' फक्त ८२५ रहिवासी असलेला देश! या अज्ञात गोष्टी तुम्हालाही भुरळ घालतील – InMarathi

फक्त ८२५ रहिवासी असलेला देश! या अज्ञात गोष्टी तुम्हालाही भुरळ घालतील

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

“एखाद्या देशाची लोकसंख्या ही ३ अंकी सुद्धा असू शकते” असं कोणी म्हटल्यावर आपण पटकन विश्वास ठेवणार नाही. मुंबईच्या लोकलमध्ये यापेक्षा जास्त गर्दी असते. आपण राहतो त्या सोसायटी मध्ये आजकाल १००० लोकांपेक्षा जास्त लोक राहत असतात, पण जगात एक असा देश आहे त्याची लोकसंख्या ही ३ अंकी आहे आणि तरी त्या जागेला देश म्हणून मान्यता मिळाली आहे.

व्हॅटिकन सिटी – ख्रिश्चन धर्मियांची पंढरी. ही तीच जागा आहे जिथून जगभरातील ख्रिश्चन धर्मीय लोकांना धर्मोपदेश दिला जातो. क्षेत्रफळाच्या दृष्टीने हा जगातील सर्वात छोटा देश आहे. ३.२ किलोमीटर मध्ये संपून जाणाऱ्या या देशात केवळ ८५० लोक राहतात. इटली मधील सर्वात लांब तिबर नदीच्या तीरावर वसलेला हा देश अगदीच नयनरम्य आहे.

 

 

कॅथलिक चर्चचे धर्मगुरू पोप यांचं हे १३७७ पासून अधिकृत निवासस्थान आहे. स्थापनेपासून जवळपास ६०० वर्ष म्हणजे १९२९ पर्यंत हा देश एक स्वतंत्र राज्य होण्यासाठी सुद्धा संघर्ष करत होता. लॅटरन करार १९२९ मध्ये झाल्यानंतर ११ फेब्रुवारी १९२९ रोजी ‘व्हॅटिकन सिटी’ हे सर्वात पहिल्यांदा एक राज्य म्हणून घोषित करण्यात आलं.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

हे साध्य करण्यासाठी तत्कालीन राजकीय नेते आणि पोप यांच्यात बराच वाद सुरू होता. त्या भागात कोण आपली सत्ता स्थापन करू शकेल किंवा राजकीय वर्चस्व सिद्ध करू शकेल याबद्दलचा हा वाद होता.

बेनिटो मुसोलिनी आणि दहावे पोप पियूस यांचं लॅटरन करारातील मुद्द्यांवर सहमती झाली. ज्यामध्ये हा प्रमुख मुद्दा होता की, कॅथलिक चर्चसाठी व्हॅटिकन सिटीची ओळख असेल आणि पोप हे या शहराचे प्रमुख असतील.

धर्मप्रसारण करण्याच्या हेतूने स्थापन केलेल्या या देशात लोक दाखल होत गेले आणि धर्मप्रचारक म्हणून ओळखले जाऊ लागले. तिथे राहणाऱ्या लोकसंख्येच्या ७५% लोक हे आजही धर्म प्रचारक म्हणून काम करतात.

vatican city inmarathi3

 

जगातील सर्वात कमी लोकसंख्या असलेल्या व्हॅटिकन सिटीला काही वर्षांपूर्वी पिटकैर्न बेटाने मागे टाकलं आहे. पिटकैर्न बेटाची लोकसंख्या ही केवळ ४० ते ६० लोक इतकी आहे. ‘ब्रिटिश टेरिटरी’ म्हणून ओळखली जाणारी ही जागा पेरू आणि न्यूझीलंड या देशांच्या मध्यभागी आहे. चार बेटांचा समूह असलेल्या या जागेत राहतात.

व्हॅटिकन सिटी ही अजून एका कारणासाठी लोकप्रिय आहे, ती म्हणजे तिथल्या संग्रहालयासाठी. UNESCO ने वर्ल्ड हेरिटेज म्हणून घोषित केलेल्या या संग्रहालयात दरवर्षी लाखो लोक भेट देत असतात. प्रत्येक वेळी भेट दिल्यावर तुम्हाला ते अजून चांगलं वाटतं अशी त्याची ख्याती आहे.

व्हॅटिकन सिटी मध्ये येण्यासाठी तुम्हाला वेगळा व्हिसा काढावा लागतो. तिथे राहणाऱ्या लोकांना वेगळा पासपोर्ट दिलेला असतो. या देशाचे वेगळे वाहन परवाने सुद्धा आहेत.

व्हॅटिकन सिटी ही एखाद्या मोठ्या राजवाड्यासारखी आहे. पोप हे फक्त कॅथलिक धर्मप्रसारक नसून ते त्या देशाचे राजे सुद्धा आहेत. या राजवाड्यात एकूण १४०० खोल्या आहेत. पोप यांचे ऑफिसेस आहेत.

 

 

रोम मधील सर्वात प्रेक्षणीय समजल्या जाणाऱ्या व्हॅटिकन सिटीला एकूण ५५१ पायऱ्या आहेत. या पायऱ्या चढून पर्यटक हे सर्वात उंच ठिकाणी जाऊ शकतात आणि तिथून पूर्ण शहराला बघू शकतात. सेंट पीटर स्क्वेअर हे सुद्धा आपल्याला या उंचीवरून दिसतं.

व्हॅटिकन सिटीत व्हॅटिकन बँक सुद्धा आहे आणि तिथे जगातील एकमेव ATM आहे जे की लॅटिन भाषेत आहे. व्हॅटिकन सिटीला आता त्यांची वेगळी आर्मी सुद्धा आहे. स्विस गार्ड नावाने ओळखल्या जाणाऱ्या या आर्मी मध्ये १३५ लोक आहेत. त्यांना वेळोवेळी मॉडर्न मिल्ट्री ट्रेनिंग दिली जाते.

व्हॅटिकन सिटी ही पुस्तक प्रेमींसाठी पर्वणी आहे. इथे असलेल्या वाचनालयात जगातील सर्वोत्तम पुस्तकं उपलब्ध आहेत. हे वाचनालय हे व्हॅटिकन संग्रहालयाच्या अखत्यारीत येतं. १४७५ मध्ये सहावे पोप यांनी स्थापन केलेल्या या वाचनालयात ११ लाख पेक्षा अधिक पुस्तकं आहेत. दरवर्षी त्यात सहा हजार पुस्तकाने भर पडत असते.

 

व्हॅटिकन सिटीची वेगळी एक फुटबॉल टीम सुद्धा आहे. ३०० मीटर इतक्या छोट्या अंतराची रेल्वे आपल्याला इथे बघायला मिळते जी की जगातील सर्वात छोटी रेल्वे लाईन आहे.

इटली मध्ये UNESCO ने जाहीर केलेल्या जागतिक वास्तू पैकी सर्वात जास्त वास्तू आहेत, पण व्हॅटिकन सिटी हे एकमेव असा देश आहे जो की ‘जागतिक वारसा’ म्हणून जाहीर करण्यात आला आहे.

इटलीची सहल बुक करणार असाल तर व्हॅटिकन सिटीला भेट द्यायला वेळ नक्की ठेवा. तिथली चित्रकला, मूर्तिकला बघून तुम्ही तो दिवस आयुष्यभर लक्षात ठेवाल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?