदल घडतात, पण गरम करायचीच असेल तर एक वेळच गरम करून घ्यावी. सारखी सारखी गरम करून खाऊ नये. असे केल्यास पंचनसंस्थेवर भरपूर भार येतो व ते चिकन पचायला दुप्पट जड होते.
५) बटाटे आणि मशरूम –
बटाटे आपल्या सगळ्यांनाच भरपूर आवडतात. जितके ते चविष्ट असतात, तितकेच त्यांच्यात पौष्टिक तत्व देखील असते. बटाट्यांत व्हिटॅमिन बी 6, पोटॅशियम, आणि व्हिटॅमिन सी असते आणि मशरूममध्ये प्रोटीन भरपूर असते.
या व्हिटॅमिन्सना जर २ पेक्षा जास्त वेळी गरम केलं, तर Clostridium Botulinum नावाच्या बॅक्टरीयाचे निर्माण होतात आणि आपल्याला विविध आजार होतात.
६) कोल्ड प्रेस्ड तेल –
आजकाल ऑलिव्ह ऑइल, जवसाचे तेल आणि कॅनोला ऑइल जास्त प्रचलित झाले आहे. कारण त्यात ओमेगा ३ नावाचं फॅट आढळतं. जे आपल्या त्वचेसाठी, हाडांसाठी आणि केसांसाठी फायदेशीर असतं, पण ४० डिग्रीपेक्षा जास्त तापावल्यास हे तेल “रँसिड” म्हणजेच खाण्यास अत्यंत अयोग्य होतं. त्याचा कुबट असा वास येऊ लागतो.
कोणतेही तळणाचे तेल हे २-३ पेक्षा जास्त वेळा तापवू नये आणि हे कोल्ड प्रेस्ड तेल तर अजिबात जास्त तापवू नये.
त्यामुळे आधीच कमी अन्न शिजवा, कोणतंही अन्न २ पेक्षा जास्त वेळा गरम करू नका.
===
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.